इंदुर अभ्यास सहल हा दीर्घकाळ स्मरणात राहणारा सहवास


स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात प्रथम आलेल्या इंदूर या शहरास कराड नगरपालिकेच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट दिली आहे. आपले कराड स्वच्छ व सुंदर असावे यासाठी गेलेल्या शिष्टमंडळातील लोकांनी पाहणी करून अभ्यास दौरा करून आलेले आहेत. इंदूरमधिल
पाहून आलेल्या अनेक गोष्टी आपल्याकडे नाहीत त्या परिपूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न व्हावा हीच एक अपेक्षा या दृष्टीने कराडमधील सामाजिक कार्यकर्ते सुधीर एकांडे यांनी थोडक्यात घेतलेला मागोवा. . . . . .

कराड ते इंदुर या लांब पल्ल्याच्या प्रवासात कोणालाही कसलाही ञास होणार नाही कंटाळा येणार नाही याची सर्वंकश काळजी घेत मुख्याधिकारी मा.यशवंत डांगे यांनी केलेले नेटके नियोजन....

महिला सदस्यांचा सुरक्षित वावर,
पुरुष सदस्यांवरची आवश्यक ती बंधने,चर्चेचा व संवादाचा उत्तम दर्जा,दिलखुलास करमणूक, चहा पाण्यापासुन ब्रेकफास्ट,भोजन व निवास व्यवस्था दर्जेदार...

जाता - जाता मोरगावचा मोरेश्वर शिर्डीचे साईबाबा,महेश्वर, ओंकारेश्वर,उज्जैनचा महाकालेश्वर,रांजणगावचा सिध्दिविनायक,महाराष्र्टाचा अभिमान असलेल्या पुण्यश्लोक
अहिल्याबाई होळकर यांची समाधी दर्शनाने एक वेगळीच उर्जा मिळाली.प्रवासातील विविध ठिकाणच्या तपशिलवार माहीतीमुळे सर्वांच्या भौगोलीक व ऐतिहासिक ज्ञानात भर पडली.

स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम आलेल्या इंदुर शहराच्या पहाणीत
घराघरातुन केले जाणारे कचरा व्यवस्थापन,वर्गिकरण व वापर, सिवेज ट्रिटमेंट प्लांट,खत निर्मिती प्रकल्प,बायोगॅस प्रकल्प या सर्व उत्तम प्रतिच्या व नियोजनबध्द यंञणांच्या पहाणीतुन ज्ञानात नक्किच भर पडली. शहरातील सर्व रस्त्यांना लागुन पादचारी मार्ग व त्याला लागुन सर्व्हीस रोडवरील  विविध वृक्षांचे संवर्धन व जतन तसेच शहरातील चौकाचौकांचे केलेले  सुशोभिकरण लक्ष वेधुन घेत होते.सार्वजनिक वापरासाठी ठिकठिकाणी उभारलेल्या शौचालयामुळे सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेचे भान ठेवलेले दिसले.पालिकेच्या उत्तम व लीन व्यवस्थापनामुळे नागरीकांचाही स्वच्छ सर्वेक्षणात उस्फुर्त सहभाग
असल्याचे जाणवले.

जेष्ठ नगरसेवक विनायकअण्णा पावसकर,आरोग्य सभापती सौ.प्रियांका यादव,माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव, माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर,सौ.स्मिता हुलवान, आशा मुळे,सौ.विद्या पावसकर,सौ.अंजली कुंभार,बाळासाहेब यादव व गजेंद्र कांबळे या सर्व लोकप्रतिनिधींबरोबरच नगर पालिकेचे अधिकारी,कर्मचारी पञकार व विविध संस्थांच्या प्रतिनिधींचा या अभ्यास दौर्‍यातील सहभाग अत्यंत चौकस व गंभीर होता हे विशेष नमुद करावेसे वाटते.

जवळपास तीन हजार किलोमीटर चा हा खडतर प्रवास सुधीर  एकांडे,अॅड.संभाजी मोहिते, आर.डी. भालदार,जालिंदर काशिद,रमेश पवार, संजय लादे, ओझा,स्मिताताई,विद्याताई, देवानंद जगताप,काटरे,देवदास मुळे,सचिन देशमुख,प्रमोद सुकरे,आनंद पाटील....आणि कर्णधार डांगे साहेबांच्या विविध सर्वकश सहभागामुळे सुसह्य झाला.

चला तर नव्या विचाराने नव्या जोमाने मिळविलेल्या ज्ञानाचा व दृष्टीचा उपयोग करुन आपल्या कराडला स्वच्छ सर्वेक्षण २०१९ ला पहिल्या पाच क्रमांकात आणू

सुधीर एकांडे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.