कराड दक्षिणमध्ये "विकास" वेडा झाला पृथ्वीराजबाबा आणि अतुलबाबा यांचा निधीसाठी सकारात्मक प्रयत्न

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात नेहमीच राजकीय संघर्ष पाहावयास मिळतो. स्वर्गीय यशवंतराव मोहिते यांच्याकडील आमदारकी विलासकाका पाटील त्यांनी खेचून घेतली. तर पस्तीस वर्ष आमदार असणारे विलासकाका पाटील यांच्याकडील आमदारकी पृथ्वीराज चव्हाण यांनी सहज मिळवली. आता पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे असणारी आमदारकी डॉ. अतुल भोसले यांना हवी आहे ! आमदारकी  मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान कराड दक्षिण मतदारसंघासाठी विकास निधी मिळवण्यासाठी सर्वच राजकीय व्यक्ती  प्रामाणिक प्रयत्न करताहेत.

कराड दक्षिणमधील विकासकामांसाठी 1 कोटी 79 लाखांचा निधी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी आणला आहे तर कराड दक्षिणसाठी पृथ्वीराजबाबांच्या माध्यमातून १ कोटी 2० लाखाचा विकास निधी मंजूर झाला आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी अनेक जणांचा हात लागतो आहे. हे निदर्शनास येत आहे. प्रत्येक जण आपापल्या माध्यमातून विकास निधी घेऊन येत आहेत. दरम्यान येथे श्रेयवादाचा कुठलाही मुद्दा उपस्थित होत नाही हे विशेष आहे.

विशेष म्हणजे पृथ्वीराजबाबा व अतुलबाबांनी जो निधी मिळवला तो ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून. मंत्री पंकजा मुंडे यांनीही स्थानिक राजकारणाचा विचार न करता लोकप्रतिनिधी म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रस्तावाचेा तर भाजपाचे सरचिटणीस म्हणून डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रस्तावानुसार कराड दक्षिणच्या विकासासाठी निधी दिला आहे. कराड दक्षिणमधील  १९ गावांमध्ये आवशक्य विकास निधी पाहिजे होता. तो आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून मिळवला. आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये गट-तट व मतभेद बाजूला ठेवून प्रत्येक गाव व वाडीवस्तीमध्ये विकासनिधी दिला आहे.

 इतकेच काय तत्कालीन परिस्थितीमध्ये डॉ. अतुल भोसले यांनीही याच कराड दक्षिण मतदार संघासाठी तत्कालीन मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून निधी मिळविला होता.  तालुक्याचे केंद्रस्थान असलेल्या कराड शहर व सभोवतीच्या परिसराला ऐतिहासिक झळाळी देण्याचा पृथ्वीराजबाबांचा प्रयत्नही यशस्वी झाला आहे. कराड शहराचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. कराड दक्षिण मतदार संघामध्ये आता "विकास" वेडा झाला आहे असे म्हणावे लागेल. कारण गतकाळातील पस्तीस वर्ष माजी मंत्री विलासकाका पाटील यांनी कराड दक्षिणसाठी मोठे योगदान दिले आहे. माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करून कराड दक्षिणचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

दरम्यान आपली राजकीय जडणघडण ज्या कराड दक्षिण मतदारसंघात होत आहे. यासाठी भाजपाचे सरचिटणीस डॉ. अतुल भोसले राज्य शासनाच्या विविध विभागांकडून कराड दक्षिणच्या विकासासाठी विविध प्रकारचा निधी आणून आपलेही योगदान यांमध्ये आहे. असे अधोरेखित करीत आहेत. डॉ. अतुल भोसले यांनी राज्यशासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या माध्यमातून 1 कोटी 79 लाख रूपयांचा निधी आणला तो  घोणशी, काले, टाळगाव,कासारशिरंबे, घारेवाडी, गोंदी, रेठरे खुर्द, सैदापूर, वाठार,नारायणवाडी, काले, मालखेड, नांदगाव, कालवडे, ओंडोशी या गावांमध्ये विविध विकासकामासाठी वापरला जाणार आहे. तर जखिणवाडी, नारायणवाडी (काले),  टाळगाव, घराळवाडी, कासारशिरंबे,  घारेवाडी, गोंदी, रेठरे खुर्द,  सैदापूर,  वाठार, काले या गावांमध्ये आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आणलेला  १ कोटी 2० लाखाचा विकास निधी वापरला जाणार आहे. कराड दक्षिणमधील सर्व गावे व जनता नशीबवान म्हणावे लागेल कारण विकास निधीचा येथे कमतरताच नाही.

गोरख तावरे,
9326711721

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.