कोळेमध्ये कोरोना योद्धांचा सत्कार

कोळे गावात कोरोनाला प्रवेश करता आला नाही याचा मला अभिमान 


             कराड (लक्ष्मीपुत्र) - काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसच्यावतीने सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव अभिजीत राजेंद्र चव्हाण व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यावतीने कोळे (ता.कराड) येथे युवा नेते इंद्रजीत चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस शिवराज मोरे यांच्या शुभहस्ते कोरोना विरुद्ध लढा देणाऱ्या टिमचा प्रशस्तीपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले.
              यावेळी कोरोना कमिटीचे अध्यक्ष व सरपंच सौ.सुष्मा राजेंद्र कांबळे, उपसरपंच अशोक शिनगारे, ए.पी.आय गणेश कड, पोलीस पाटील सौ. सुप्रिया महेंद्र देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष अस्लम देसाई, ग्रामविकास अधिकारी माने, कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तडाके व त्यांचे सर्व सहकारी, मंडल अधिकारी दीक्षित, गावकामगार तलाठी सुरेखा लोंढे, माजी सरपंच श्रीकांत कुंभार, ग्रामपंचायत सदस्य वसंत देसाई, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व तंटामुक्त कमिटी, कोरूना युद्धामध्ये सहकार्य करणाऱ्या सर्वांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
             इंद्रजीत चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे धोरण विरुद्ध चे काम चालू आहे. यापुढे असेच जागरूक राहून आपण सर्वांनी शिरकाव रोखण्यासाठी प्रयत्न करावा.
             शिवराज मोरे म्हणाले, युवक काँग्रेसने या संकटाच्या काळात धान्य किट वाटप, रक्तदान शिबिरे, मास्क व सॅनिटायझर वाटप अशी कामे करून आम्ही जनतेबरोबर व कोरोना योद्धा बरोबर आहोत असा संदेश दिला आहे. हे संकट टाळण्यासाठी यापुढेही असाच जागृतपणे प्रयत्न करूया.
              सातारा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र चव्हाण प्रास्ताविक भाषणात म्हणाले, कोरोना लढ्यामध्ये सर्वांनी कष्ट घेऊन लढल्याने कोळे गावात कोरोनाला प्रवेश करता आला नाही, याचा मला अभिमान आहे.
             पाहुण्यांचे स्वागत अभिजित चव्हाण व विशाल भुरके यांनी केले. ग्रामविकास अधिकारी माने व कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तडाके यांनी सत्कारास उत्तर दिले. याप्रसंगी राजेंद्र कांबळे, ग्रामपंचायत सदस्य काका पाटील, मुन्ना पठाण, ग्रामस्थ व युवक उपस्थित होते. वसंत देसाई यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.