मुख्याधिकाऱ्यांची बदली रद्द करावी अन्यथा कोरोना काळात आंदोलन

मुदतवाढीने "कोरोना"कामाची शाब्बासकी नंतर १७ दिवसात बदली

"कोरोना" चे उत्कृष्ट काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांची मुदतवाढीनंतर पुन्हा बदली

मुदतवाढ पुन्हा बदली शासनाचा अजब कारभार


           कराड (लक्ष्मीपुत्र) - कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची मुदतवाढ मिळूनही अचानक झालेली बदली रद्द करावी असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे.कोरोना काळातही याचे तीव्र पडसाद उमटतील व नाईलाजाने कराडकरांना शांततामय आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विवेक विश्वनाथ ढापरे यांनी दिला आहे."कोरोना" चे उत्कृष्ट काम करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांची मुदतवाढीनंतर पुन्हा १७ दिवसात बदली करण्यात आली असल्याने शासनाचा अजब कारभाराचा नमुना समोर आला आहे.
           २३ जुलै रोजी शासन आदेशानुसार कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना शासन आदेश एमसीओ- २०२०/प्र,क्रमांक ४९/नवि १४(७१) व १४(५७) दि,७/७/२०२० नुसार एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. सध्या अवघे राज्य कोरोना या भीषण साथीशी मुकाबला करत आहे. या साथी मध्ये कराड शहरात मुख्यधिकारी डांगे यांनी अनेक कल्पक योजना आखून कराडला या साथीपासून दूर ठेवण्यात महत्वाचा वाटा उचलला आहे, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन प्रत्येक काम लोकसहभागातून यशस्वीपणे पूर्णत्वास नेणे ही डांगे यांची कार्यपद्धती कराडवासीयांनी गेल्या तीन वर्षांत अनुभवली आहे,कोरोनासाथीत सुरुवातीपासूनच डांगे यांनी नियोजनबद्ध काम केले आहे.
          महाराष्ट्रात पहिल्यांदाच घरपोच भाजी पोहोचवण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला, गावाची स्वच्छता,निर्जंतुकीकरण, कचरा विलगीकरण यातील नियमितता,प्रत्येक सोमवारी शहरातील विविध घटकांबरोबर संवाद साधून कोरोनाकाळात कराड सुरक्षित राखले,दि,८ जूनच्या कराडच्या कृती समितीने गणेशोत्सव साजरा करण्याची नियमावली एक महिन्यानंतर महाराष्ट्र शासनाने जसाच्या तसा स्वीकारल्याची अभिमानास्पद घटना ही स्व,यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या कराडच्या लौकिकात भर टाकणारी आहे.
           स्वच्छसर्वेक्षण २०१९ मध्ये कराड चा देशपातळीवर प्रथम क्रमांक आला असून या वर्षीही तो येणे निश्चित आहे,कराडचे स्वच्छता अभियान हे महाराष्ट्राला दिशादिग्दर्शन करणारे असून अनेक आघाडीच्या वृत्तपत्रातून त्याची दखल घेण्यात आलेली आहे, कराडच्या बाराडबरी कचरप्रकल्पाचे आज नंदनवन झाले, संपूर्ण देशात आदर्श असणारा हा प्रकल्प थोडासा अपूर्णावस्थेत आहे,तो पूर्ण होण्यासाठी यशवंत डांगे यांची गरज आहे,त्यादृष्टीने त्यांना मिळालेली मुदतवाढ योग्यच आहे.
            सध्या कोरोनाशी आपण सर्व आपल्या नेतृत्वाखाली लढा देत आहोत, अशावेळी कराडमध्ये बसलेली उपाययोजनांची घडी मुख्याधिकारांच्या या बदलीमुळे पार विस्कटून जाणार आहे, तरी आपण या गंभीर बाबीत तातडीने लक्ष घालून ही बदली रद्द करावी अशी नम्र विनंती आहे, अन्यथा कोरोना काळातही याचे तीव्र पडसाद उमटतील व नाईलाजाने कराडकरांना शांततामय आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विवेक विश्वनाथ ढापरे यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.