खासदर छत्रपती उदयनराजे यांचे काय करायचे ते आम्ही ठरवू - शरद पवार / दैनिक सामना 26 डिसेंबर 2018
कराड - सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपशी वाढणारी सलगीबाबत विचारले असता "याची चिंता करू नये, त्यांची काळजी घेण्यास आम्ही समर्थ आहोत, खासदार उदयनराजे भोसले यांचे काय करायचे ते ठरवू असे खासदार शरद पवार म्हणाले.
आमदारविक्रमसिह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त पाटण येथे आल्यानंतर खासदार शरद पवार पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.
मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाबाबत खासदार शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, एखाद्या समुहाबाबतच्या सामाजिक आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावयाचा असल्यास राष्ट्रपती नोटिफिकेशन काढून निर्णय घेऊ शकतात. केंद्र सरकारने याबाबत घटनादुरुस्ती केली आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना ही घटनादुरुस्ती लक्षात घेतलेली आहे किंवा नाही हे मला माहीत नाही. त्यामुळे मराठा आरक्षण कायद्याच्या पातळीवर टिकेल का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत काही घटना तज्ञांनी माझ्याकडे शंका व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने मराठा आरक्षणाबाबत कार्यवाही करावी अन्यथा धनगर समाजाच्या आरक्षणाप्रमाणे मराठा समाजाची ही फसवणूक होऊ शकते. अशी भीती खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली.

होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये जागावाटपाचा निर्णय झाला आहे का असे विचारले असता का शरद पवार म्हणाले,
राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. 48 जादापैकी सुमारे 40 जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले असून उर्वरित आठ जागाबाबत प्रदेश पातळीवरील नेते लवकरच बोलणी करणार आहेत. मात्र प्रत्येक राज्यामध्ये घटक पक्ष आणि कॉंग्रेस पक्ष यांनी आघाडीचा निर्णय त्या त्या राज्यापुरता घ्यावा अशा स्वरूपाची चर्चा झालेली आहे.

माजी राज्यपाल डॉक्टर डी. वाय. पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. याबाबत विचारले असता खासदार शरद पवार म्हणाले डॉ. डी.वाय. पाटील हे गेली वर्षभर माझ्या संपर्कात आहेत. मला तुमच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे.असे त्यांनी अनेकदा मला बोलून दाखवले होते. डी. वाय. पाटील यांनी अनेक पदावर काम केले असून त्यांची कोणत्याही पदाची इच्छा नाही. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ माणूस सहकार्य करण्यासाठी जर पुढे येत असेल तर त्यांचे स्वागत करायला हवे असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बारामती येथील सभेत केलेल्या टिके संदर्भात विचारले असता, शरद पवार म्हणाले, टीका करणे हे त्यांचे कामच आहे. साडेचार वर्षांपूर्वी बारामतीत फडवणीस यांनी धनगर समाजाच्या अधिवेशनात येऊन सत्ता आल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. मात्र गेल्या साडेचार वर्षात अनेक मंत्रिमंडळ बैठक झाल्या मात्र, आरक्षण न देता त्यांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे. धनगर समाजाला त्यांनी आरक्षण दिले नाही. ही वस्तुस्थिती आहे. लबाडा घरचे जेवणाचे निमंत्रण जेवल्याशिवाय खरे नसते असा टोलाही त्यांनी लगावला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा