मतदार संघामध्ये विकासकामांचा डोंगर उभा करणार - आ.बाळासाहेब पाटील "सह्याद्री" च्या शेती विभागाकडून आ.बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार


कराड (लक्ष्मीपुत्र) - कराड उत्तरचे आमदार व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  बाळासाहेब पाटील यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून सलग पाचव्यांदा विक्रमी मताधिक्याने  ऐतिहासिक विजय संपादन केला, त्याबद्दल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या शेती विभागाकडून आमदार बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला. पाचव्यांदा म्हणजे रौप्यमहोत्सवी आमदार म्हणून बाळासाहेब पाटील यांची निवड झाल्याबद्दल "सह्याद्री"च्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

यावेळी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, शेती अधिकारी मोहनराव पाटील, ऊस विकास अधिकारी व्ही.बी.चव्हाण, डे. ऊस विकास अधिकारी एस.जी.चव्हाण, ऊस पुरवठा अधिकारी एन.एस.साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून तसेच विधानसभा सदस्य या नात्याने मतदार संघात अधिकच्या संबंधामुळे व सर्वांनी केलेल्या मोलाच्या सहकार्याने विजयाचा मार्ग सुखर झाला. येणाऱ्या पाच वर्षांच्या काळात मतदार संघामध्ये विकासकामांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही.बी.चव्हाण यांनी केले, शेती अधिकारी मोहनराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले व एस.जी.चव्हाण यांनी आभार मानले. याप्रसंगी कारखान्याचे विभाग प्रमुख, फिल्डमन, क्लार्क, स्लिपबॉय व ऊस विकास कर्मचारी  उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.