सहा वर्षांपासून आमदार बाळासाहेब पाटील यांचे सुपुत्र जशराज पाटील यांची पायीवारी


कराड ( प्रतिनिधी ) - पंढरपुर वारीची महती आख्ख्या जगभर आहे. विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करणाऱ्या वारकऱयांची लाखो संख्या आहे. कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांचे सुपुत्र जशराज पाटील हे गेल्या सहा वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायी चालत वारकऱयांच्या दिंडीत सहभागी झालेले असतात. सध्या सुरू असलेल्या आळंदीपासून पायी दिंडीमध्ये जशराज पाटील सहभागी झालेले आहेत.

आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांचे नातू आणि कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार बाळासाहेब पाटील यांचे सुपुत्र जशराजबाबा अध्यात्मिक मार्गातील वाटसरू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. जशराज पाटील यांना सामाजिक, राजकीय कार्य करण्याची कौटुंबिक परंपरा आहे. पाटील कुटुंबाला कराड तालुक्यातील मोठे कुटुंब म्हणून पाहिले जाते. दरम्यान मोठेपणाचा कोणताही डामडौल न करता आध्यात्मिक मार्गाने चालत राहणे हे जशराजबाबांना विठ्ठल भक्तीने साधी राहणी, उच्च विचारसरणी हे तत्त्व शिकविले आहे. लहान वयातच जशराजबाबांना लागलेली अध्यात्माची गोडी हे त्यांचे व्यक्तिमत्त्व फुलवण्यासाठी व सुसंस्कारित विचार प्रगल्भतेण्यासाठी उपयोगी ठरतील.

किमान दोनशे सत्तर किलो मीटर पायी प्रवास जशराज पाटील चालत असतात. वारीचा अनुभव हा मनाला उभारी देणारा, आनंद देणारा असतो.पंढरपूरच्या पांडुरंगावर माझी नितांत श्रद्धा आहे. ही श्रद्धाच मला चालण्यासाठी ऊर्जा देत असते. आळंदी ते पंढरपूर असा पायी प्रवास करत असताना मनोमनी विठ्ठलनामाचा नामसाधना करीत असतो अशी माहिती जशराज पाटील यांनी दिली. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोड करणाऱ्या टोळ्यांमधील अनेक मुकादम, ऊसतोड कामगार त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील रहिवासी, अनेक हितचिंतक व सह्याद्री सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील अनेक भक्त, स्नेहीमित्र, सभासद परिचित असणारे जशराज पाटील यांना भेटत असतात. प्रत्येकाची राहण्याची, खाण्याची काय व्यवस्था झाली आहे. याचे आपुलकीने जशराज पाटील चौकशी करीत असतात.

जशराज पाटील यांच्याबरोबर गेले सहा वर्षे अनिकेत करपे व अविनाश मदने पायी दिंडीसाठी सोबत असतात. गेल्या सहा वर्षांपासून दिंडीसोबत पायी चालत असल्याने जशराज पाटील यांना पालखी मार्गावरील अनेक लोक ओळखतात. यामुळे पालखी मार्गावर जशराज पाटील यांचा मोठ्या प्रमाणात मित्र परिवार तयार झाला आहे. त्याचबरोबर अनेक मित्रांच्या घरामध्ये त्यांना चहा, नाश्ता दिला जातो. दरम्यान जशराज पाटील वारीमध्ये सहभागी होऊन पायी चालत असताना आमदार बाळासाहेब पाटील हे विविध माध्यमांद्वारे वारीतील वारकऱ्यांचे प्रश्न जशराजबाबांकडून जाणून घेतात आणि आवश्यक ती मदत पुरविण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर काही अडचण निर्माण झाली तर ती सोडविण्यासाठी आमदार बाळासाहेब पाटील हे पालखी मार्गावरील आपल्या मित्रांशी संपर्क साधून असतात. मात्र आमदार पुत्र म्हणून आपणास व्हीआयपी सेवा मिळावी असा कोणताही बडेजाव जशराज पाटील पूर्ण वारीमध्ये करीत नाहीत. तर विठ्ठलावर असणाऱ्या श्रद्धेपोटी सामान्य वारकऱ्यांप्रमाणेच जशराज पाटील यांची दिनचर्या सुरू असते.

दिंडीमध्ये सहभागी झालेला प्रत्येक वारकरी माऊलीचा जयघोष करीत दिंडीसोबत चालत असतात. याचप्रमाणे जशराज पाटीलही माऊलीच्या नामाचा उद्घोष करीत दिंडीसोबत चालत आहेत. वारकऱयांच्या दिंडीमध्ये अनेक जातीचे, धर्माचे, पंथांचे लोक भक्तीभावाने सहभागी होत असतात. कष्टकरी गरीब श्रीमंत अशी या वारीमध्ये भेदभाव होत नसतो. म्हणूनच कष्टकऱ्यांचा विठ्ठल हा सर्वश्रुत देव मानला जातो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.