कराड-चिपळून मार्गावरील खड्डे त्वरित भरावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका घेईल

पाटण ( लक्ष्मीपुत्र ) - कराड-चिपळून राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले असून सदर रस्ताचे काम  एल.अॅण्ड..टी.प्रा.लि.या कंपनीने  युद्धपातळीवर  सुरू केले  आहे, या कामा मुळे या मार्गावर जागोजागी खड्डे पडून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे वाहन धारकांसह नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत, या मार्गावरील खड्डे सबंधित कंपनीने १०ते १२ दिवसात त्वरित भरावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बाबतीत आक्रमक भूमिका घेईल असा इशारा देण्यात आला आहे,

या बाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाटण तालुका यांच्या वतीने मंगळवार दि १७ रोजी पाटण तहसीलदार,उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पाटण, तसेच पोलीस स्टेशन पाटण यांना देण्यात आले आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की,कराड -चिपळूण या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गामंध्ये- रुपांतर झाल्याने या महामार्गाचे काम एल अॅण्ड टी प्रा.ली.कंपनीकडून  युद्धपातळीवर सुरू  आहे, या कामामुळे  रस्त्याची अंत्यत दुरवस्था झाली असून जागोजागी खड्डेच खड्डे पडले आहेत, त्यामुळे हे रस्ते आहेत की खड्डे हेच काही कळत नसुन त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांसह प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत, सध्या  पावसाचे दिवस सुरू असल्याने बाहेरून  कोयनानगर येथे पर्यटक मोठय़ा प्रमाणात येत असल्याने या मार्गावरून प्रवास करताना त्यांचे अतोनात हाल होत आहेत या मार्गावरील रस्त्याचे काम एल अ‍ॅण्ड टी प्रा, लिमिटेड कंपनीच्या ठेकेदाराला दिले असून या मार्गावरील रस्त्यावरील- पडलेले मोठमोठय़ा ले- खड्डे येणाऱ्या दहा ते बारा दिवसांत सबंधित कंपनीने   ताबडतोब भरुन प्रवाशांचा प्रवास सुखकारक करावा, अन्यथा पाटण तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक पवित्रा  घेतल्याशिवाय राहणार नाही असे  म्हटले आहे, या निवेदनावर मनसेचे पाटण तालुका अध्यक्ष  गोरख नारकर,  पाटण शहर अध्यक्ष चंद्रकांत बामणे - उपाध्यक्ष संजय संञे राहुल संकपाळ,  अंकुश कापसे,  विभाग अध्यक्ष हणमंत पवार, संभाजी चव्हाण, दयानंद नलवडे,  आदित्य आदिमूनी जितेंद्र कवर,  यांच्या सह्य़ा आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.