सैराट अन झिंकाट

सैराट अन झिंगाट

गीतकार - संगीतकार अजय-अतुल यांनी अफलातून केलेले गाणे आणि अजय गोगावले यांनी वेगळयाच ढंगात गायलेले  झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाटने युवा वर्गाला वेड लावले आहे.गाण्याप्रमाणे झिंग होवून नाचताना बेभान होतोय आजचा युवा.नागराज मंजुळे यांनी तयार केलेला सैराट चित्रपट सर्वत्र हाऊसफुल आहे. कथा म्हणालं तर प्रेमकथाच...पण वेगळया धाटणीचे कथानक,नवोदित कलाकारांची कसलेल्या कलाकारांप्रमाणे अभिनय आणि  झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
सारं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट म्हणजे सर्वच सैराट.आर्ची व परशा जोडी फारच लोकप्रिय झाली आहे.मराठी भाषा,मराठी माती,मराठी कला,मराठी चित्रपट,मराठी गाणं,मराठी माणसं,मराठी .....अन ..मराठी....फक्त उरते,राहते मराठीच.आर उरात होती धडधड....म्हणताना आणि नाचताना प्रक्षेकच बेभान होतोय.आर...कारं....ही आहे अस्सल मराठी बोलीभाषा.नागराज मंजुळे यांनी अतिशय विचारपुर्वक चित्रपटाचा शेवट केला आहे तो चित्रपट गृहात सैराट पाहून विचार करायला भाग पाडतो.जात....काही केल्या जात नाही.उच - निच जातीव्यवस्था पुरातन काळापासून माणसाला चिकटली आहे.काही केल्या जाती बाहेर विचार जात नाही ही खदखद आहे.जातीचा मान,सन्मान,स्वाभिमान हा प्रत्येकाला पाहिजे पण रक्तनात्याला तिलांजली देणारी जातव्यवस्था माणूसकी धर्म नष्ट करते एवढे भान ठेवायला पाहिजे.प्रेम हे अमर,निर्मळ,स्वच्छ,पारदर्शक,निसर्ग निर्मित आहे.कारण कोण ? केव्हा ? कसे ?का ? प्रेम करेल सांगता येत नाही.लैला-मजनू,बाजीराव मस्तानी,हिर-रांजा यांच्या आजही प्रेमकथा सांगितल्या जातात.प्रेमाला उपमा नाही हे कवी म्हणतात.तर प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेमच असते.कवीकल्पना वास्तवात असते म्हणूनच तर कविंना प्रेम कविता सूचतात.सरळ, साधा,भोळा,व्यक्ती कोणावर ही प्रेम करतो तर प्रेमात  गरीब- श्रीमंत असा भेदाभेद होत नाही कारण प्रेम करणारे दोघेही धर्म,जाती,भाषा,रूढी परंपरा यापलिकडे जावून एकमेकावर निस्सीम प्रेम करीत असतात.प्रत्येक देशाच्या सिमा ही प्रेमाला अडसर ठरत नाहीत.प्रेम भावना कधी,कशी,कोणावर व्यक्त होईल हे सांगता येत नाही.कारण प्रेमाचा रंग वेगळा व नाविन्यपुर्ण असतो म्हणूनच शेवटी काय तर प्रीतीची बाधा झाली...आता अधीर झालोया.. मग बधीर झालोया....अन तुझ्याच साठी बनून मजनु मागे आलोया....आन उडतोय बुंगाट पळतोय चिंगाट रंगात आलोया.....झाल झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट....सारं झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट
झिंग झिंग झिंग…झिंगाट

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.