मलकापुर येथील विकास लाखेचा गोळया घालुन खुन टोळी युद्धाचा भडका, मलकापूर परिसरात वातावरण तंग
कराड (लक्ष्मीपुत्र) - आगाशिवनगर-मलकापूर येथे बुधवारी रात्री एका युवकाचा गोळ्या झाडून खून झाल्याची घटना घडली. यामुळे एकच खळबळ माजली असुन बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आगाशिवनगर (ता.कराड) येथील जॅकवेलकडे जाणा-या रस्त्यावर हा खून झाला. विकास उर्फ विकी रघुनाथ लाखे (रा. दांगटवस्ती मलकापूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.टोळीयुद्ध व वर्चस्व वादातून ही भिषण घटना घडल्याची चर्चा आहे.
दोन दुचाकीवरून आलेल्यांनी बेछूट गोळीबार केला. यामध्ये सुमारे चार ते पाच गोळ्या विकास लाखे याला लागल्या होत्या. गोळीबारानंतर विकास लाखे याला तत्काळ कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना त्याचा रुग्णालयांत मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक सुरज गुरव पोलीस फोजफाटा घेवुन दाखल झाले. टोळीयुद्ध व वर्चस्व वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे आगाशिवनगर मलकापूरला मोठा तणाव निर्माण झाला आहे.
कराड तालुक्यात काही महिन्यांपासून टोळीयुद्धातून खुनासारख्या घटना घडल्या आहेत तालुक्यात वर्चस्ववादातून अधूनमधून अशा घटना घडतात ऑगस्ट महिन्यात मध्यरात्रीच्या सुमारास टोळीच्या वर्चस्ववादातुन पवन सोळवंडे यांचा खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी सतरा जणांना ताब्यात घेतले आहे. ही घटना ताजी असतानाच मलकापूर- आगाशिवनगर येथील परिसरातील रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तीन ते चार जणांनी विकास उर्फ विकी लाखे (वय ३० वर्षे ) याच्यावर बेछूट गोळीबार करत पळ काढला.गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील लोकांनी त्या दिशेने धाव घेतली असता विकास रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर गंभीर अवस्थेत असल्याचे दिसले. त्या ठिकाणी गोळा झालेल्यांपैकी काही युवकांनी विकासाला तात्काळ कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र रक्तस्राव मोठय़ा प्रमाणात झाल्यामुळे उपचारादरम्यानच विकासचा मृत्यू झाला.
गोळीबाराची माहिती मिळताच घटनास्थळाकडे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव यांच्यासह फौजफाटा दाखल झाला. रात्री घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख अश्विनी सातपुते व धीरज पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली व तपासाबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा