कराड विमानतळ विस्तारिकरणाला गती द्या - विजय शिवतारे कराडच्या पत्रकारांच्यावतीने मंत्री विजय शिवतारे यांचा सत्कार
कराड दि.११ (लक्ष्मीपुत्र) - कराड विमानतळ विस्तारीकरणातील बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून विमानतळ विस्तारीकरणाला गती द्या, अशा सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आज कराडच्या प्रांताधिकाऱ्यांना केली.
श्री विठ्ठल रूक्मिणी समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी श्री.विजय शिवतारे यांची भेट घेवून स्वागत केले.सातारा जिल्हय़ाचे पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांचा कराडच्या पत्रकारांच्यावतीने सत्कार करण्यात आला.दैनिक लोकसत्ताचे प्रतिनिधी विजय पाटील, दैनिक सामनाचे प्रतिनिधी गोरख तावरे, दैनिक सकाळचे प्रतिनिधी हेमंत पवार,दैनिक सकाळचे प्रतिनिधी सचिन देशमुख, मुक्त पत्रकार प्रमोद तोडकर उपस्थित होते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा