पाटण विधानसभा मतदार संघ शिवसेनेचा भक्कम गड. . . . . पाटण वार्तापत्र - गोरख तावरे

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका हा डोंगराळ व दुर्गम म्हणून गणला जातो. शंभरात देसाई हे पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींपेक्षा सर्वात जास्त विकास निधी पाटण तालुक्यांमध्ये आणण्यासाठी आमदार शंभुराज देसाई यांना यश प्राप्त झाले आहे. डोंगराळ भागातील वाडी वस्तीवर विकास निधी आणून रस्ते पाणी लाइट यांची सुविधा करण्यामध्ये शंभूराज देसाई यांचा अग्रक्रम आहे. शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई व राष्ट्रवादीचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू असतो. मोरगिरी, कोयनानगर, ढेबेवाडी,चाफळ, मल्हारपेठ
अशा विभागांमध्ये पाटण तालुका विभागला गेला आहे. तर कराड तालुक्यातील सुपने विभाग पाटण विधानसभा मतदार संघाला जोडला गेला आहे. आमदार देसाई व पाटणकर गटांमध्ये सातत्याने विकासकामांवरून आरोप प्रत्यारोप सुरू असतात. सर्वाधिक श्रेयवादाचे राजकारण पाटण तालुक्यांमध्ये सुरू आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघाचा सत्तेत असणा-या सत्ताधारी पक्षाचा एक आमदार म्हणून शंभूराजे देसाई यांच्याकडे पूर्ण सातारा जिल्हा पाहतो आहे. आमदारांना मिळणारा निधी यावरच समाधान न मानता. मतदारसंघातील विविध कामे मार्गी लावयची असतील तर शासनाशी भांडून आपले प्रश्न विधानसभेत मांडून शासनाच्या तिजोरीतून जादाचा निधी आणणारा आमदार अशी शंभूराज देसाई यांची राज्यभर ओळख निर्माण झाली आहे. गत साडेतीन वर्षात ३१० कोटींहून अधिकचा निधी शासनाच्या तिजोरीतून पाटण मतदारसंघातील विविध विकासकामां करीता मंजुर करुन आमदार शंभूराज देसाई यांनी आणलेला आहे. विक्रमसिंह पाटणकर हे अनेक वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कालावधीमध्ये एवढया मोठय़ा प्रमाणात निधी पाटण तालुक्यासाठी आलेला नव्हता. हा धागा पकडून आमदार शंभूराज देसाई हे पाटणकर गटावर नेहमी तुटून पडतात.

तालुक्यातील अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या मल्हारपेठ, नारळवाडी व ढेबेवाडी विभागातील मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीमध्ये निकाल लागले. काँग्रेसचे हिंदुराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीने वर्चस्व मिळवले आहे. तर मल्हारपेठ ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांच्या सुविद्य पत्नी धनश्री कदम यांनी सरपंचपदी बाजी मारली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्या नियोजनबद्ध राजकारणामुळे मल्हारपेठ ग्रामपंचायतीचे सरपंचपद शिवसेनेने मिळवून शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. मल्हारपेठ ग्रामपंचायतीत ११ पैकी पाटणकर गटाने ७ व आ.देसाई गटाने ४ जागांवर विजय संपादन केला आहे. मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीत कॉंग्रेसचे हिंदूराव पाटील यांनी सत्तांतर घडवून राष्ट्रवादीचे आ. नरेंद्र पाटील यांना धक्का देत ढेबेवाडी विभागात कॉंग्रेसची ताकद दाखवून दिली आहे. आगामी काळात काँग्रेसतर्फे हिंदूराव पाटील यांना चांगली संधी दिली जाईल अशी हमी आमदार पृथ्वीराज चाव्यांनी दिली आहे.पाटण तालुक्यात ११ सार्वत्रिक ग्रामपंचायतींपैकी रामिष्टेवाडी, कळकेवाडी व नवसरवाडी या तीन आ. देसाई गटाच्या ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. यामुळे पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतींवर आमदार शंभूराज देसाई यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे

मल्हारपेठ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. या ग्रामपंचायतीमध्ये तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांच्या सुविद्य पत्नी धनश्री हर्षद कदम विजयी झाल्या आहेत. हर्षद कदम यांनी आपल्या सुविद्य पत्नीला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत उभे करून यश मिळाल्याने शिवसेनेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मल्हारपेठ ग्रामपंचायतीचे सरपंचपद शिवसेनेला मिळाल्यामुळे आगामी काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून मल्हारपेठचा सर्वांगीण विकास केला जाईल, अशी हमी शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी दिली आहे.

ढेबेवाडी विभागातील मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीमध्ये कॉंग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदूराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आ. नरेंद्र पाटील यांना पराभवाची धूळ चारत आ. पाटील यांच्याकडे असणारी ग्रामपंचायत खेचून आणण्यात यश मिळविले आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी राष्ट्रीय कॉंग्रेसचे अमोल पाटील हे विजय झाले आहेत, तर ११ पैकी कॉंग्रेसला ६, तर राष्ट्रवादीला ५ जागा मिळाल्या आहेत. तसेच, मंद्रुळकोळे खुर्द ग्रामपंचायतीमध्ये हिंदूराव पाटील यांनी आपली सत्ता अबाधित ठेवत सरपंचपदी सतीश कापसे हे विजयी झाले. येेथे ७ पैकी राष्ट्रीय कॉंग्रेसला ५ व राष्ट्रवादी कॉंग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत. मरळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजेंद्र माळी हे सरपंचपदी निवडून आले आहेत. सदरचे ग्रामपंचायत आमदार शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. नवनिर्वाचित नऊ सदस्य हे आमदार शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सदस्य आहेत. येराडवाडी ग्रामपंचायतीत विठ्ठल कदम हे सरपंचपदी निवडून आले असुन आ.देसाई गटाची सत्ता अबाधित राहिली आहे.

पाटण तालुकामध्ये सातत्याने विकास कामाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय वाद सुरू असतो. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दरम्यान पाटण तालुक्यांमध्ये शिवसेना रुजली आहे. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी म्हणून शंभुराज देसाई कार्यरत आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम पाटण तालुक्याबरोबर सातारा जिल्हयात शिवसेना भक्कम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायती सर्वाधिक पाटण तालुक्यांमध्ये शिवसेनेचे अधिपत्याखाली कार्यरत आहेत. आमदार शंभूराज देसाई, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम, राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर, आमदार नरेंद्र पाटील, काँग्रेसचे हिंदुराव पाटील, भाजपाचे पक्ष प्रवक्ते भरत पाटील यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू असतो. दरम्यान पाटणचे जनता नेहमी शिवसेनेबरोबर राहत आहे.   

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.