जयंत पाटील राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदी निवडीमुळे कराडचा ही झाला सन्मान !
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वाळव्याचे आमदार जयंत पाटील यांची निवड झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. कारण जयंत पाटील यांनी आतापर्यंत राजकारण व समाजकारणात केलेले काम उल्लेखनीय व दिशादर्शक आहे. यामुळे भविष्यकाळामध्ये राष्ट्रवादीला चांगले दिवस येतील असेही बोलले जात आहे. कराडला लागून वाळवा तालुका असल्यामुळे कराड - वाळवा तालुक्यात राजकीय सुंदोपसुंदी तसेच बेरजेचे राजकारण दोन्ही तालुक्यात चालत असते. गतकाळातील कराड लोकसभा मतदार संघांत वाळवा तालुका होता, यामुळे कराडमधील राजकीय लोकांचे वाळवा तालुक्यात अतिशय चांगले संबंध आहेत. तर कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्रही वाळवा तालुक्यातील काही गावांमध्ये आहे.
अतिशय पारदर्शक, काटकसरीने संस्था चालवण्याचा आमदार जयंत पाटील यांचा हातखंडा आहे. अनावश्यक खर्च टाळून संस्थांचा आर्थिक विकास करण्यात त्यांचा कोणी हात धरू शकणार नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आमदार जयंत पाटील यांनी महत्त्वाची मंत्रिपदे भुसविली आहेत. आणि प्रत्येक मंत्रीपद भूषवताना त्यांनी त्यांच्या खात्याचा दर्जा उंचावला आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या आघाडीमधील जयंत पाटील एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करीत होते. शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून आमदार जयंत पाटील यांना पश्चिम महाराष्ट्र ओळखतो. सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जयंत पाटील यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचा वरचष्मा राहावा, म्हणून आमदार जयंत पाटील नेहमी प्रयत्न करीत राहिले आहेत.
शांत, संयमी, अभ्यासपूर्ण ओघवत्या भाषाशैलीत त्यांचे भाषण ऐकणे म्हणजे वैचारिक खुराक मिळण्यासारखा आहे. गतकाळातील कराड लोकसभा मतदार संघातील पृथ्वीराज चव्हाण व श्रीनिवास पाटील यांच्यासोबत नेहमीच आमदार जयंत पाटील यांच्यासह वाळवा तालुका एकनिष्ठेने राहिला आहे. राजकीय संघर्षांच्या परिस्थितीत नेहमी वाळवा तालुक्याने कराडसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आणि यामध्ये जयंत पाटील यांचे मोठे योगदान आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्येही आमदार जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असते, सत्तांतर करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाली, म्हणजे कराडचाही सन्मान झाला असे एकार्थाने म्हणता येईल.
कराडशी जयंत पाटील यांचा जुना स्नेहबंध व आपुलकीचे नाते आहे. म्हणूनच आमदार जयंत पाटील हे वाळव्यातून निवडून येत असले तरी, कराडकरांना जयंत पाटील आपलेसे वाटतात. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रावर भक्कमपणे उभे करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देणे आवश्यक आहे. आणि येणाऱया लोकसभा व विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळवून देण्यासाठी जयंत पाटील यांना काम करावे लागेल. हे मात्र निश्चित. राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलनामुळे जयंत पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आहे. आणि त्यांची ओळख महाराष्ट्रभर झाली आहे. गतकाळातील मंत्रिपद भूषवताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून समाजहिताचे निर्णय घेतलेले आहेत. आता प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांना बरासचा वेळ पक्षासाठी द्यावा लागणार आहे. राज्यात सत्तांतर करून राष्ट्रवादीला सत्तेपर्यंत पोचविण्याचे काम जयंत पाटील यांना करावयाचे आहे.
गोरख तावरे,
कराड - 9326711721

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा