विकास निधीतून "विकास" करणारे दोन आमदार एक नामदार




सातारा जिल्हा हा राजकीय व सामाजिक दृष्ट्या जागृत आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील आमदार विकास निधी आणण्यासाठी कुठेही कमी पडत नाहीत हे निदर्शनास येत आहे शासन स्तरावरून विकास कामासाठी निधी आणलेला पाहता आमदार बाळासाहेब पाटील आमदार शंभूराज देसाई णि विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले कोठेही कमी पडले नाहीत हे निदर्शनास येत आहे सर्वसामान्य जनतेला प्राथमिक सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी लोकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. दोन आमदार व एक नामदार यांनी आपल्या मतदारसंघासाठी शासनाकडून आणलेला निधीचा गौरव झाला पाहिजे.

कराड शहराची हद्दवाढ झाली आहे. या हद्दवाढ विभागात अनेक विकासकामे करणे आवश्यक आहे. यासाठी राज्य शासनाकडून अधिकचा निधी प्राप्त होणे आवश्यक होते. याकरिता श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी वाखानरोड व बैलबाजार परिसराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून निधी मिळविला आहे. या नागरी सुविधांसाठी ३ कोटी १० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. तो लवकरच प्राप्त होईल आणि हद्दवाड भागांमध्ये विकास कामांचा धूमधडाका सुरू होईल. याचबरोबर कराड तालुक्यातील कार्वे येथील धानाई-जाकाई देवस्थानला "ब" वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. यासाठी ही २ कोटीचा निधी मिळाला आहे. हा निधी मिळवण्यासाठी डॉ. अतुल भोसले यांनी प्रयत्न केला असून त्यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये विकास कामांसाठी आमदार बाळासाहेब पाटील सातत्याने प्रयत्न करीत असतात. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांमुळे सासुर्वे ते तारगाव रस्त्याच्या कामास ५ कोटीचा निधी मिळाला आहे. यामुळे दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. सातारा - सांगली जिल्ह्याला जोडणारा व प्रवास सुखकारक होण्यासाठी सदर रस्ता भक्कम होणे गरजेचे होते. यासाठी आमदार बाळासाहेब पाटील यांनी प्रयत्न करून राज्य शासनाकडून रस्त्यासाठी ५ कोटीचा निधी मिळविला आहे. सदर रस्त्याचे काम यापूर्वीच सुरू झालेले आहे. दरम्यान सुधारित आराखड्याप्रमाणे यासाठी अधिकचा निधी आमदार बाळासाहेब पाटील यांनी मिळवला आहे. तर केळेवाडी या डोंगरपठारावरील गावाने रस्त्याच्या भूमिपुजनामुळे साजरी केली दिवाळी हे वैशिष्ट्यपूर्ण का म्हणावे लागेल हे वैशिष्टपूर्ण काम म्हणावे लागेल कारण आमदार शंभूराज देसाईंमुळे रस्त्याच्या प्रश्न मार्गी लागला आहे.५ कोटी १४ लाख ३४ हजार निधी मंजुर झालेला आहे कराड उत्तर कराड दक्षिण व पाटण विधानसभा मतदारसंघांमध्ये विकासकामांचा धूमधडाका सुरू आहे

कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील कराड दक्षिण चे युवा नेते व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले पाटण चे आमदार शंभूराज देसाई यांनी विकास कामांसाठी शासनाकडून निधी मिळवलेला आहे. कराड शहरातील नव्याने हद्दवाद झालेल्या भागात नागरी सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून 3 कोटी 10 लाख रूपयांच्या निधी मिळविण्याकरिता डॉक्टर अतुल भोसले यांनी शासन स्तरावर प्रयत्न केलेला आहे. कार्वे (ता. कराड) येथील महाराष्ट्राचे उपशक्तीपीठ असणार्‍या श्री धानाई-जाकाईदेवी देवस्थानाला ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा प्राप्त झाला. यासाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नामुळे हा दर्जा प्राप्त झाला आहे. कराड उत्तर विधानसभा मतदार संघात दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा रस्ता करण्यासाठी आमदार बाळासाहेब पाटील यांनी शासनाकडून रस्त्याच्या कामास ५ कोटीचा निधी मिळवलेला आहे. दळणवळणाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा, खंडाळा -कोरेगाव-रहिमतपूर-तारगाव-कराड-सांगली-शिरोळ रस्ता राज्यमार्ग सासुर्वे ते तारगांव स्टेशनपर्यंतचा रस्ता सुधारणा करण्याचे काम सुरू असून ते प्रगतीत पथावर आहे. सदर रस्त्याचे काम गतीने सुरू
आहे. हा रस्ता रहिमतपूर, पुसेसावळी, पुसेगावकडून कराड व सांगलीकडे जाणाच्या तसेच कराड, मसूर व सांगलीच्या लोकांना खंडाळ्याकडे जाण्यासाठी फार महत्वपूर्ण आहे. या रस्त्यामुळे दळणवळणामध्ये अधिकची सुलभता निर्माण होणार आहे.

गतवेळी विरोधी पक्षाचा आमदार असताना आमदार शंभूराज देसाई यांनी २१७ कोटी रुपयांचा विकास या तालुक्यात केला. दरम्यान सध्या शिवसेना-भाजप युतीचे सरकार असल्यामुळे आणि आमदार शंभूराज देसाई हे शिवसेनेचे आमदार असल्या कारणास्तव त्यांनी जिल्हयाच्या निधीबरोबर राज्याच्या तिजोरीतून पाटण मतदार संघातील प्रलंबीत विकासकामांना कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आणलेला आहे हे मान्यच करावे लागेल. कराड तालुक्यामध्ये विकास होत असताना यामध्ये भेदभाव केला जात नाही हे विशेषत्वाने याठिकाणी सांगावे लागेल कारण जनतेने त्यांची सेवा करण्यासाठी आपणाला निवडून दिले आहे याची जाणीव लोकप्रतिनिधींना आहे.

आमदार बाळासाहेब पाटील हे उत्तर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावांमध्ये विकासाभिमुख प्रगती झाली पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात त्याचबरोबर पाटण तालुक्यामध्ये विकासाची गंगा सातत्याने वाहिली पाहिजे यासाठी आमदार शंभूराज देसाई प्रयत्नांची पराकाष्टा करीत असतात हे मान्य करावेच लागेल. त्याचबरोबर सध्या इथे सरकारच्या माध्यमातून डॉ. अतुल भोसले यांना संधी मिळाली आहे यामुळे तेही विकास निधी आणण्यासाठी अग्रक्रमावर असतात.

गोरख तावरे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.