सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये ५ वर्षात १००० ओपन हार्ट हृदय शस्त्रक्रिया यशस्वी


कराड (लक्ष्मीपुत्र) - सहयादि हॉस्पिटलने नुकतेच 1000 हृदय शस्त्रक्रियांचा टप्पा यशस्वीरीत्या पार केला आहे, यामध्ये मुख्यतः बायपास व ओपन हार्ट सर्जरी यांचा समावेश आहे.कराड व आसपासच्या तालुक्यांमधील गरजू लोकांना मोठ्या शहरांपर्यंत प्रवास करण्यापेक्षा येथेच दर्जेदार सेवा उपलब्ध व्हाव्यात या सह्याद्रि समुहाच्या प्रयत्नांच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा आहे अशी माहिती डॉ.राजेश कौशिश ,डॉ.श्रीरंग रानडे, डॉ.धैर्यशील कणसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सहयाद्रि हॉस्पिटल येथे 2013-14 साली हदयरोग शस्त्रक्रिया सुरू झाल्या. तत्पुर्वी हृदयशस्त्रक्रियेसाठी पुणे किंवा मुंबईला जावे लागायचे.कराडसारख्या ठिकाणी ओपन हार्ट सर्जरी करायची म्हणजे तसे आव्हानात्मकच होते पण 5 वर्षांमध्ये1,000 शस्त्रक्रियांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला. सह्याद्रि हॉस्पिटल येथील हदयरोग तज्ञ डॉ.राजेश कौशिश म्हणाले की, हदय शस्त्रक्रियेची मुख्यतः 2 गटात विभागणी होते, प्रौढांवर केल्या जाणाऱ्या आणि पेडियाट्रिक शस्त्रक्रिया. पेडियाट्रिक शस्त्रक्रिया म्हणजे लहान मुलांमधील जन्मतः असलेले हृदयदोष, प्रामुख्याने हृदयाला छिद्र असणे तसेच प्रौढांवरील सर्जरीचे दोन उपप्रकार असतात, ते म्हणजे वॉलव्हयुलर ार्ट डिसीज आणि कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज. कराड सह्याद्रि येथे आम्ही लहान मुलांच्या हृदयाच्या छिद्रासाठी तशी सोपी समजली जाणाऱ्या शस्त्रक्रियेपासून ते हृदयाची मुख्य रक्तवाहिनी व झडप एकत्रित बदलण्यासाठीची शस्त्रक्रिया सारखी अगदी हार्ट ट्रान्सप्लांट पेक्षाही अवघड असणारी शस्त्रक्रिया कराड येथे यशस्वीरित्या करण्यात आल्या आहेत.

सह्याद्रि हॉस्पिटल येथील हदयरोग शस्त्रक्रिया विभागाचे समन्वयक डॉ.नवनाथ जाधव म्हणाले की, या पाच वर्षातील 1,000 शस्त्रक्रियेच्या प्रवासात,अगदी अभिमानाने सांगावी अशी बाब म्हणजे, शस्त्रक्रियेदरम्यान जीवाला धोका होण्याचे प्रमाण हे अगदी 1 टक्क्यांहून कमी आहे. जागतिक स्तरावर ओपन हार्ट सर्जरी आणि बायपास दरम्यान धोक्याची टक्केवारी ही 3 ते 4 टक्के आहे, जेंव्हा कि सह्याद्री हॉस्पिटल येथे जीवाला धोका होण्याचे प्रमाण १ टक्क्याहूनही कमी असून शस्त्रक्रियेनंतरची घेतली जाणारी वैद्यकीय काळजी याचा महत्वाचा वाट आहे. आपल्याकडील उपचारांचा दर्जा हा चांगला असून कराड सारख्या छोट्या शहरातील वैद्यकीय सेवेचा उत्तम दर्जा हि बाब वाखाण्याजोगी आहे

सह्याद्रि हॉस्पिटल्स,कराडचे युनिट हेड डॉ,व्यंकटेश मुळे म्हणाले की, या यशाचे श्रेय आम्ही आमच्या तज्ञ डॉक्टर्स, नर्सेस व सहाय्यक कर्मचाऱ्यांना देऊ इच्छितो. या 1000 यशस्वी शस्त्रक्रियांचा टप्पा पार करण्यामध्ये डॉ.राजेश कौशिश ,डॉ.श्रीरंग रानडे आणि डॉ.धैर्यशील कणसे यांचे मोलाचे योगदान आहे. मुळातच बायपास सर्जरीबद्दल लोकांमध्ये प्रचंड भीती असते. सह्याद्रि हॉस्पिटल येथे बायपासचे रुग्ण शस्त्रक्रियेनंतर पहिल्या 24 तासांमध्ये चालायला लागतात व पाचव्या दिवशी डिस्चार्ज होतात.या 1,000 शस्त्रक्रियेत जवळजवळ 700 शस्त्रक्रिया या बायपास सर्जरीआहेत व उरलेल्या 300 या व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट, एएसडी.व्हीएसडी. इतर प्रकारच्या ओपन हार्ट सर्जरी आहेत.

सह्याद्रि हॉस्पिटल येथे या सर्व शस्त्रक्रिया आर्थिक दुर्बल घटकांसाठी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत निशुल्क केल्या जातात. येणाऱ्या काही वर्षात सह्याद्रि हॉस्पिटल येथे यूकत,मुत्रपिंड आणि हदय प्रत्यारोपण या शस्त्रक्रिया सुरू करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. 1000 हदय शस्त्रक्रियांचा महत्त्वाचा टप्पा पार करणे हा फक्त सह्याद्रि हॉस्पिटल्स पुरताच मर्यादित नसून संपूर्ण कराड शहरासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे.यामुळे कराडची वाटचाल आता उत्कृष्ट उद्यकीय केंद्र म्हणून होत असून याचा लाभ नागरिक व आसपासच्या तालुक्यातील गरजू रूग्णांना नक्की होईल.

हदयरोग तज्ञांद्वारे तपासणीकरिता सह्याद्रि हॉस्पिटल कराड येथे सोमवार ते शुक्रवार दरम्यान रूग्णांनी भेटावे.संपर्क : 9673338012

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.