कराडची आण-बाण-शान राहीली पाहिजे
जाणाऱ्या अधिकाऱ्याच्या मनामध्ये "किंतू" नको....येणारा अधिकारी वादात नको
येणाऱ्या काळात नगरपालिकेची सत्ता हवी म्हणून बदलीचा आटापिटा
कराड (लक्ष्मीपुत्र) - नगरपालिकेचे कार्यक्षम मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या जागी भुसावळ येथे असणारे रमाकांत डाके यांना नेमणूक देण्यात आले आहे. यशवंत डांगे यांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने एक वर्षाची मुदतवाढ दिली होती. मात्र यशवंत डांगे यांची कामकाज पद्धती व कार्यक्षमपणा लोकप्रतिनिधींना पसंत पडला नाही. इतकेच काय मंत्रालय स्तरावर "प्रतिष्ठापणाला लावून अखेर यशवंत डांगे यांच्या मुदत वाढीचा आदेश रद्द करून नवनियुक्त मुख्याधिकारी म्हणून रमाकांत डाके यांच्याकडे पदभार द्यावा. यासाठी ठरावीक महाशयांनी प्रतिष्ठापणाला लावून फारच आटापिटा केला आहे. येणाऱ्या काळात या "प्रतिष्ठित" गटाला कराड नगरपालिकेची सत्ता हवी बर का ? याचसाठी केला बदलीचा अट्टाहास.
शासकीय अधिकारी आहे. म्हटल्यावर बदली होणारच. यात वेगळेपण असे काहीच नाही. परंतु नगर विकास विभागाने मुदतवाढ दिल्यानंतर बदलीसाठी का प्रयत्न केला गेला ? असा कराडकरांचा रोखठोक प्रश्न आहे. यशवंत डांगे कोठे बदलून जाणार ? याबाबत चर्चा सुरू आहे. गेल्या काही वर्षापासून कराड नगरपालिकेच्या मुख्याधिकारींबाबत म्हणजेच गतकाळात असणारे मुख्याधिकारी प्रशांत रोडे, अमिता दगडे, विनायक औंधकर यांची ज्या पद्धतीने बदली झाली. तेव्हापासून आजअखेर म्हणजे यशवंत डांगे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही बदलीबाबत चर्चा होत आहे.
सातारा जिल्ह्यात ९ नगरपालिका व ७ नगरपंचायती आहेत. यापैकी मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीच्या अनुषंगाने कधीही चर्चा होत नाही. मात्र कराड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची कार्यपद्धती व बदली बाबत सातत्याने चर्चा होत आहेत. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनाच एखादा मुख्याधिकारी नको असतो. त्यामुळे त्यांची बदली करावी. यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न होतात हे विशेष. कराड नगरपालिकेमध्ये येणारा अधिकारी हा केव्हा ना, केव्हा बदलून जाणार असतो. मात्र आपल्या मनासारखे काम करीत नाही अथवा स्थानिक राजकारणाचा बळी कराडचा मुख्याधिकारी ठरतो. हे आता पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
रमाकांत डाके यांनी कराडचे मुख्याधिकारी पद मिळावे, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचा आसरा घेतला आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी हे काम मात्र इमानेइतबारे केले आहे. कर्तव्यदक्ष असणारे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या जागी रमाकांत डाके यांना नियुक्त करावे असा शासनस्तरावर आग्रह धरला आणि यशवंत डांगे यांच्या जागी रमाकांत डाके आज येत आहेत. वास्तविक आतातरी जाणाऱ्या मुख्याधिकार्यांना विनम्रपणे केलेल्या कामाचे कौतुक करून निरोप दिला पाहिजे. म्हणजे कराडची आण - बाण - शान कायम राहील. जाणाऱ्या अधिकाऱ्याच्या मनामध्ये "किंतू" राहता उपयोगाचा नाही. आणि येणाऱ्या अधिकारी हा पुन्हा वादात सापडणार नाही. याची आता सर्वस्वी जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा