दि.कराड आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनिअरर्स असोसिएशन संस्थेचा सर विश्वेश्वरय्या पुरस्कार’ जलसंधारण महामंडळाचे मुख्य अभियंता सुनिल कृशिरे, यांना जाहिर दिपक रैनाक यांची पत्रकार परिषदेत घोषणा



कराड दि.१८ (लक्ष्मीपुत्र ) - दि.कराड आर्किटेक्ट अॅण्ड इंजिनिअरर्स असोसिएशन संस्थेच्या 51 व्या अभियंता दिनानिमित्त देण्यात येणारा सर विश्वेश्वरय्या पुरस्कार’ जलसंधारण पुणे तथा प्रभारी व्यवस्थापकीय संचालक जलसंधारण महामंडळाचे ( संभाजीनगर ) मुख्य अभियंता सुनिल कृशिरे, यांना देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष दिपक रैनाक यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी उपाध्यक्ष राजेश पटेल, सचीव सचीन सुर्यवंशी, खजिनदार विजय गायकवाड, अजित पाटील, प्रकाश पाटील, रविराज शिंदे, श्रीधर इनामदार, दिग्वीजय जानुगडे, धैर्यशिल यादव, अजिंक्य पाटील उपस्थितीत होते.

सुनिल कुशिरे यांना इमेज वेलफेअर अचिव्हर्स फोरमकडून मानाचा” राष्ट्रीय जलसिंचन अवॉर्ड" ने गौरविण्यात आले होते अशा कर्तबगार अभियंत्यास दि. कराड आर्किटेक्स अॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशनच्यावतीने देण्यात येणारा “ सर विश्वेश्वरय्या पुरस्कार, मानपत्र देवून कर्तव्यदक्ष प्रशासकाच्या समर्पित कारकिर्दीचा गौरव करण्यात येणार आहे.

पुरस्कार प्रदान सोहळा 20 डिसेंबर रोजी सायं. 5.वा. यशवंतराव चव्हाण स्मृति सदन, या ठिकाणी आयोजित केला आहे. महसुल व बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, विठ्ठल रुक्मिणी मंदीरे समितीचे अध्यक्ष अतुल भोसले , यांचे प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी जगातील सर्वात उंच सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा स्टॅच्यु ऑफ युनिटी” गुजरात व देशातील तृतीय क्रमांकाचा न्यू मांडवी रिव्हर केबल स्टेड झीज (सस्पेन्शन) गोवा या प्रोजेक्टचे चित्रफीतीसह सादरीकरण एल.अॅण्ड टी चे प्रोजेक्ट मॅनेजर डी. एम. कोरे, हे स्वतः उपस्थित राहून करणार आहेत. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष, इंजि. दिपक रैनाक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सुनिल कुशिरे यांचा परिचय

उरुण (ता. वाळवा) या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले व कराड मधील शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रीकी महाविद्यालय मधून बी.ई.सिव्हील (स्ट्रक्चरस) हे पदयुत्तर शिक्षण सलग सहा वर्षे प्रथम क्रमांक मिळतून पूर्ण केला आहे.जलसंपदा विभागात महाराष्ट्रातून प्रथम मिळवून रुजू झाले आहेत. आता पर्यंतच्या कारकिर्दीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठी टेंभू उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे.

सातारा जिल्ह्यातील तारळी प्रकल्पामधील पुर्नवसनाचे प्रलंबीत प्रश्न कुशलतेने हातलून प्रकल्पामध्ये पाणी साठा पूर्ण केला आहे. या बरोबर ताकारी, दुधगंगा, वारणा, उरमोडी, सारंगखेडा, बरेज या अत्यंत महत्वाच्या प्रकल्पाचे कामकाज संभाळले आहे. तसेच केंद्र शासनाच्या ओ.आय.बी.पी. योजने अंतर्गत वारणा व तारळी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात निधी मिळविण्यासाठी योगदान दिलेले आहे. सध्या जलसंधारण विभागातील अत्यंत महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानामध्ये संपुर्ण महाराष्ट्रातील कामकाज कुशलतेने हाताळत राज्य जलयुक्त व दुष्काळमुक्त करण्यामध्ये मोठा हातभार लावला आहे. सध्या त्यांच्याकडे जलसंधारण विभागातील शासकीय कामकाजाचे संपुर्ण महाराष्ट्राचे कार्यक्षेत्र असून, एकंदरीत अधिकारी व कर्मचारी मिळून 10 हजार लोकांचे नेतृत्व कुशलनेते सांभाळत आहेत. या योगदानाची दखल घेवून शासनाने
त्यांच्यावर वयाच्या 46 व्या वर्षी "व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ’ या सचीव पदाच्या दर्जाची अतिरिक्त जबाबदारी सोपविली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.