महाराष्ट्राला गरज स्वतंत्र पत्रकारिता विद्यापीठाची
पत्रकारितेचे सर्वोच्च शिक्षण घेवून या क्षेत्रात प्राध्यापक म्हणून काम करणारे अनेक इच्छुक तरुण या महाराष्ट्रात आहेत. पत्रकारितेचा अभ्यासक्रम चालवानारे १९ विद्यापीठ महाराष्ट्रात उपलब्ध आहेत, या विद्यापीठांच्या अंतर्गत शंभरपेक्षा अधिक महाविद्यालये आणि अभ्यासकेंद्रतुन पत्रकारिता पदविका,पदवी आणि पदविवोत्तर स्तरावरचे शिक्षण दिले जाते. विद्यापीठातील पत्रकारिता शिक्षण अभ्यासक्रमास अनुदान आहे, परंतू राज्यातील १९ विद्यापीठा अंतर्गत पत्रकारिता अभ्यासक्रम चालवणाऱ्या महाविद्यालयांना अनुदान उपलब्द नाही. तंत्र विद्यापीठ,कृषी विद्यापीठ,कायदा (लॉ) विद्यापीठ,आरोग्य विज्ञान विद्यापीठ यासह महाराष्ट्रामध्ये पत्रकारितेचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात “दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर
पत्रकारिता विद्यापीठ” स्थापन व्हावे यासाठी महाराष्ट्रातील विविध पत्रकार संघटनांनी अनेक वेळा शासनाकडे मागणी केली आहे. पत्रकारितेतील अभ्यासक्रमाचा दर्जा उंचावण्यासाठी, पत्रकारिता शिकणाऱ्या विद्यार्थ्याना तसेच माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकाराना उच्च शिक्षणाची संधी निर्माण होण्यासाठी, महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्र सृष्ठीचे आध्य जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने “ पत्रकारिता विद्यापीठ “सुरु झाले पाहिजे अशी मागणी जर्नालीस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र यांनी, मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, विद्यापीठाच्या स्थापनेची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील पत्रकारीतेचे विविध पैलू, संशोधन व प्रशिक्षण या सर्व मुद्द्यांचा विचार करता महाराष्ट्रामध्ये “ पत्रकारिता विद्यापीठ “स्थापन झाले पाहिजे हि काळाची गरज आहे. अन्य राज्यात पत्रकारिता विध्यापीठे सुरु आहेत, महाराष्ट्र तर सर्व संपन्न असा प्रदेश आहे. मध्यप्रदेशात भोपाळ इथे “माखनलाल चतुर्वेदी “ पत्रकारिता विश्वविध्यालय स्थापन केले आहे,या विश्वविध्यालयाने पत्रकारिता क्षेत्रात आपले नावलौकिक निर्माण केला आहे.

सध्या आपल्याकडे अनेक विश्वविद्यालयांमध्ये पत्रकारित!, मास कम्युनिकेशन शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे, परंतु महाविद्यालय स्तरावर या अभ्यासक्रमाला अनुदान नसल्याने अनेक तालुका आणि जिल्हा पातळीवर अत्याधुनिक सोयी सुविधांचा अभाव आहे, त्यामुळे इच्छुक विध्यार्थ्यांना या शिक्षणासाठी अन्य ठिकाणी जावे लागते. स्वतंत्र विद्यापीठ सुरु झाल्यास इथल्या पत्रकारिता विध्यार्थ्यांना अनेक सोयी-सुविधांचा लाभ मिळू शकतो. या विद्यापीठाचे नाव “दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर”असेच ठेवले पाहिजे कारण जांभेकर हे मराठी वृतपत्र सृष्ठीचे जनक आहेत.
याचबरोबर, महाराष्ट्रामध्ये “प्रेस अकादमी” स्थापन
झाली पाहिजे. व्यावसायिकतेच्या दृष्टीकोनातून
पत्रकारांना समृद्ध करणे तसेच त्यांना आधुनिक
ज्ञानाची माहिती मिळावी याकरिता “प्रेस अकादमी” असणे महत्वाचे आहे.नजीकच्या आंध्र प्रदेश राज्यात “प्रेस अकादमी”सुरु आहे.या प्रेस अकादमीच्या माध्यमातून पत्रकारांना जागतिक स्तरावरील माहिती उपलब्ध होईल,संदर्भग्रंथ मिळू शकतात तसेच नवोदित पत्रकारांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करता येतील.अशा प्रेस अकादमीच्या स्थापनेसाठी गेली २-३ वर्षापासून मागणी होत आहे. परंतु शासन या मागणीकडे लक्ष देत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. १९९२ मध्ये नाशिकक येथे शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेली “press institute”लाखो रुपये खर्च करून आजपर्यंत ही संस्था धुळखात पडून आहे त्यामुळे जनतेचा पैसा वाया जाऊ लागला आहे,त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले, साधी चौकशी सुद्धा केली नाही. दिवसेंदिवस वृत्तपत्राचे प्रमाण वाढत आहे,तशी पत्रकारांची संख्याही वाढत चालली आहे, त्यामुळे पत्रकारांचे प्रश्न, अडी-अडचणी अधिकाधिक निर्माण होत आहेत,कंत्राटी पद्धतीमुळे पत्रकारांच्या भविष्यातील कामाची कोणतीच हमी उरली नाही. राज्य शासनाने अशा वर्गाला “राष्ट्रीय असंघटीत कामगार” कायद्यानुसार लाभधारक ठरवून सामाजिक सुरक्षेचे सर्व लाभ घेण्यास पात्र म्हणून घोषित केल्यास राज्यातील पत्रकारांना दिलासा निर्माण होईल.

-सचिन भांडे (पत्रकार)
8087975467
8087975467
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा