पलूस विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवार उभा करणार नाही ! काँग्रेस पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कराडात घोषणा
कराड (लक्ष्मीपुत्र) - सांगली जिल्ह्यातील पलूस विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कराडात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आदरणीय स्वर्गीय पी.डी. पाटीलसाहेब यांच्या मंगळवार पेठेतील निवासस्थानी आदरांजली अर्पण केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कराडच्या पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, दिलीपतात्या पाटील, सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनिल माने, पंचायत समितीचे माजी सभापती देवराज पाटील उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रीय काँग्रेस पार्टी यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू होती. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मोहन प्रकाश व राष्ट्रवादी पक्षाचे प्रफुल्ल पटेल यांनी चर्चा केली व आमच्या पक्षाचे व काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आलेले आहेत. लोकसभेच्या दोन जागा गोंदिया राष्ट्रवादी पार्टी व पालघर काँग्रेस पक्ष लढवेल. विधानसभेची पलूसची जागा ज्येष्ठ नेते डॉ पतंगराव कदम यांचे निधन झाल्यामुळे या पलूस जागेवर डॉ विश्वजित कदम लढतील असे दिसते. काँग्रेस पक्षाला पलूस जागेसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा देण्याची घोषणा आज मी या ठिकाणी करीत आहे. पलूसच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपला उमेदवार उभा करणार नाही. असेही जयंत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
गोरख तावरे,कराड
9326711721

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा