"तुमची मायेची शाल माझ्या खांद्यावर टाका" डॉ. विश्वजित कदम यांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भावनिक आवाहन !

कार्यक्रमाच्या नियोजित वेळेपेक्षा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उशिरा व्यासपीठावर दाखल झाले. तत्पूर्वी कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. पुरस्कारप्राप्त काही पत्रकारांचा सत्कारही संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे व भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील दैनिक पुढारीचे चिप ब्युरो हरिष पाटणे यांचा सत्कार झाला होता. हरिष पाटणे मनोगत व्यक्त करताना जयंत पाटीलसाेब यांना चिमटा काढत म्हणाले,"साहेब तुमची मायेची शाल आमचे अंगावर राहून गेली" असे सांगितले. हाच धागा पकडत भारती विद्यापीठाचे कार्यवाह विश्वजित कदम यांनी जयंत पाटील यांना साकडे घालून "आपली मायेची शाल माझा खांद्यावर टाकावी" असे भावनिक आवाहन केले. डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने सांगलीतील पलूस विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली असून तेथे डॉ. विश्‍वजित कदम अर्ज भरणार आहेत. या पलूस जागेच्या वाटपासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात सध्या चर्चा सुरु आहे.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे पुरस्कार वितरण पुण्यात झाले. या कार्यक्रमाला मी आवर्जुन उपस्थित होतो. पुरस्कार प्राप्त संपादक, पत्रकारांमधील काही मंडळी माझे स्नेही व मित्र असल्यामुळे या कार्यक्रमाला मी आवर्जुन पुण्याला गेलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार काही दुखापतीमुळे कार्यक्रमांना गैरहजर राहिले, शरद पवार यांनी आपला प्रतिनिधी म्हणून नवनिर्वाचित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठविलेमुळे व्यासपीठावर ऐनवेळी संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, सुभाषराव शिंदे, पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक रवींद्र बेडकीहाळ पत्रकार विजय मांडके उपस्थित होते.

पोटनिवडणुकीतील जागे संदर्भाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रीय काँग्रेस यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरु आहे. आणि माझी नुकतीच प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्यामुळे या विषयावर मला जास्त बोलता येणार नाही, पण "चर्चा सुरू आहे" असे सूचक सांगत जयंत पाटील म्हणाले मी नुसता आमदार असतो तर, यापूर्वीच माझी भूमिका जाहीर केली असती, मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्षा असल्यामुळे मला काही मर्यादा आहेत. डॉ. पतंगराव कदम व जयंत पाटील यांच्यामधील स्नेहाचा बंदही यावेळी त्यांनी खुलेपणाने सांगितल. डॉ. पतंगराव कदम यांनी राज्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी केलेले काम अलौकिक आहे. सांगण्याचा मुद्दा असा की, डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र डॉ. विश्वजित कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सहकार्य व मदत केली पाहिजे अशी लोकभावना आहे.

डॉ. विश्वजित कदम हे राजकारणात सक्रिय असले तरी, महाराष्ट्राच्या विधानसभेत पहिल्यांदा जाण्याची त्यांना संधी प्राप्त होत आहे. आणि अशा तरुण कार्यकर्त्याला राष्ट्रीय काँग्रेस पार्टीने उमेदवारी दिली आहे. फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यांना सहकार्य व मदत करणे आवश्यक आहे. कारण ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी लोकभावनाच आहे. गट - तट, पक्षविरहित डॉ. पतंगराव कदम यांनी केलेले काम नाकारता येणार नाही. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. विश्वजित कदम यांच्या खांद्यावर मायेची, विजयाची, शाल पांघरावी अशीच भावना विश्वजित कदम यांनी व्यक्त केली आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला बेरजेचे राजकारण करण्याचे शिकविले आहे. त्यांच्याच पायवाटेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वाटचाल करीत आहेत. यामुळे पलूस विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवार बेरजेचे राजकारण करून निवडणूक बिनविरोध करतील, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.

महाराष्ट्र कल्याण पत्रकार निधीच्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबरीने आपण व्यासपीठावर बसावे, अशा मानसिक तयारीत डॉ. विश्वजित कदम नव्हते, शरद पवार यांच्याबद्दल डॉ.विश्वजित कदम यांच्या मनामध्ये असणारा आदर, जिव्हाळा, प्रेम, आपुलकी आणि त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखत डॉ. विश्वजित कदम दोन पावले मागे होते. दरम्यान संयोजकांची भूमिका वेगळी होती. महाराष्ट्रातील ज्येष्ठ, राजकीय मुसद्दी, व्यक्तिमत्त्व म्हणून शरद पवार आणि कर्तृत्ववान, होतकरू, तरुण कार्यकर्ता म्हणून डॉ. विश्वजित कदम यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. "मायेची शाल" आता राष्ट्रवादीने डॉ. विश्वजित कदम यांच्या खांद्यावर टाकावी. अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे डॉ. विश्वजित कदम यांनी व्यक्त केले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काय भूमिका घेतात ! याकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

गोरख तावरे, कराड.
9326711721

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.