पत्रकारिता करताना जीवाभावाचे मित्र असावे लागतात. दैनिक सकाळचे बातमीदार सचिन देशमुख व साम टीव्ही मराठीचे संभाजी थोरात हे दोन पत्रकार अतिशय सकारात्मक विचारांचे व शांत स्वभावाचे आहेत. आज या दोन पत्रकार मित्राचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या संबंधाने दोन शब्द . . . .

पत्रकारिता करताना जीवाभावाचे मित्र असावे लागतात. दैनिक सकाळचे बातमीदार सचिन देशमुख व साम टीव्ही मराठीचे संभाजी थोरात हे दोन पत्रकार अतिशय सकारात्मक विचारांचे व शांत स्वभावाचे आहेत. आज या दोन पत्रकार मित्राचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या संबंधाने दोन शब्द . . . .

सचिन देशमुख यांनी गेल्या अनेक वर्षांपासुन कराड शहरात दैनिक सकाळ मध्ये बातमीदारी सुरू केलेली आहे. सचिन देशमुख यांचा कराड शहरासह कराड तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. सकारात्मक पत्रकारिता करण्याचा एक पायंडा सचिन देशमुख यांनी कराडमध्ये निर्माण केला आहे. शांत, संयमी पत्रकार म्हणून सचिन देशमुख यांच्याकडे पाहिले जाते. सनसनाटी, भडक व बदनामीकारक बातम्यांपासून सचिन देशमुख लांब असतात. एखाद्या बातमीच्या अनुशंगाने आपल्यापेक्षा कनिष्ठ पत्रकार मित्रांशी चर्चा करायला अथवा ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यायला सचिन देशमुख संकोच करीत नाहीत. सार्वजनिक जीवनात वावरताना अनेक पथ्य पाळावी लागतात ते सचिन देशमुख पाळतात, त्याचबरोबर पत्रकारितेच्या माध्यमातून संयुक्तपणे पत्रकारांचे काही भरीव काम उभा राहावे, यासाठी सचिन देशमुख प्रामाणिक प्रयत्न करतात मात्र, कुठल्याही वादविवादात पडत नाहीत. हा त्यांचा विशेष गुणधर्म म्हणावा लागेल. मात्र एखादे काम हाती घेतल्यानंतर ते तडीस लावेपर्यंत सचिन देशमुख शांत बसत नाहीत. काम पूर्ण होईपर्यंत सातत्याने प्रयत्न करीत असतात. दैनिक सकाळचे बातमीदार सचिन देशमुख माझे परमस्नेही मित्र आहेत. आज त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा. . . .!

काले (ता. कराड ) येथील संभाजी थोरात हे सध्या साम टीव्ही मराठीचे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख म्हणून काम करताहेत. संभाजी थोरात यांनी काले या डेटलाईनवरुन प्रिंट मीडियामध्ये कामास सुरुवात केली. पत्रकारितेतला संभाजी थोरात यांचा प्रवास अतिशय उत्कृष्ट,चांगला आणि चढत्या क्रमाचा आहे. कराड, सातारा, पुणे, मुंबई आणि सध्या कोल्हापूर अशा शहरांमध्ये संभाजी थोरात यांची पत्रकारिता फुलली, खुलली व परिपक्व झालेली आहे. एका छोट्या गावातील एक पत्रकार काय करू शकतो, हा आदर्श संभाजी थोरात यांनी सध्याच्या पत्रकारितेबरोबर भावी पत्रकारांपुढे ठेवलेला आहे. साम टीव्ही मराठीचे पश्चिम महाराष्ट्र
प्रमुख म्हणून काम करताना त्यांना कोणताही अहंभाव नाही. संभाजी थोरात यांचा शांत व संयत स्वभाव आहे. समाजातील उपेक्षित लोकांना न्याय देण्याची त्यांची नेहमी भूमिका असते. त्याचबरोबर विविध चळवळींमध्ये काम करणाऱ्या प्रमुखांचा विचार जनतेसमोर मांडण्यासाठी त्यांच्या मुलाखती घेणे, त्यांना चर्चेत सहभागी करून घेण्यासाठी संभाजी थोरात अग्रक्रंमावर असतात. पत्रकारितेमध्ये काम करताना संभाजी थोरात ज्येष्ठांचा आदर करतात, बरोबर असणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करतात आणि नवोदीत पत्रकारांना सकारात्मक पत्रकारितेचे धडे देतात. अशा प्रामाणिक व चांगल्या स्वभावाचे पत्रकार दुर्मिळ असतात त्यापैकीच एक संभाजी थोरात आहेत. संभाजी थोरात या माझ्या सहयोगी पत्रकाराला वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा. . . .!

गोरख तावरे, कराड
9326711721

टिप्पण्या

  1. पत्रकार देशमुख साहेब व थोरात साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आई तुळजाभवानी आपणास उदंड व निरोगी आयुष्य देवो💐💐💐💐💐

    उत्तर द्याहटवा
  2. पत्रकार सचिन देशमुख साहेब व संभाजी थोरात साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, पंढरीचा पाडुरंग आपणास उदंड व निरोगी आयुष्य देवो💐💐💐💐💐
    संजय हेगडे बातमीदार पंढरपुर
    सकाळ सोलापूर

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.