साहेबांचे भक्त

आदरणीय पी.डी. पाटीलसाहेब यांनी केलेले काम दीपस्तंभासारखे उभे आहे. कराड शहर व कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेले काम उल्लेखनीय व पुढील पिढीला मार्गदर्शक आहे. आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांनी समाजकारणाला अग्रक्रम देऊन कामापुरते राजकारण केले आहे. कराड नगरपालिकेच्या माध्यमातून कराडकरांना सर्व सुखसोयी व प्राथमिक सुविधा त्यांनी पुरवलेल्या आहेत. भुयारी गटार योजनेमुळे कराडकरांचे आरोग्य चांगले ठेवण्याचा केलेला प्रयत्न इतिहास विसरणार नाही. प्राथमिक शाळांच्या उभ्या केलेल्या टोलेजंग इमारती आजही अभिमानाने उभ्या आहेत. खाजगी शिक्षण संस्थेपेक्षा कराड नगरपालिकेच्या प्राथमिक शाळांचे काम एका पाऊल पुढे आहे. कराड नगरपालिकेची शाळा क्रमांक ३ ही राज्यात सर्व बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. कराड शहरातील प्रशस्त रस्ते, विद्युतीकरण, स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन समस्यांना सामोरे जावाे लागू नये यासाठी केलेले काम आजही दीपस्तंभासारखे उभे आहे. केवळ विद्यमान नगरपालिका सदस्यांनी त्या पायवाटेवरून चालून, उभ्या केलेल्या सुविधांची देखभाल करणे आवश्यक आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील आणि सह्याद्री सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱयांची जमीन ओलिताखाली आणली आहे. याचे सर्वस्वी श्रेय आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांना द्यावेच लागेल. आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांनी दूरदृष्टीचा विचार करून कराड उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण काम केली आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील लोक स्वाभिमानी आहेत व आपल्या नेत्यांवर निष्ठा ठेवणारी आहेत. आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांचा गतवेळी जन्मशताब्दी सोहळा साजरा करण्यात आला. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांचा वसा आणि वारसा आहे. याच पायवाटेने व ध्येय धोरणाने विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील वाटचाल करीत आहेत. ऊस उत्पादक शेतकऱयांना सर्वाधिक उसाला दर देणारा सह्याद्री सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण व शेतीच्या कामांना योग्य वेळी त्यांच्या हातात पैसे मिळवेत यासाठी सह्याद्री सहकारी साखर कारखाना नेहमी शेतकऱ्यांना आगाऊ पैसे देत असतो. प्रथम शेतकऱयांचा विचार करणारा सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील एकमेव साखर कारखाना आहे. स्वच्छ व पारदर्शक कारभार सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा चालतो, असे नेहमी जनता त्यांना प्रशस्तिपत्रक देत असते. ही किमया आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील यांनी करून दाखवली आहे. आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या आदर्शानुसार दैनंदिन जीवनात आमदार बाळासाहेब पाटील यांचा वावर दिसून येत आहे. कराड शहर, कराड उत्तर विधानसभा मतदार संघ, सह्याद्री सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील लाखो लोक आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांचे भक्त आहेत.


गोरख तावरे,कराड
9326711721

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.