पाटणमध्ये विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई सुरू
मोरगिरी (लक्ष्मीपुत्र) दिपक मांडावकर - पाटण शहरातील सर्व व्यवहार सुरु झाले आहेत. त्यातच रस्त्याच्या कडेला भाजी विक्रेते बसत आहेत. यातून होत असलेल्या गर्दीवर नियंत्रण आणत कोरोनाचा संभाव्य पादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस व नगरपंचायतीने कारवाईची धडक मोहीम सुरु केली आहे. आज रविवारी पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात पुन्हा त्याचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी पोलिस आणि नगरपरिषदेने कारवाईची भुमीका सुरु कसली आहे.
पोलिसांनी कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आव्हान केले होते. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाई सुरू केली असून अनेक नागरिक पाटणमध्ये खरेदीसाठी येत असतात. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता फिरणे, मास्क न घातलेल्या ग्राहकाला दुकानात प्रवेश देणे, सोशल डिस्टन्ससिंगचे पालन न करणे, हॉटेलमध्ये ग्राहकांना बसवून घेणे, अशांवर ही दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
चौकट - व्यवसायिकांनी नियमाप्रमाणे व्यवसाय करावेत. कोरोनाचा संसर्ग होईल अशी कोणतीही कृती खपवून घेतली जाणार नाही. सुरुवातीला समज म्हणून किरकोळ स्वरूपाची कारवाई करीत आहोत, मात्र यामध्ये सुधारणा न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. अनेक नागरिक व तरुण मुले पाटणमध्ये विना मास्क फिरत आहेत. अनेक नागरिकांना त्याचे गांभीर्य नाही. भाजीविक्रेते मंडइ सोडून रस्त्याच्या कडेला भाजी विकत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कायम होत आहे.तेसुद्धा मास्क लावत नाहीत. यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.
पोलीस निरीक्षक- तृप्ती सोनवणे

बातमी छान आहे.गुटखा खाणारे पण बघा सार्वजनिक जागे थुंंण्यामुळे रोगाचा प्रार्दुवभाव वाढू शकतो.
उत्तर द्याहटवाबातमी छान आहे.गुटखा खाणारे पण बघा सार्वजनिक जागे थुंंण्यामुळे रोगाचा प्रार्दुवभाव वाढू शकतो.
उत्तर द्याहटवा