मनोमिलन पारावरच्या वायफळ गप्पा, कराडला विधानपरिषदेची संधी शक्य नाही !
विलासकाका पाटील यांना विधानपरिषद मिळाली तर मला आनंदच होईल असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले असले तरी संधी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या हातात आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. गत विधानसभा निवडणुकीमध्ये त्यावेळी विलासकाका पाटील कराड दक्षिणचे आमदार होते. पृथ्वीराज चव्हाण राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी कराड दक्षिण मतदार संघ विलासकाका पाटील यांनी सोडावा आणि त्यांना विधान परिषदेवर संधी दिली जाईल अशी ऑफर देण्यात आली होती, अशी चर्चा चांगलीच रंगली होती. दरम्यान ही ऑफर विलासकाका पाटील यांनी स्वीकारली नाही आणि बंडखोरी करून काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. हा गतकाळातील इतिहास अद्याप सर्वांचे ध्यानीमनी आहे. पुन्हा हाच विषय चर्चेला येण्यामाचा हेतू काय ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. येणारी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे विलासकाका पाटील यांनी जाहीर केले आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासकाका पाटील यांच्या गटामध्ये मनोमिलन होणार ही चर्चा बरेच दिवस कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. या विषयावरही भाष्य करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, त्यांना भाजपला मदत करू नका, असेच सांगायचे आहे. याचा अर्थ मनोमिलनाची चर्चा वायफळ व नुसत्याच पारावरच्या गप्पा ठरल्या आहेत. गतकाळातील कराड दक्षिणचा राजकीय इतिहास पाहता, कदापी विलासकाका पाटील व पृथ्वीराज चव्हाण गट एकत्र येतील आणि मनोमिलन होईल यावर कोणीही सुज्ञ विश्वास ठेवणार नाही. आता या मनोमिलनाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. दीर्घकाळ दोन राजकीय गटांचे विभाजन व मन दुभंगलेले मनोमिलनाचे नावाखाली एकत्र येतील अशी शक्यता वर्तवणे आणि चर्चा सुरू करणे हा कोत्या बुद्धीचे प्रदर्शन आहे. मनोमिलन हा शब्द कराड दक्षिण मतदार संघात सातत्याने चर्चेला जात आहे. यापूर्वी मोहिते - भोसलेंचे मनोमिलन झाले मात्र ते फार काळ टिकले नाही. तत्कालीन एखाद्या निवडणुकीपुरते मनोमिलनाची चर्चा होते, मनोमिलन होते, आणि त्यानंतर मनोमिलनाला तिलांजली दिली जाते हा आतापर्यंतचा अनुभव आहे.
तंटा करून कोणाचे काही साध्य होणार नाही. मग तंटामुक्ती करून काही सकारात्मक साध्य करता आले, तर ते करावे यासाठी तंटा ऐवजी मनोमिलन हा शब्द या ठिकाणी वापरला जात आहे. मोहिते - भोसले यांच्या मनोमीलनातून काही सकारात्मक बदल समाजाला दिसले असते तर पृथ्वीराजबाबा व विलासकाका यांच्या मनोमिलनाला नक्कीच सकारात्मक पाठबळ मिळाले असते. पण आता मनोमिलन होणे नाही. हे स्पष्ट झाले आहे. आगामी काळात विधानपरिषदेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. दोन काँग्रेस पक्षाचे वाट्यातील आहेत. यातील एक जागा ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील यांना मिळाली तर आपल्याला आनंदच होईल असे पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणेही रास्तच आहे. कारण कराड तालुक्याला आणखी एक आमदार मिळेल. आणि विकास प्रक्रियेसाठी शासनाकडील अधिकचा निधी प्राप्त होईल. आकाराने कराड तालुका हा सर्वात मोठा तालुका आहे. दोन विधानसभा मतदार संघाचा यामध्ये समावेश आहे. कराड दक्षिणला काँग्रेसचे लोकप्रतिनिधी म्हणून पृथ्वीराज चव्हाण तर कराड उत्तरला राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील कार्यरत आहेत. विधान परिषदेवर काँग्रेसचेच जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील आहेत. यामुळे आणखी एक जागा काँग्रेसला विधान परिषदेची कराडला मिळण्याची शक्यता ! म्हणणे म्हणजे राजकीय परिपक्वता म्हणता येणार नाही.
भाजपला मदत करू नका, असे आता सर्रास सर्व ठिकाणी होऊ लागले आहे. कारण केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. मात्र जनतेला दिलेली आश्वासने भाजप सरकारने पूर्ण केली नाहीत हा समज सर्वदूर पसरलेला आहे. प्रदीर्घकाळ काँग्रेस सत्तेत होती, राजकारणामध्ये काँग्रेस आहे. मात्र काँग्रेस सरकारने जे कठोर व जनतेच्या विरोधात निर्णय घेतले नाहीत. ते निर्णय भाजप सरकारने घेतलेले आहेत. या निर्णयाचा सर्वात जास्त फटका मध्यमवर्गीय व गरिबांना बसला आहे. यामुळे केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात असंतोष निर्माण झालेला आहे. जनतेच्या हिताचा विचार करण्यापेक्षा, आपल्याच सत्तेच्या मस्तीत राहण्याची भाजपच्या या नीती विरोधात जनता आहे. वरपासून खालपर्यंत भाजपला मदत करायची नाही, अशीच भूमिका आता घेतली जात आहे.एखाद्या ठिकाणी व्यक्ती म्हणून स्वीकारायची तयारी जनतेची असेल मात्र, भाजप पक्ष आला की, नको रे बाबा आता भाजपचे सरकार ! अशा मानसिकतेत देशातील व राज्यातील जनता आहे.
ज्येष्ठ नेते माजी मंत्री विलासकाका पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्षासाठी खर्च केले. गतकाळात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. विधान परिषदेवर आता संधी मिळेल काय ? ही शोध मोहीम सुरू आहे. मात्र येथील दरवाजा बंद आहे. विधान परिषदेवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील असल्यामुळे दुसरी जागा कराडसाठी देणे शक्य नाही. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथीराज चव्हाण यांनी हातवर केले आहेत. हा निर्णय पक्ष श्रेष्टी, काँग्रेसचे नेते व प्रदेशाध्यक्ष घेतात असे सांगून हात झटकले आहेत. मात्र ज्येष्ठ नेते विलासकाकांना विधान परिषदेची संधी मिळाली तर मला आनंदच होईल, हे सांगायला ते विसरले नाहीत.
गोरख तावरे,कराड
9326711721

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा