कराड उत्तरची कासवगतीने; तर दक्षिणची हालचाल गतीमान
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सातारा जिल्ह्यात दोन विधानसभा मतदारसंघ असणारा कराड तालुका हा एकमेव तालुका आहे. कराड दक्षिण व कराड उत्तर अशी या विधानसभा मतदारसंघाची विभागणी झालेली आहे. उत्तर मतदार संघापेक्षा कराड दक्षिण मतदारसंघात राजकीय हालचाली नेहमीच जोरदारपणे सुरू असतात. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण गटातील टोकाचे मतभेद सर्वश्रूत आहेत. कराड उत्तरमध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात मनोज घोरपडे व धैर्यशील कदम सातत्याने धडका देत आहेत.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ तीन तालुक्यांमध्ये विभागलेला मतदार संघ आहे. कराड, कोरेगाव, सातारा या तालुक्यांचा समावेश या मतदार संघात आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय आदरणीय पी. डी. पाटील यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या वीस वर्षांपासून आमदार बाळासाहेब पाटील हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. कराड उत्तर मतदार संघात राजकीय संघर्ष आहे. पण तो अतिशय टोकाला कधीही जात नाही. ठराविक मर्यादेपर्यंत आरोप - प्रत्यारोप होतात, प्रश्नाला उत्तर दिले जाते दरम्यान भाषेची पातळी सोडली जात नाही. कारण यशवंतराव चव्हाण व पी. डी. पाटील यांचा वारसा या मतदार संघाला आहे. याचे भान सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधी गटाला आहे. हे या मतदारसंघाचा चांगुलपणा आहे. काँग्रेस पक्षाच्यावतीने धैर्यशील कदम व भारतीय जनता पक्षाच्यावतीने मनोज घोरपडे हे आमदारकी मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. दरम्यान गेल्या वीस वर्षांमध्ये या ठिकाणचे मतदार आमदार बाळासाहेब यांचे नेतृत्व स्वीकारीत आहेत.
कराड उत्तरमध्ये असणारे सातारा - सांगली जिल्ह्याचे शिवसेना संपर्क नेते नितीन बानुगडे पाटील यांची नुकतीच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात अनेक सिंचनाची कामे खोळंबली आहेत. यासाठी निधीची आवश्यकता आहे. वास्तविक पाहता शिवसेनेचे संपर्क नेते नितीन बानुगडे पाटील अपुरी कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतील अशी आशा निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्याने शिवसेनेला आतापर्यंत एक खासदार, दोन आमदार दिले आहेत. यापैकी पाटण मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई आहेत. सातारा, सांगली जिल्ह्यात शिवसेना भक्कमपणे बांधण्याचे काम नितीन बानुगडे पाटील यांनी उत्कृष्टपणे केले आहे. ओघवत्या वाणीतून आणि आपल्या वैशिष्टय़पूर्ण भाषेमधुन त्यांनी अनेकांना शिवसेनेकडे आकृष्ट करण्यास भाग पाडलेले आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद मिळाल्याने आता नितीन बानुगडे पाटील पश्चिम महाराष्ट्रातील सिंचनाची कामे मार्गी लावतील. कारण गतकाळात शिवसेना - भाजप युती सरकार असतानाच कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे. यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेकडे हे उपाध्यक्षपद आलेले आहे.
कराड दक्षिणमध्ये पस्तीस वर्षांच्या कार्यकर्तीला पूर्णविराम देऊन गतकालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण मतदारसंघ काबीज केला आहे. दरम्यान पस्तीस वर्षे मतदारसंघावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील उंडाळकर यांनी पराभव स्वीकारला दरम्यान काँग्रेसची नाळ सोडलेली नाही. यामुळे जनसंघर्ष यात्रेचे कराडमध्ये स्वागत झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी कराडचे पत्रकारांनी सुसंवाद साधल्यानंतर हा विषय छेडला होता. आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एकत्रित निर्णय घ्यावा याला माझी संमती असेल असे अशोक चव्हाण यांनी पत्रकारांना संगितले आहे. विलासकाका पाटील यांच्या जीवनावर सद्भावना व्यक्त करणारे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्याचे नाव "भगीरथ" असे आहे. याचा नुकताच एक समारंभ झाला आहे. मात्र जनसंघर्ष यात्रा कराडमध्ये येऊनही विलासकाका पाटील या जनसंघर्ष यात्रेकडे फिरकलेले नाहीत. याचा अर्थ सन्मानाने बोलवाल तर मी नक्की येईन अथवा स्वाभिमान गहान टाहून येणार नाही अशी एकंदरीत विलासकाका पाटील यांची मनोभूमिका दिसून येत आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले कराड दक्षिण मतदारसंघातील एक युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि आता भारतीय जनता पार्टीतून सक्रिय असणारे डॉ. अतुल भोसले राज्य शासनाकडून विविध विकासकामांसाठी निधी घेऊन येत आहेत. काहीही करून यावेळी कराड दक्षिणमधील आमदारकी आपण मिळवायचीच असा चंग डॉ. अतुल भोसले यांनी बांधला असून या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे. मलकापूर नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. ही नगरपंचायत पृथ्वीराज चव्हाण गटाकडे म्हणजे मनोहर शिंदे यांच्याकडे आहे. मलकापुर नगरपंचायत आपल्या ताब्यात घेवुन ती भाजपाला देण्याचा चंग डॉ. अतुल भोसले यांनी मनस्वी बांधला आहे. राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे सातारा जिल्ह्यात सर्वाधिक मंत्र्यांचे कार्यक्रम हे कराड दक्षिणमध्ये होत आहेत. कराड दक्षिणमध्ये अनेक गट - तट असून अनेक नेत्यांची मांदियाळी या भागामध्ये आहे. मोहिते - भोसले गट कारखान्याच्या निवडणुकीत असतो तर यांच्या विरोधात अविनाश मोहिते गट कार्यरत आहे. पृथ्वीराज चव्हाण, विलासकाका पाटील, अतुल भोसले या प्रत्येक नेत्यांचा एक राजकीय गट कराड दक्षिणमध्ये कार्यरत आहे.
कराड उत्तरची राजकीय हालचाल ही कासवगतीने असते तर कराड दक्षिणची वाटचाल ही रेसमधील घोड्याप्रमाणे सुरू असते. वसा व वारसाला उत्तरची जनता प्रतिसाद देतात तर गुलाल खोबरे तिकडे चांगभले असे दक्षिणची मानसिकता आहे. म्हणूनच पस्तीस वर्ष एक खंबी काँग्रेसचा मतदारसंघ राखणाऱ्या ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील यांना नाकारून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. तर आदरणीय पी. डी. पाटील यांच्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील यांचे नेतृत्व निर्विवादपणे स्वीकारलेले आहे. जनसंघर्ष यात्रा कराड शहरात आली मात्र याचा मागमूसही कराड उत्तरचा लागला नाही. आमदार बाळासाहेब पाटील हे सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या वार्षिक सभा व कार्यकर्त्यांच्या बैठका, राष्ट्रवादीची बांधणी यात कार्यमग्न आहेत. विरोधकांच्या हालचाली पेक्षा आपला भक्कम पाया करण्यातच उत्तरचे लोकप्रतिनिधी कार्यरत असतात. तर कराड दक्षिणमध्ये विरोधकांना उकडून सत्ता हस्तगत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतो.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा