"सह्याद्री"निवडणूक प्रचाराला वेग
दैनिक सामना 13/3/2015-गोरख तावरे
"सह्याद्री"निवडणूक प्रचाराला वेग
कराड दि.11(सावा)सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आदरणीय पी.डी.पाटील पॅनेलला म्हणजे सत्ताधारी गटाला ‘कपबशी’ तर यशवंतराव चव्हाण शेतकरी पॅनेलला ‘विमान’ चिन्ह मिळाले आहे.सत्ताधारी व विरोधकांनी प्रचार सभांवर जोर दिला आहे. १७ मार्चला मतदान व 19 मार्चला निकाल लागणार आहे.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील हे शांत व संयमाने प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.
साखर कारखान्यांची निवडणूक असूनही दोन्ही बाजूने आक्रमक प्रचार केला जात नाही पण आपली भूमिका व शेकत-यांचे हित कसे पाहतो ?हे मुद्दे सभासदांपर्यंत कसे पोहचतील हे पाहिले जात आहे.आ. बाळाहेब पाटील यांचे पारंपारीक विरोधक पहिल्यांना एकत्र आले आहेत. प्रस्थापितांविरोधात दंड थोपटणारांमध्ये धैर्यशील कदक,मनोज घोरपडे,विठ्ठतात्या जाधव आणि लालासाहेब यादव हे चार नेते सह्याद्रीचे कार्यक्षेत्रात प्रचारसभांच्या माध्यमातून भूमिका मांडत आहेत.
पी.डी.पाटील पॅनेलला आमदार बाळासाहेब पाटील यांचा चेहरा आहे तर यशवंतराव चव्हाण पॅनेलला सामुदायीक नेतृत्व आहे.कराड दक्षिणचे माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर समर्थकांनीही यामध्ये सहभाग घेतला आहे.मात्र नेहमी राजकारणात व कोणत्याही निवडणूकीबाबत विलासकांकाच्या राजकीय खेळींचा बोलबाला असतो यावेळी मात्र त्यांची चर्चाच नाही.
विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक करणारे बाळासाहेब पाटील यांचा "सह्याद्री"कार्यक्षेत्रात आज ही करिश्मा कायम आहे. ‘सह्याद्री’च्या निवडणुकीत "साखर"प्रश्नापेक्षा हुकुमशाही,ऐकाधिकारशाही यावर बोलले जात आहे."कृष्णा" कारखाना दोन रुपये किलो दराने साखर सभासदांना देतो मग सह्याद्रीत कधी मिळणार ? असा सवाल विरोधक करीत आहेत.ऊसतोडणी प्रोग्रॅम काॅप्युटरप्रमाणे होतो यात फेरफार करता येत नाही.यामुळे डावे-उजवे किवा जवळचा लांबचा असा भेदभाव होवू शकत नाही.यामुळे विरोधकांच्या उपस्थित प्रश्नांना सत्ताधाऱी गटातर्फे आमदार बाळासाहेब पाटील उत्तरे देत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा