शिवसेनेचाच मुख्यमंत्री

 शिवसेना भाजपपासून दुरावले आहे, हे आताही नव्याने सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युती सरकार आहे. असे म्हटले जाते, दरम्यान ही खरी वस्तुस्थिती नाही, तर भाजपाचेच केवळ सरकार आहे. शिवसेना नाईलाजाने सरकारमध्ये सहभागी झाले आहे. राजकारणात कोणताही पक्ष अथवा व्यक्ती एकमेकांचा विरोधक नसतात, असे म्हटले जाते मात्र पंचवीस वर्षांची मैत्री प्रथमता भाजपने शिवसेनेबरोबरची तोडली. आणि सत्तेसाठी हपापलेल्या भाजप सर्वांसमोर आला. काँग्रेस सत्तापिपासू असे म्हटले जात होते. मात्र काँग्रेसपेक्षा एक पाऊल पुढे भाजपच आहे, हे शिवसेनेला देत असलेल्या वागणुकीवरून स्पष्ट होत आहे.

शिवसेना दररोज भाजपच्या विरोधात भूमिका घेत आहे, मात्र भाजप याविरोधात काहीच कारवाई करत नाही. अलीकडच्या काळामध्ये भाजपची मैत्री करणार नाही, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट भूमिका केली आहे. एक पाऊल पुढे जाऊन आता, पुढील मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, अशी सिंहगर्जना उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेला जे आव्हान देतात, याबाबत उद्धव ठाकरे बोलले आहेत ते असे, आम्हाला आव्हान द्यायला जे पुढे येत आहे, त्यांचे आव्हान मोडून तोडून महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री बसवणार, त्यासाठी मला शिवसैनिकांची साथ हवी आहे. सत्तेच्या लालसेसाठी मला भगवा फडकावयचा नाही. अशी लालसा असलेल्या मुख्यमंत्र्याला मी खुर्चीवर बसूही देणार नाही. लोकांसाठी मला सत्ता हवी आहे. विरोधकांना मोडून तोडून, आता शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा घाट उद्धव ठाकरे यांनी घातला आहे.

उद्धव ठाकरे भाषण करताना आपली प्रबळ इच्छाशक्ती प्रकट करतात आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील जनतेला व शिवसैनिकाला साद घालत आहेत की, आगामी मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा ! यासाठी शिवसेनेला मदत करावी. म्हणजेच सोबतीला कोणताही राजकीय पक्ष न घेता, शिवसैनिकांच्या भरोशावर व महाराष्ट्रातल्या सुज्ञ मतदारांच्या भरवशावर व विश्वासावर उद्धव ठाकरे आत्मविश्वासपूर्वक सध्या बोलत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची नुकतीच भेट झाली मात्र, या भेटीतून फारसे काही निष्पन्न झाल्याचे म्हणता येणार नाही कारण पहिल्या प्रमाणेच शिवसेना आक्रमकपणे काम करीत आहे. त्याचबरोबर भाजपाचा मुलाहिजा न ठेवता. स्वतंत्रपणे शिवसेना महाराष्ट्रात लढणार हे संकेत देत आहे.

शिवसेना सत्तेसाठी हापापली नाहीतर भाजपाची सत्तापिपासू व मित्र पक्षांना वेगळी वागणूक देण्याच्या भूमिकेवर शिवसेना आक्रमक झाली आहे. सत्ता असली काय ? नसली काय ? शिवसेना व शिवसैनिकांच्यावर काडीचा परिणाम होत नाही. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची सेवा नेहमीच शिवसेना करीत आहे. हि सेवा अधिक गतिमान करण्यासाठी शिवसेनेला महाराष्ट्रात सत्ता हवी आहे. आणि काँग्रेसला सत्ता द्यायची नाहीत, त्याचबरोबर भाजपलाही सत्तेच्या आसपास फिरकू द्यायचे नाही, अशी एकंदरीत शिवसेनेची भूमिका आहे. तेव्हा महाराष्ट्रातील तमाम स्वाभिमानी जनतेने व मतदारांनी आता शिवसेनेच्या हाती एकहाती सत्ता देणे गरजेचे आहे. आणि स्वतंत्रपणे शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राची कशी प्रगती करतो ! हे एकदा शिवसेनेला संधी देऊन पहावे लागेल.

गोरख तावरे,  कराड
9326711721

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.