व्यवसायामध्ये विश्वासहर्ता निर्माण करणारे, समाजहित रक्षक, विकास कामांना सकारात्मक वैचारिक पाठिंबा देणारे नगरसेवक विजय वाटेगावकर
यशस्वी बांधकाम व्यावसायिक ते समाजहित रक्षक नगरसेवक अशी प्रतिमा निर्माण झालेले, बांधकाम व्यवसायामध्ये विश्वासहर्ता निर्माण करून समाजाचे आपण काही देणे लागतो ! यासाठी नगरसेवक पदाचा वापर समाजहितासाठी व कराडच्या विकासासाठी प्रयत्न करणारे आरोग्य समितीचे माजी सभापती व विद्यमान नगरसेवक विजय वाटेगावकर यांचा आज वाढदिवस असल्यामुळे ज्येष्ठ पत्रकार गोरख तावरे यांनी त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा. . .
विजय वाटेगावकर हे सामान्य कुटुंबातील असून त्यांनी उच्च शिक्षण घेतल्यामुळे बांधकाम व्यवसायात पदार्पण केले. जे काम हाती घ्यायचे ते नीटनेटके व दर्जेदार करायचे असा त्यांचा कयास असतो. कराड शहरासह विद्यानगर, सैदापूर, मलकापूर शहरांमध्ये विजय वाटेगावकर यांनी अनेक व्यावसायिक इमारती उभ्या केल्या आहेत. गृह प्रकल्पांबरोबरच व्यावसायिक सदनिकाही त्यांनी तयार केलेल्या आहेत. दर्जेदार व भक्कम बांधकामांमुळे विजय वाटेगावकर यांनी उभ्या केलेल्या प्रकल्पांना तात्काळ मागणी होत असते. बांधकाम व्यवसायामध्ये विजय वाटेगावकर यांचे अनेक पार्टनर (साथीदार) आहेत. जे एकत्रित मिळून बांधकाम व्यवसाय करतात. पार्टनरशिपमध्ये पारदर्शक व्यवहार असल्याने आतापर्यंत विजय वाटेगावकर यांच्याबरोबर काम करणारे अनेकजण बांधकाम व्यवसायामध्ये यशस्वी झाले आहेत. हायस्कूल, महाविद्यालय, बांधकाम व्यवसाय, सामाजिक कार्यांमध्ये काम करताना विजय वाटेगावकर यांचा मोठा मित्र परिवार आहे. त्या सर्वांशी विजय वाटेगावकर यांचा विश्वासपूर्ण मित्रत्वाचे सलोखापूर्ण संबंध आहेत.
खडतर परिस्थितीवर मात करून बांधकाम व्यवसायात यशस्वी झाल्यानंतर विजय वाटेगावकर यांनी कराड नगरपालिका राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि नगरपालिका राजकारणात विजय वाटेगावकर यशस्वी झाले. नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजय वाटेगावकर सहज निवडून येतात, प्रभाग असो किंवा वॉर्ड यांमधील मतदारांचा विजय वाटेगावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याने प्रचंड मताधिक्यांनी विजय वाटेगावकर निवडून येतात. निवडून आल्यानंतर मतदारांशी असलेला घरोबा व विश्वासास नेहमीच ते पात्र राहिलेले आहेत. मतदारांशी केवळ निवडणुकीपुरताच संबंध ठेवणारे विजय वाटेगावकर नगरसेवक नाहीत. तर निवडणुकीनंतरही मतदार हे आपलेच कुटुंबातील सदस्य आहेत. याप्रमाणे ते मतदारांना वागणूक देत असतात. म्हणूनच नगरपालिका राजकारणातील लोकप्रिय नगरसेवक म्हणून विजय वाटेगावकर यांचा सातत्याने उल्लेख होत असतो.
आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब, छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, सिक्कीमचे महामहिम राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते, माजी आमदार विलासकाका पाटील या आजी - माजी लोकप्रतिनिधींशी त्यांचा निकटचा संबंध आहे. गट - तट व पक्षविरहित विजय वाटेगावकर यांचा सर्वांची राजकारणापलीकडे केवळ विकास कामांशी सकारात्मक वैचारिक देवाणघेवाण असते. लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील, यशवंत आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र यादव, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील या नगरपालिका राजकारणातील प्रमुखांशी विजय वाटेगावकर नेहमी संपर्कात राहून विकासकामांबाबत चर्चा करीत असतात. नगरपालिकेच्या विकासकामांमधील सामुदायिक निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्याचबरोबर कराड शहराच्या विकासासाठी एखादी योजना अथवा प्रकल्प राबवण्यासाठी विजय वाटेगावकर अग्रक्रमावर असतात. त्याचबरोबर शासनस्तरावर कराड नगरपालिकेला विकासकामांसाठी निधी मिळावा, यासाठी ते प्रयत्न करीत असतात.
नगरसेवक म्हणून विजय वाटेगावकर कराड शहरात लोकप्रिय आहेतच. दरम्यान गतवर्षी विजय वाटेगावकर यांच्याकडे आरोग्य समितीचे सभापतीपद होते. या एक वर्षांच्या सभापती कार्यकाळामध्ये कराड शहराचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने विजय वाटेगावकर यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेला नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका स्वच्छता मोहीमेत देशभरातील चार हजार शहरांचा समावेश होता. यामध्ये चौथ्या क्रमांकावर कराड नगरपालिकेला मान मिळून देण्यामध्ये विजय वाटेगावकर यांचे अनन्यसाधारण योगदान आहे. हे विसरता येणार नाही. आरोग्य समितीचे सभापती कार्यकाळांमध्ये विजय वाटेगावकर सकाळी सहा ते रात्री उशिरापर्यंत कराड शहरातील स्वच्छतेबाबत जागृत राहुल कर्मचाऱयांकडून काम करून घेत होते. स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी विजय वाटेगावकर यांनी अनेक उपक्रम राबवले होते. एखादे काम हाती घेतले की, ते झपाटल्याप्रमाणे कसे करावे, याचा आदर्श विजय वाटेगावकर यांनी कराड नगरपालिका राजकारणात घालून दिला आहे.
विजय वाटेगावकर हे व्यक्तिमत्त्व शांत स्वभावाचे असून कोणताही निर्णय पूर्ण विचारांती घेणारे आहेत. सार्वजनिक जीवनात वावरत असताना प्रसिद्धीपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात, दरम्यान मीडियातील व्यक्तींशी सकारात्मक संबंध यामुळे ते नेहमी प्रकाश झोतात असतात. समाजहित नजरेसमोर ठेवून सकारात्मक काम करणारे व्यक्तिमत्त्वांबरोबर कराडमधील मीडिया नेहमी राहिली आहे. नगरसेवक विजय वाटेगावकर यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांना मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस सदिच्छा . . . !
गोरख तावरे,कराड
9326711721

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा