शिवसेनेमुळे कराडचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी

शिवसेनेचे दोन मंत्री कराड शहरात येऊन गेल्याने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री विजयबापू शिवतारे व परिवहन मंत्री दिवाकर रावते हे कराड दौऱयावर आले होते. या मंत्र्यांच्या दौर्यामुळे कराडमधील प्रलंबित कामे मार्गी लागली आहेत. कराड विमानतळ विस्तारिकरणाला गती देण्याचे आदेश मंत्री विजय शिवतारे यांनी दिले आहेत. तर येत्या तीन महिन्यांमध्ये कराड एसटी बसस्थानकांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. अशी हमी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.कराडच्या दृष्टीने हे दोन महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागत असल्याचे निदर्शनास आल्याने कराड तालुक्यात शिवसेनेबद्दल सकारात्मक भूमिका व्यक्त केली जात आहे. मंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशानुसार आता सातारा - सांगली संपर्क नेते नितीन बानुगडे पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी लक्ष घालून कामांना गती देणे आवश्यक आहे. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा झंझावात आणण्यासाठी शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी कराडमध्ये बैठक घेऊन नियोजन केले आहे.

कराड विमानतळ विस्तारीकरणातील बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केला जात आहे. यासाठी प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी बाधितांची बैठक घेतलेली आहे. विमान विस्तारीकरणामध्ये 28 बाधित खातेदारांशी बैठक झाली आहे. पुनर्वसन पॅकेजसंदर्भात माहिती दिली आहे. 28 बाधित खातेदारांी सकारात्मक भूमिका आहे ज्यांची जमीन विमान विस्तारीकरणाला जात आहे. त्यांना त्या मोबदल्यात काय फायदे होणार आहेत. शासनाने कोणती व कशी पद्धतीने आर्थिक तरतूद केली आहे. हे बाधितांना पटवून दिले गेले आहे. बाधितांनीही शासन देत असलेल्या सवलत व मोबदल्याबद्दल सकारात्मकता दर्शवली आहे. दरम्यान विमान विस्तारीकरण कृती समिती यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. विमान विस्तारीकरणाला अल्प प्रमाणात जमीन जात आहे. बाधित खातेदार शासनास सहकार्य करण्यास तयार आहेत. दरम्यान ज्यांना कृती समिती स्थापन करून राजकारण करायचे आहे तेच अधिक आक्रमकता दाखवून विमान विस्तारीकरणाचा प्रश्न सुटू नये, अशी भूमिका घेत आहेत. कारण त्यांची एक इंचभरही जमीन या प्रकल्पांमध्ये जात नाही. सदरचा प्रश्‍न मार्गी लावून विस्तारीकरणाच्या कामाला गती येत आहे. त्याचबरोबर नाईट लॅंडीगची सोय करावी. अशी सूचना विजयबापू शिवतारे यांनी केली आहे.

कराडमध्ये असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये मठाधिपती पदावरून वाद निर्माण झाला आहे. कराडकर मठाचे विश्‍वस्ताच्या वादासंदर्भात मठाधिपती बाजीरावमामा कराडकर यांनी मंत्री विजय शिवतारे यांची भेट घेवुन विश्वस्तांची चाललेली मनमानी व गैर कारभाराचा पाढाच मंत्री विजयबापु शिवतारे यांचेपुढे वाचलेला आहे. बाजीरावमामा कराडकर यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहिलेली आहे. त्यांच्यासमवेत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामभाऊ रैनाक, शशिकांत हापसे, प्रमोद तोडकर, रणजित पाटील आवश्यक ती सर्व मदत करित आहेत. तसेच समाजातून व वारकरी संप्रदाय समुह बाजीरावमामा कराडकर यांना मठाधीपती म्हणून मान्यता देत आहेत. सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे घेतल्यापासून विजयबापू शिवतारे यांनी सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अनेक विकासकामांसाठी निधी दिलेला आहे. आगामी काळात कराडमध्ये शिवसेना व शासनाचे कार्यक्रम घेऊन आपण संपर्क वाढवणार असल्याचेही मंत्री विजयबापू शिवतारे यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. जलसंपदा मंत्री विजयबापू शिवतारे यांनी कराड येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या जागेचा एक प्रश्‍न मार्गी लावला आहे.

मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण असताना गतकाळात त्यांनी कराडमध्ये अनेक विकास कामे उभी केली. यापैकी कराड बसस्थानकाचा प्रश्न मध्यंतरीच्या काळामध्ये रेंगाळला होता. यामुळे प्रवाशांची फार गैरसोय होत होती हे निदर्शनास आल्यानंतर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याशी सल्ला मसलत करून कराड बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली होती. यानुसार दिवाकर रावतेंनी यामध्ये लक्ष घालून सदरचे काम मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर सकारात्मक प्रयत्न केला आणि याचाच भाग म्हणून नुकतेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कराड एसटी बसस्थानकाला भेट देऊन सदर कामाची पाहणी केलेली आहे. कराड बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले असून काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. ते झाल्यानंतर येत्या तीन महिन्यांमध्ये कराड बसस्थानकाचे शानदार उद्घाटन करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे जाग्यावर कामाचा निपटारा करण्याचे काम पाहून अनेकांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा कराड दौरा फलदायी झाला असे म्हणता येईल. कारण अनेक शिवसैनिकांनी भेटून प्रलंबित कामांची माहिती दिली आहे. राज्यातील सरकारने एसटी महामंडळाच्या एसटी बसस्थानकाच्या बांधकामाच्या अनुषंगाने काही निर्णयात बदल केल्याने कराड बसस्थानकाचे काम लांबणीवर पडले होते. दरम्यान माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड बसस्थानकाचे काम तातडीने मार्गी लावणयाची  विनंती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती याची दखल घेऊन सदर कामाला गती देण्यात आली आहे. कराड बसस्थानक सुरू झाल्यानंतर अनेकांची अडचण दुर होणार आहे. दरम्यान या निमित्ताने काम लांबणीवर पडल्यानंतर अनेकांनी यात राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. असा नाराजीचा सूर प्रवासी वर्गातून व्यक्त केला जात आहे.

गतकाळातील काँग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारपेक्षा सध्याच्या शिवसेना - भाजपा युती सरकारचे काम तुलनेने चांगले व गतिमान आहे. अशी प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त केला जात आहेत. गेल्या ४ वर्षांत राज्यातील सर्व बस स्थानकांचे रूपडे पालटण्याचे दृष्टीने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काही कठोर निर्णय घेतले आहेत. आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे. याचा फायदा विशेषता प्रवासी वर्गाला होणार आहे. राज्यातील बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाच्यावतीने केला जात असल्याचे मंत्री दिवाकर रावते यांनी कराडमध्ये सांगितलेले आहेत.

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याच्या शिवसेना संपर्क नेतेपदी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची निवड झाल्यानंतर त्यांनी प्रथमच कराड येथे तिन जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिवसेनेच्या आगामी काळातील निवडणुकीचे अनुशंघाने प्रमुख कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून नियोजन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये घर तिथे शिवसेना व शिवसैनिक ही संकल्पना रुजली आहे. यामुळे आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला यश मिळावे यासाठी मंत्री दिवाकर रावते बैठका घेवून नियोजन करीत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर प्रेम करणारे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वावर विश्वास असणारे बहुसंख्य कार्यकर्ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. या सर्व कार्यकर्त्यांचे योग्य संघटन व समन्वय साधला गेला तर आगामी काळात पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला चांगले यश मिळू शकते, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. शिवसेनेचे मंत्री यांचा संपर्क वाढल्याने कराड तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लागले जात आहेत.

पाटण तालुक्यात शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले असून मोठ्या प्रमाणात विकासासाठी राज्य शासनाकडून निधी आणलेला आहे. तर शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्या सौभाग्यवती धनश्री कदम या मल्हारपेठ ग्रामपंचायतीच्या शिवसेनेच्या सरपंच म्हणून विराजमान झालेल्या आहेत. हर्षद कदम यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या विधानसभा मतदार संघासाठी हर्षद कदम शिवसेनेच्या वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर सातारा, सांगली जिल्ह्याचे संपर्क नेते नितीन बानुगडे पाटील दोन्ही जिल्ह्य़ांमध्ये शिवसेना भक्कमपणे बांधण्याचे काम करीत आहेत. शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम, शिवसेना संपर्क नेते नितीन बानुगडे पाटील यांचा विविध कारणास्तव कराडची सातत्याने संपर्क येत असतो. यामुळे शिवसेनेचे सुरू असलेले सातारा जिल्ह्यातील घोडदौड कशा पद्धतीने सुरु आहे. यांची माहिती माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.