कराड नगरपालिकेचा विकास निधीसाठी प्रयत्न तर मलकापूर नगरपंचायतीचा रणसंग्राम सुरू होणार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
( गोरख तावरे )
कराड शहर विकासाचा महामेरू भाजपच्या साथीने करण्याचा प्रयत्न स्थानिक नगरसेवक करीत आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पारदर्शक, स्वच्छ प्रतिमेवर कराड नगरपालिकेची सत्ता आलेली आहे. दरम्यान निवडणुकीच्या निकालानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाराज होवून जनशक्ती विकास आघाडीने पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्व मानण्यास नकार दिला. पाणी आपला सवता सुभा मांडला आहे आणि अलीकडच्या काळामध्ये भाजपाशी सलगी सुरू केली आहे. दरम्यान मलकापूर नगरपंचायत प्रारंभापासून मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे चांगले काम करीत आहेत. केंद्र शासन, राज्य शासन व आमदार निधीतून जितकी विकासाचे कामे मलकापूरमध्ये करता येतील तेवढी कामे पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून मनोहर शिंदे मलकापूरमध्ये करीत आहेत. मनोहर शिंदे यांनी मलकापूर नगरपंचायतीने लोकहितोपयोगी विविध नाविण्यपुर्ण योजना हाती घेऊन यशस्वीरित्या राबविल्या आहेत.
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्यासुरक्षा अभियान योजनेअंतर्गत मलकापूर शहरातील ज्या मुली शहराच्या बाहेर शिक्षणासाठी जातात. त्यांची मोफत प्रवासाची सोय केलेली आहे. मुलीसाठी ही योजना वरदायिनी आहे. या योजनेला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि ती अखंडितपणे सुरू आहे याचे श्रेय मनोहर शिंदे यांना द्यावे लागेल. एका अर्थाने कराड व मलकापूर विकासाबाबत पृथ्वीराजबाबा नेहमी सकारात्मक प्रयत्न करून दोन्ही संस्थांना मदत करण्याच्या हेतूने प्रयत्न करीत आहेत. मलकापूर नगरपंचायतीचे सदस्य त्यांच्याबरोबर आहेत तर कराड नगरपालिकेचे लोकप्रतिनिधी त्यांच्या विरोधात आहेत. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कराडच्या विकासासाठी त्यांनी तेराशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हे कराड नगरपालिकेचे सदस्य मान्य करत नाहीत. कराड नगरपालिकेसाठी केवळ तेरा कोटी रुपये पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत. बाकीचा निधी आहे तो, यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीमधून इतर कामांसाठी दिला असल्याची माहिती कराडचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी दिली.
उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व राजेंद्रसिंह यादव हे सध्या जनशक्ती आघाडीचे कराड नगरपालिकेत नेतृत्व करीत आहेत. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सोबत उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्या निवासस्थानी सर्व नगरसेवकांची बैठक झालेली आहे. कराड नगरपालिकेच्या माध्यमातून कराड शहरातील प्रलंबित कामे व विकासासाठी चंद्रकांतदादांना निधीसाठी साकडे घालण्यात आलेले आहे. कराड शहरातील विविध कामांसाठी सुमारे ६५ कोटी रुपये निधी व कोयना नदीतील नगरपालिकेच्या जॅकवेलजवळ रखडलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या कामास गती देण्यासाठी नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांचेकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. श्री विठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, राजेंद्रसिंह यादव, विजय वाटेगावकर शासनस्तरावर प्रयत्न करीत आहेत.
अपारंपारिक उर्जा कार्यक्रम अंतर्गत वीज निर्मिती करण्यासाठी १९ कोटी रुपये, वाढीव हद्दीतील विविध रस्त्यांच्या कामासाठी 15 कोटी रुपये, छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या दुरुस्तीसाठी 10 कोटी रुपये, मंगळवार पेठेतील रस्त्याच्या डांबरीकरण करणेसाठी 4.52 कोटी, जिव्हेश्वर मंदीर ते पाटण कॉलनी उड्डाण पूल बांधण्यासाठी 2.50 कोटीं, पेंढारकर पुतळ्यामागे पार्किंग करणे १.९० कोटीची कराड नगरपालिकेने मागणी केलीली आहे. आता शासन या निधीसाठी कसा प्रतिसाद मिळतो हे पहावे लागेल. मलकापूर नगरपंचायतीने पंतप्रधान यांचा ड्रिम प्रोजेक्ट पंतप्रधान आवास योजना हाती घेतला असून या योजनेअंतर्गत एकूण 1600 घरांची उद्दीष्ट्य असून शहरातील नागरिकांना या योजनेचा लाभ देणेसाठी घटक क्र. 4 आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना वैयक्तिक घरकुलासाठी अनुदान मिळणेकामी घरकुल देण्याचा संकल्प मलकापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सोडला आहे.
स्वर्गिय प्रेमलाताई चव्हाण यांचे स्मुर्तीदिनाचे औचित्य साधून त्यांच्या नावे आगाशिवनगर येथे दत्त-शिवम सोसायटी श्रीमती प्रेमलाताई चव्हाण नगर वाचनालय इमारत बांधकामाचा भुमिपुजन समारंभ झाला आहे. कन्यासुरक्षा अभियान अंतर्गत शालेय वर्षामध्ये विद्यार्थीनींना मोफत बस पास वाटप केले जाते. मलकापूर नगरपंचायतीने प्रियदर्शनी कन्यारत्न योजनेअंतर्गत सुरु ठेवलेल्या योजनेअंतर्गत ठेव पावती वाटप प्रतिवर्षी केले जात आहे. अपंगांसाठी 3% राखिव निधीतून म. गांधी दिव्यांग पेंशन योजना धनादेश वाटप झाले आहेत. 100 मिळकतदारांना मलकापूर सोलरसिटी योजनेअंतर्गत वॉटर हिटरसाठी अनुदान वाटप केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण नगरपंचायतीमध्ये देशात मलकापूर नगरपंचायतीला तिसरा क्रमांक मिळाला, याचे सर्वश्रेय मनोहर शिंदे यांना द्यावे लागेल.
नगरपालिका निवडणुकीनंतर राजेंद्रसिंह यादव यांचा पराभव झालेपासून ते नगरपालिका राजकारणापासून एक हात लांब राहिलेले आहेत. राजेंद्रसिंह यादव यांनी कराड नगरपालिका राजकारणात सक्रिय व्हावे, यासाठी त्यांना सातत्याने सहयोगी नगरसेवक विनंती करतात. दरम्यान याला राजेंद्रसिंह यादव यांनी सकारात्मक प्रतिसाद अद्यापपर्यंत दिलेला नाही. जनशक्ती आघाडीचे नगरसेवक डॉ. अतुल भोसले यांच्या संपर्कात गेल्यामुळे अपक्ष म्हणून निवडून आलेले इंद्रजित गुजर हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या जवळ गेले आहेत. इंद्रजित गुजर यांनी राजेंद्रसिंह यादव यांचा पराभव केला हा पराभव राजेंद्रसिंह यादव यांच्या मनस्वी दिखदायक ठरला आहे. राजकारणात जय - पराजय होत असतो किंवा आजचा विरोधक उद्या मित्र होऊ शकतो, या न्यायाने आता राजेंद्रसिंह यादव यांनी कराड नगरपालिका राजकारणात सक्रिय होणे गरजेचे आहे.
कराड नगरपालिका व मलकापूर नगरपंचायत म्हणजे छोटा व मोठा भाऊ असे संबोधले जात असते. आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांनी कराड नगरपालिकेचे पंचेचाळीस वर्ष नगराध्यक्षपद भूषवुन जागतिक विक्रम केला आहे. कराड नगरपालिकेमध्ये अद्ययावत रस्ते, टोलेजंग इमारती, अंडरग्राऊंड ड्रेनेज, पाणीपुरवठा अशा अनेक योजना पी. डी. पाटील यांनी कराड नगरपालिकेमध्ये पूर्ण केलेल्या आहेत. मलकापूर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर करण्यासाठी ममोहर शिंदे यांनी अथक परिश्रम केले होते, हे विसरता येणार नाही. त्याच बरोबर मलकापूर नगरपंचायतीचे नगरपालिका करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक असणारी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. दरम्यान मलकापूरला नगरपालिकेचा दर्जा बहाल केला जात नाही. यामुळे येथे स्थानिक राजकारण गाजत आहे. मलकापूरला नगरपरिषदेचा दर्जा मिळू नये, यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. तेच मलकापूरच्या विकासाला खीळ घालण्याचे काम करत आहेत. अशी टीका आ. पृथ्वीराज चव्हाण वारंवार विविध कार्यक्रमात करतात.
एकंदरीत मलकापूर नगरपंचायत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकारण तापू लागले आहे. पृथ्वीराज चव्हाण विरोधी डॉ. अतुल भोसले गटांमध्ये या ठिकाणी अटीतटीची लढत होईल असे चित्र आहे. तर माजी मंत्री विलासकाका पाटील यांचा गट काय, भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. मलकापूर नगरपंचायतीचा रणसंग्राम सुरू होणार आहे तर कराड नगरपालिका भाजपच्या माध्यमातून विकास निधी आणण्यासाठी प्रयत्न करताहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा