"सह्याद्री"च्या गुलालानंतर "कृष्णा"ची रणधुमाळी सुरू
सामना - 25/3/2015
(गोरख तावरे)
कराड उत्तरमधील "सह्याद्री"सहकारी साखर कारखान्याची सत्ता आमदार बाळासाहेब पाटील यांच्याच हाती कायम ठेवण्याचा निर्णय शेतकरी सभासदानी घेतला आहे."सह्याद्री"चा गुलाल हे बेरजेच्या राजकारणाचा व यशवंतराव चव्हाण व पी.डी.पाटील यांच्यासह आमदार बाळासाहेब पाटील नेतृत्वावरील विश्वास आहे.दरम्यान दक्षिणमधील "कृष्णा"साखर कारखान्याची रणधुमाळी सुरू झाली आहे.गटा-तटात व सग्यासोय-यातील आता धुमचक्री सुरू होणार आहे.सत्ताधारी अविनाश मोहिते असून मदनदादा माहिते,डाॅ.इंद्रजीत मोहिते आणि डाॅ.अतुल भोसले,माजी आमदार विलासकाका पाटील अशा तीन पॅनेलमध्ये सत्ता संघर्ष होण्याची शक्यता आहे.
"सह्याद्री" शांत झाला असून यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा बिगुल वाजला आहे. तिरंगी लढत निश्चित मानली जात आहे. यासाठी कराड, वाळवा, शिराळा, कडेगाव, पलूस या तालुक्यांतील कार्यक्षेत्रातील राजकीय घडामोडी गतीमान झाल्या आहेत.भौगोलीक परिस्थिती विभिन्न् असली तरी शेतकरी सभासदांच्या हितासाठी आमदार व ताकदवान राजकीय नेते "कृष्णा"च्या आखाड्यात उतरत असतात. तिन्ही पॅनेल प्रमुखांच्या पाठीशी पाच तालुक्यातील कोणते नेते उभे राहणार हे येणा-या काही दिवसात स्पष्ट होईल.यानिमित्ताने अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना "कृष्णा"साठी मदतीला बोलावले जाते.कृष्णा कारखान्यात स्थापनेपासून थोर विचारवंत यशवंतभाऊ मोहिते व सहकार महर्षी जयवंतआप्पा भोसले यांच्या विचारांच्या समर्थंकांची आलटून पालटून सत्ता होती. मात्र गतवेळी निवडणुकीत नवखे असणारे आणि संस्थापक संचालक मंडळातील आबासाहेब मोहिते यांचे नातू अविनाश मोहिते यांनी सत्तापरिवर्तन केले." कृष्णे"च्या इतिहासात ऐतिहासिक सत्तांतर झाल्यानंतर राज्यभर अविनाश मोहिते यांचा बोलबाला झाला. तत्कालीन मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी भुवया उंचावत अविनाश मोहितेंचे अभिनंदन केले.
अविनाश मोहिते यांचा येथूनच राजकीय जीवन प्रवास सुरू झाला.मात्र निवडून आलेल्या संचालकांपेक्षा बाहेरील व्यक्तीचा बहुतांश हस्तक्षेप होत असल्याने ही नाराजी अविनाश मोहितेंच्या राजकीय प्रवासातील अडसर निर्माण झाला आहे.कारखान्यांतील चोरी,अपहरण,टेंडरमधील घपला,अवमानकारक वागणूक यामुळे झालेली नाराजी अविनाश मोहिते कशी काढणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान मोहिते- भोसलेंचे झालेले मनोमिलन गतवेळी सभासदांच्या पचनी पडले नाही. सभासदांनी कृष्णेत सत्तांतर केले. मोहिते- भोसले गटासाठी आत्मचिंतनाचा निकाल होता.दरम्यानच्या काळात मोहिते- भोसलेंचे मनोमिलन कायम राहिले.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत मनोमिलनाला ग्रहण लागले आहे.डाॅ.अतुल भोसले उमेदवार असतानाही मोहिंते विरोधात असल्याकारणाने अतुल भोसले नाराज आहेत."मनोमिल"हे अतुल भोसलेंच्या पुढाकारानेच झाले होते.
अविनाश मोहितेंना परिवर्तनासाठी अनेकांनी साथसोबत केली होती.त्यातील अनेकजण दुःखावले व दुरावले आहेत.हेच सवंगडी अविनाश मोहिते यांच्या विरोधात आणि कारभाराविरोधात रणशिंग फुकण्याच्या तयारीत आहेत.कृष्णेच्या रणांगणासाठी राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. कराड तालुक्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार विलासकाका पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, वाळवा तालुक्यात माजी मंत्री जयंत पाटील, नानासाहेब महाडिक, कडेगाव तालुक्यात माजी मंत्री डाॅ. पतंगराव कदम, पृथ्वीराज देशमुख हे नेते काय भूमिका घेणार ? पाठिंबा कोणाला देणार ? हे स्पष्ट होईल त्यावेळी "कृष्णा" चा सभासद निर्णय घेणार. आरोप-प्रत्यारोंपाचा धुरळा उढत राहील.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार झाल्यापासून विजयाची पताका फडकवित आहेत."सह्याद्री"मध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांना सहकार्याचा "हात"दिला व आता डाॅ.पतंगराव कदम यांच्यासह इंद्रजित मोहिते व मदनराव मोहिते यांच्या पॅनेलला पाठींबा देणार हे सुनिश्चीत आहे.तर विधानसभा निवडणुकीपासून माजी आमदार विलासकाका पाटील जिकडे जातील तिकडे अपयशच येत आहे.
"सह्याद्री"पेक्षा "कृष्णा"तील प्रचार आक्रमक असतो.आजचा "पुढारी"राजकीय परिस्थिती बदल तशी आपली भूमिका बदलत असतो यामुळे सहकारी साखर कारखाची निवडणूक रंगतदार होते.निकालापर्यंत कोण बाजी मारेल यांचा अंदाज राजकीय निरीक्षकांना देता येत नाही कारण यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले यांच्या पश्चात होणारी "कृष्णा"ची निवडणूक आहे.सत्ताधारी गटाविरोधातील असंतोषाचा फायदा विरोधक एकत्रीत उठवणार की विरोधकांच्या दुफळीचा लाभ सत्ताधा-यांना होणार हे येणारा काळच ठरवेल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा