शेतकऱ्यांनी सोनालिका ट्रॅक्टरला पसंती - कुलदीप पारीख व्ही. जी. थोरात एजन्सीचे शेतकऱ्यांच्या मनामध्ये भक्कम स्थान



कराड  (लक्ष्मीपुत्र) - शेतकऱ्यांनी सोनालिका ट्रॅक्टरला पसंती दिल्याने 2017-18 मध्ये सोनालिका सोनालिका कंपनीचे 1 लाख ट्रॅक्टर वितरीत केले आहेत असे कंपनीचे एरिया मॅनेजर कुलदीप पारीख म्हणाले.

सोनालिका कंपनीचे डेमोस्टेटर जुबेर मुल्ला, उदय थोरात, किरण थोरात, पत्रकार गोरख तावरे, सतीश मोरे, सचिन देशमुख,शशिकांत पाटील, प्रमोद सुकरे,विकास भोसले,संभाजी थोरात, प्रकाश पिसाळ, माणिक डोंगरे, वैभव पाटील, आकाश सोरटे, शंकर गोडसे यांची उपस्थिती होती.आजअखेर व्ही. जी. थोरात एजन्सीने शेतकऱ्यांच्या मनामध्ये भक्कम असे स्थान निर्माण केलेले आहे. सर्वोत्तम सेवा व संतुष्ट ग्राहक हेच आमचे ध्येय असलेने व्ही. जी. थोरात एजन्सीने शेतकऱ्यांची एजन्सी आहे.

अल्पावधीत उद्योजक उदय थोरात यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. सत्याची कास धरून उदय थोरात करत असलेल्या शेतकरी हिताचे कामांना यश प्राप्त झाले आहेत. असे मनोगत पत्रकार सतीश मोरे यांनी व्यक्त केले. शेतकरी डोळ्यासमोर ठेवून उदय थोरात यांनी शेतकर्यांना उपयुक्त असे ट्रॅक्टरसहीत इतर साधन यंत्रांचा उद्योग सुरू करून यामध्ये धवल यश संपादन केले यासाठी उदय थोरात यांची व्यवसायाप्रती चिकाटी, कष्ट करण्याची तयारी, प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. असे कौतुक उद्गार पत्रकार प्रमोद सुकरे यांनी काढले.

ऑगस्ट 2017 पासून मार्च 2018 पर्यंत सोनालिका ट्रॅक्टर व मल्टिक्स गाडी खरेदी करा व जिंका मोटार सायकल/सोने/टी. व्ही/फ्रीज/लॅपटॉप/वॉशिंगं मशीन/पिठाची गिरणी व पैठणी साडी ही योजना आयोजित केलेली होती. या योजनेस शेतकरी वर्गातून उत्तम असा प्रतिसाद मिळाला.

सदर योजनेचा लकी ड्रॉ सोडत समारंभ आयोजिय केला होता. सदर ड्रॉ मधुन विजेते ठरले. प्रभावती प्रतापराव पाटील ( रा. रेठरे ), जहांगीर रमजान इनामदार (रा. अमनापूर), अशोक महादेव पाळेकर (रा. गारवडे), विलास दिनकर यादव (रा. कडेपुर), भागवत बी. गायकवाड (रा. कराड), पांडुरंग नलवडे (रा. नाडे), बाबासो विठोबा येडके (रा. वांगी), जयंत गोविंद चाफेकर (रा. देवराट्रे), कमल दिनकर सावंत (रा. साखरी), दिलीप प्रताप चव्हाण (रा कोनेगाव), संदीप निवृत्ती जगदाळे (रा. अंबक) चांगदेव गणपती शिंदे (रा. शाळगाव) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.