नराधमांना फाशीच हवी
जम्मू-काश्मीरमधल्या कठुआ येथील 8 वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार म्हणजे मानवतेला काळींबा आहे. अशा नराधमांना जाहीर चौकांमध्ये फाशी दिली गेली पाहिजे, अशी लोकभावना निर्माण झाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद विविध स्तरातून उमटले आहेत. लोकभावना तीव्र झाली आहे. नराधमांनी कृत्य केले त्यांना फाशीच झाली पाहिजे. असा आग्रह धरला जात आहे. आणि अशा विकृत नराधमांना फाशीच झाली पाहिजे. या व्यतिरिक्त त्यांना कोणतीही शिक्षा दिली गेली नाही पाहिजे. देशातील सरकारकडून फाशीच्या शिक्षेची जनभावना अपेक्षा करीत असताना, देशाचे प्रधानमंत्री लंडनस्थित जाऊन याबाबत भाष्य करतात, याला काय म्हणावे ? ज्या हिंदुस्थानातील तमाम जनतेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून निवडून दिले. त्या लोकांचेसमोर येवून या घटनेबद्दल वक्तव्य करण्याऐवजी लंडनला जाऊ याबाबत बोलणे योग्य नाही.
फाशीच्या शिक्षेबद्दल बोलले असते, तर योग्य ठरले असते, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांनी याबाबत राजकारण करू नये, असे म्हटले आहे. याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यामध्ये केवळ राजकारणच आहे. असा त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काढला जाऊ शकतो. विरोधकांनी लोकभावना प्रकट केली याचा अर्थ ते राजकारण करतात. असे म्हणता येणार नाही. हिंदुस्थानातील सरकार म्हणून आणि सरकारचे व देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी बलात्कार घटनेबाबत फाशीच्या शिक्षेबद्दल बोलणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता जनतेच्यासमोर यावे, अथवा भारतातील मीडियासमोर येऊन याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे.
जम्मू-काश्मीरमधल्या कठुआ येथे आठ वर्षे वयाच्या मुलीचं 10 जानेवारीला अपहरण करून तिला मंदिरामध्ये कोंडून ठेवण्यात आले. हिंदूंचे पवित्र मंदिरांमध्ये घडलेली ही घृणास्पद घटना आहे. यांची भाजपा सरकारने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. निरागस मुलीवर सातत्याने अत्याचार करताना या नराधमांना कशाचीही भीती वाटली नाही ? याचा अर्थ ते फाशी देण्याच्या लायकीचे आहेत.
सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. अत्याचार करताना या नराधमांना आपल्या आई, बहीण, मुलगी व इतर नातेसंबंधातील महिलेचा विचार मनात आला नाही. केवळ वासनांध झालेल्या या नराधमांना भर चौकात फाशीच दिली गेली पाहिजे.
या नराधमांनी अत्याचारानंतर त्या मुलीची हत्या केली. एका निष्पाप मुलीवर अतोनात अत्याचार करून अखेर हत्या केली. जनावरापेक्षाही हीन वृत्तीच्या या नराधमांना भर चौकात फाशी देऊन बलात्कार करणाऱ्यांची काय गत होते. हे भाजप सरकारने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दाखवून द्यावे. बलात्काराच्या घटनांचं राजकारण करू नका, असे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे स्वातंत्र्यानंतर झालेल्या पंतप्रधानांपासून ते तुमच्यापर्यंत अशीच राजकीय वक्तव्य करतात असा लोकांचा समज होईल. ज्या विश्वासाने हिंदुस्थानातील लोकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर पंतप्रधान म्हणून विश्वास दाखवला, त्या विश्वासाला खऱ्या अर्थाने पात्र ठरायचे असेल, तर जे नराधम गैरकृत्य करतात, बलात्कार करतात. अशांना फाशीची शिक्षा भर चौकात दिली जाईल, अशी जरब बसविण्यासारखा निर्णय घ्यावा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा