हुपरी महावितरण कंपनी तक्रार निवारण अधिकारी नेमणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवेदनाला यश


           हुपरी लक्ष्मीपुत्र (विनोद खोत) - हुपरी शहर राष्ट्रवादी युवक विद्यार्थी काँग्रेस आणि हातकणंगले तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने देण्यात आलेल्या निवेदनाला उत्तर देतांना सहाय्यक अभियंता चव्हाण साहेब यांनी तसे लेखी पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांना दिले.
             लॉकडाऊन काळातील घरगुती वीज वापराची बिले वाढून आल्यामुळे ग्राहकांच्यामध्ये वीज वितरण कंपनीच्या विषई असणारी नाराजी व असंतोष याचा विचार करुन ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी आज हुपरी वीज वितरण कंपनीकडे निवेदन देण्यात आले.
              यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ म्हणाले की, ग्राहकाला काम नाही. त्याच्या 2 वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे. आणि अवाच्या सव्वा बिले पाठवून ग्राहकाचे कंबरडे मोडले आहे.वितरण कंपनीने सदरची बिले दुरुस्त करून द्यावीत व बिले भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी. वीज जोडणी तोडण्यात येऊ नये. तसेच बील विषयी असणार्‍या शंका निरसन करण्यासाठी तक्रार निवारण अधिकारी नेमणूक करावी.वरील निवेदन वरीष्ठ यांना पाठवून तक्रार निवारण अधिकारी यांची नेमणूक तातडीने करत आहोत असे लेखी पत्र वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले.
            यावेळी जिल्हा परिषदेचे मा अध्यक्ष नानासाहेब गाट हुपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील गाट, हातकणंगले विद्यार्थी तालुकाध्यक्ष शिवराज देसाई, युवक अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड, पक्षाचे उपाध्यक्ष धनाजी शिंदे दाजी, कार्याध्यक्ष विनोद खोत, मा. तालुका पंचायत समिती उपसभापती घनश्याम आचार्य, घनशाम गायकवाड, अरुण फडतारे, सज्जन रावळ, भूषण पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.