कराड दक्षिणमध्ये आमदारकी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, युवा नेते अतुल भोसले, उदयसिंह पाटील निवडणूक मैदानात असणार ! (दैनिक सामना दि.८ मे २०१८, कराड वार्तापत्र - गोरख तावरे)
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये राजकीय हलचल सुरू झाली आहे. काँग्रेस अंतर्गत गटबाजीला पूर्णविराम देण्याचा निर्णय होईल ! असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. तब्बल पस्तीस वर्ष कराड दक्षिण विधानसभा मतदार संघावर वर्चस्व गाजवणारे माजी मंत्री विलासकाका पाटील यांनी "येणारी विधानसभा निवडणूक मी लढविणार नाही,’ असे जाहीर केले आहे. गतकाळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत विलासकाका पाटील यांचा पराभव झाला, अन्यथा त्यांच्या आमदारकीची सप्तपदी साजरी केली गेली असती. ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील यांचे नेतृत्व म्हणजे संघर्षातून तावून सुलाखून निघालेले व्यक्तिमत्त्व आहे. सामान्य जनतेशी आपुलकीची नाळ जोडणारे नेते म्हणून विलासकाकांची ओळख आहे. सातारा जिल्ह्यातील राजकारणातील भीष्माचार्य असे एकाकी राजकारणापासून बाहेर जात आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाने अनेक वर्षे दोनच आमदार पाहिले, ते म्हणजे यशवंतराव मोहिते व विलासकाका पाटील. सध्या काँग्रेसचेच पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.
विलासकाका पाटील यांनी एका बाजूला आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील यांनी वेगळी भूमिका जाहीर केली आहे. उमेदवार कोण हे महत्त्वाचे नाही. पण रयत संघटनेच्या ताब्यात पुन्हा आमदारकी आणण्यासाठी कामाला लागा, असे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. याचाच अर्थ काहीही झाले तरी आमदार की रयतकडेने आली पाहिजे, असा अट्टाहास तर नाही ना ? अशी शंका येते. रयत संघटनेकडे आमदारकी आणायची म्हणजे उमेदवार कोण असणार ? हेही स्पष्ट झाले पाहिजे, मात्र उदयसिंह पाटील यांनी तसे स्पष्ट केलेले नाही. मी निवडणूक लढवणार नाही, असे विलासकाका पाटील म्हणाले असले तरी त्यांचे सुपुत्र रयत संघटनेकडे आमदारकी आली पाहिजे, असा हट्ट करतात. म्हणजे उदयसिंह पाटील यांची उमेदवारी आता लपून राहिलेली नाही, येणाऱया विधानसभा निवडणुकीमध्ये कराड दक्षिण मतदार संघातून उदयसिंह पाटील यांची उमेदवारी असणार ! हे मात्र नक्की.
उदयसिंह पाटील यांनी कराड दक्षिण मतदार संघातून उमेदवारी लढवण्यास कोणाची काही हरकत नसावी, मात्र आता योग्य वेळ आहे का ? याचा विचार झाला पाहिजे. कारण सातारा जिल्ह्याबरोबरच राज्यातील प्रमुख राजकीय कुटुंबाचा मागोवा घेतला तर असे लक्षात येते की, ज्या कुटुंबाकडे आमदारकी आहे. तीच आमदारकी पुन्हा त्यांच्या मुलांच्याकडे आलेली आहे. इथे मात्र असे घडलेले दिसत नाही. विद्यमान आमदारांची असताना त्यांच्याच सुपुत्रांची सोय इतर राजकीय नेत्यांनी त्याच कालखंडामध्ये केलेली आहे. याला अपवाद फक्त कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ आहे. ज्येष्ठ नेते, थोर विचारवंत स्वर्गीय यशवंतराव मोहिते यांनीही आपल्या कार्यकाळामध्ये आपल्या सुपुत्राची राजकीय सोय करून दिली नाही. दरम्यान याच पद्धतीने ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील यांनी आपल्या मुलांची राजकीय सोय केलेली नाही. हे स्पष्ट होत आहे. डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी विधानसभा निवडणुका यापूर्वी लढवल्या मात्र, त्यांना यश आलेले नाही. आता पाहावे लागेल रयत संघटनेचा उमेदवार कोण येणार ? की उदयसिंह पाटीलच दक्षिण मतदार संघात निवडणुकीला सामोरे जाणार.
राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण सध्या दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये विकासाभिमुख काम व्हावे, यासाठी पृथ्वीराज चव्हाण सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर शासनस्तरावरील विविध निधी खर्च टाकत आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचा विकासात्मक बदल करून चेहरा मोहरा बदलण्याचा पृथ्वीराज चव्हाण प्रयत्न करीत आहेत. याचा अर्थ पृथ्वीराज चव्हाण यांचा पुढील वारसदार कोण ? हा विषय सध्या तरी चर्चेचा नाही. राज्याच्या राजकारणात पृथ्वीराज चव्हाण यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांचा प्रगल्भ विचार, अभ्यासूपणा याचा फायदा काँग्रेसला करून घ्यावयाचा आहे. यामुळे कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील भावी काँग्रेसचे उमेदवार म्हणून पृथ्वीराज चव्हाणच असणार हे त्रिकालाबाधित सत्य आहे. सातारा जिल्हय़ाबरोबरव राज्याच्या राजकारणामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचे वर्चस्व आहे. त्यांचा राजकीय दबदबा आहे. हे विसरता येणार नाही. कारण स्थानिक पातळीवर पृथ्वीराज चव्हाण दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होतील, अशी चर्चा आहे. यात किती तथ्य आहे. हे आज स्पष्ट झाले नसले तरी, ज्या तडफदार पद्धतीने पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमध्ये व राज्यांमध्ये काम करतात, हे पाहिल्यानंतर ते दिल्ली दरबारी जातील अशी बिलकूल शक्यता नाही.
पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका पाटील यांचे राजकीय गट एकत्र यावेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान गतकाळातील विचार करता स्वर्गीय यशवंतराव मोहिते हे देखील काँग्रेस विचारसरणीचे होते. विलासकाका पाटील हे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून येत होते. स्वर्गीय यशवंतराव मोहिते यांच्या अखेरीपर्यंत कधीही विलासकाका पाटील व यशवंतराव मोहिते गट विधानसभा निवडणूकीला एकत्र आलेले नाहीत. तेव्हा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये पृथ्वीराज चव्हाण व विलासकाका पाटील गट एकत्र येतील, हे म्हणणे अधिक धाडसाचे होईल. एकंदरीत काय तर कराड दक्षिण विधानसभा मतदार संघांमध्ये आगामी आमदारकीच्या दृष्टीने बरीच राजकीय खलबते व राजकीय चर्चा सुरू आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये सहजासहजी कोणाला आमदारकी प्राप्त होत नाही, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय संघर्ष करावा लागतो.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले यांना आमदार करणारच ! अशी भीष्मप्रतिज्ञा कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनदादा मोहिते यांनी घेतली आहे. गत विधानसभा निवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण, विलासकाका पाटील, डॉ अतुल भोसले हे एकमेकांविरोधात उभे होते. यावेळी मदनदादा मोहिते हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाबरोबर असल्याने पृथ्वीराज चव्हाण यांच्या विजयामध्ये आपला महत्त्वपूर्ण वाटा आहे. दक्षिण मतदार संघामध्ये मी एखाद्या उमेदवाराला निवडून आणू शकतो असा आत्मविश्वास मदनदादा मोहिते यांना आहे. सहकाराचे शिल्पकार म्हणून स्वर्गीय जयवंतराव भोसले यांचा वारसा डॉ. अतुल भोसले यांना आहे. यापूर्वी दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवलेले डॉ. अतुल भोसले तिसऱ्यांदा आमदारकी मिळवण्यासाठी प्रयत्न भाजपतर्फे करीत आहेत.
विधानसभा पुर्नरचनेत कराड उत्तरचा बराचसा भाग कराड दक्षिणमध्ये आलेला आहे. यामुळे उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निर्णयानुसारच दक्षिणच्या आमदार कोण होणार ? हे ठरत असते. गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी नसताना राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज यांना सहकार्य व मदत केली होती. उत्तर विधानसभा मतदार संघांमध्ये भाजपातर्फे आमच्याच पक्षाचा आमदार होणार ! असे अशी भाषणबाजी सुरू झाली आहे. दरम्यान उत्तर विधानसभा मतदार संघावर आमदार बाळासाहेब पाटील यांचे पूर्णपणे वर्चस्व आहे. स्वतः निवडून येऊन शेजारी दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये कोणाला आमदार करायचे ? हे आमदार बाळासाहेब पाटील ठरवत असतात. दक्षिणेमध्ये कोणी कितीही राजकीय व्यूहरचना केली तरी, अखेर आमदार बाळासाहेब पाटील यांचा पाठिंबा मिळतो तोच उमेदवार निवडून येतो. हा येथील इतिहास आहे.
एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कराड दक्षिण - उत्तर मध्ये राजकीय वातावरण तयार केले जात आहे. आमच्याच पक्षाचा, संघटनेचा अथवा मीच आमदार होणार अशी मल्लिनाथी केली जात आहे. दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, युवा नेते डॉ अतुल भोसले आणि माजी मंत्री विलासकाका पाटील यांचे वारसदार म्हणून उदयसिंह पाटील हे उमेदवार असणार आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा