100 टीएमसी हून अधिक पाणीसाठा झालेल्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते ओटी भरण व जलपुजन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
100 टीएमसी हून अधिक पाणीसाठा झालेल्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते ओटी भरण व जलपुजन
कराड दि.१4 ( लक्ष्मीपुत्र ) - महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणा-या कोयना धरणातील शिवसागर जलाशयामध्ये 14 ऑगस्टला १०१.१३ टीएमसी पाणीसाठा झाला असून 100 टीएमसी हून अधिक पाणीसाठा झालेल्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे ओटीभरण व जलपुजन आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते करण्यात आले.धरणातील शिवसागर जलाशयाचे ओटीभरण व जलपुजन केल्यानंतर लगेचच धरणाच्या सहा वक्र दरवाज्यातून आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते एकूण १९०४१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला.
कोयना धरण बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, याप्रसंगी उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, यांची प्रमुख उपस्थिती होती.जलपुजन कार्यक्रमानंतर आमदार शंभूराज देसाई यांनी कोयना धरण प्रकल्पाचे अधिका-यांसमवेत कोयनानगर येथे बैठक घेतली.
प्रतिवर्षी 15 ऑगस्टला 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा पुर्ण करणा-या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये दि.14 ऑगस्टला सकाळीच 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा ओलाडूंन १०१.१३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे .यंदा १५ दिवस अगोदर परंपरेनुसार कोयना धरणाच्या भिंतीच्या आतील बाजूस आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते कोयना शिवसागर जलाशयाचे विधिवत पुजन करण्यात आले व त्यानंतर आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते व त्यांचे सोबत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जलाशयात खणनारळाची ओटी सोडून जलाशयाचे पुजन व ओटीभरण करण्यात आले.
आमदार शंभूराज देसाई म्हणाले, प्रतिवर्षी 15 ऑगस्टला 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा पुर्ण होतो गतवर्षीच १०० टीएमसी पाणीसाठा होणेकरीता ३० ऑगस्ट पर्यंत कालावधी लागला होता. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस १५ दिवस अगोदर कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाने आज सकाळपर्यंत १०० हुन अधिक पाणीसाठयाचा टप्पा ओलांडून आतापर्यंत कोयना धरणात १०१.१३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.१०० टीएमसी पाणीसाठा झालेनंतर प्रतिवर्षी परंपरेनुसार कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे जलपुजन व ओटीभरण करण्याची पंरपरा आहे.राज्यातील सर्वात मोठया आपले कोयना धरणातील जलाशयाचे जलपुजन व ओटीभरण करण्याची संधी मला गेली चार वर्षे मिळत आहे.कोयना धरण बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर,कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, उपअभियंता मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी व व्यवस्थापन कोयना धरणाच्या संदर्भात २४ तास कार्यरत आहेत.
कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीकाठच्या गांवामध्ये दक्षता घेण्याचे कार्य उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले हे अधिकारी व त्यांच्या देखरेखीखाली महसूल प्रशासन कार्यरत आहे. कोयना धरणातील पाण्यामुळे अवघा महाराष्ट्र प्रकाशमान होत असून शेतीकरीताही या पाण्याचा चांगला वापर होत असतो.
शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,धोंडीराम भोमकर, माजी पंचायत समिती सदस्य हरीश भोमकर,संचालक बबनराव भिसे,प्रदीप पाटील,शैलेंद्र शेलार,दिलीप सकपाळ या प्रमुख पदाधिकारी व कोयना धरण व्यवस्थापनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होति.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा