सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नुतन इमारतींचे उद्घाटन आणि कारखान्याच्या ४६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ २५ नोव्हेंबर रोजी होणार आमदार बाळासाहेब पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
कराड - सह्याद्रि सहकारी साखर कारखाना संचलित, सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नुतन इमारतींचे उद्घाटन आणि सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१९-२० सालामधील ४६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी केंद्रीय कृषी मंत्री मा.खासदार श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या
शुभहस्ते व सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल, विद्यमान खासदार मा.श्री श्रीनिवासजी पाटीलसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार, विधानपरिषदेचे सभापती मा.नामदार रामराजे नाईक निंबाळकरसाहेब, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष मा.आमदार श्री दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.आमदार जयंत पाटील, माजी सहकार मंत्री मा.प्रा.डॉ.एन.डी.पाटीलसाहेब यांच्यासह मान्यवरांच्या
उपस्थितीमध्ये सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर, २०१९ रोजी दुपारी २.०० वाजता कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेला आहे.अशी माहिती आमदार बाळासाहेब पाटील यांची पत्रकार परिषदेत
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शेती उद्योगाला अधिक विकसित करणारे तंत्रज्ञान व संशोधन यासाठी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय आवश्यक असल्याचा मनोदय संस्थापक स्वर्गीय आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांनी वेळोवेळी व्यक्त केलेला होता. तसेच कारखाना कार्यस्थळावर कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केल्यास कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मुलांमधून उच्चशिक्षित अभियंते व संशोधक तयार होतील. याशिवाय शेतकऱ्यांच्या मुलांनी कृषी विषयक उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये अशा उदात्त हेतूने कारखान्याच्या संचालक मंडळाने दिनांक ७ एप्रिल, २०१२ रोजी कारखाना कार्यस्थळावर कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला, व तसा प्रस्ताव शासनाकडे दाखल केला आहे असे ही आमदार बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, शासनाकडून कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी मिळाल्यानंतर कारखाना कार्यस्थळावरील यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या इमारतीमध्ये सन २०१३-२०१४ या शैक्षणिक वर्षापासून सह्याद्रि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात आले. कारखान्याने कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेती फार्मकरीता तसेच महाविद्यालयाची मुख्य इमारत, बॉईज व गर्ल्स होस्टेल आणि स्टाफ क्वार्टर्स करीता एकूण ८१.९० एकर जमीन उपलब्ध करून दिलेली आहे. शासनाच्या महाराष्ट्र कृषी संशोधन परिषद, पुणे यांनी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी महाविद्यालयाच्या आवारात कॉलेज मुख्य इमारत, मुले व मुली यांचे स्वतंत्र वसतीगृह आणि स्टाफक्वार्टर्स आदी इमारती प्राधान्याने बांधाव्यात अशी अट प्रस्ताव मंजूरी वेळी घातली होती.
त्यानुसार संचालक मंडळाने नियोजित इमारती बांधकामाचे प्लॅन व एस्टीमेट अर्किटेक्ट बी.एस.पटेल, कोल्हापूर यांचेकडून तयार करून घेतले आणि मुख्य इमारतीचे बांधकाम मे.एस.एस. कन्स्ट्रक्शन, कराड आणि बॉईज होस्टेल, गर्ल्स होस्टेल आणि सी टाईप क्वार्टर्स आदि इमारतींचे बांधकाम मे.व्ही.ए.तांबे असोशिएट, पुणे यांच्याकडे सोपविण्यात आले. सदर इमारतींचे भूमीपूजन महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त मा. श्री संभाजीराव कडू-पाटील यांचे शुभहस्ते दिनांक २५ जानेवारी, २०१८ रोजी समारंभपूर्वक करण्यात आले होते. कृषी अभियांत्रिकी इमारत बांधकामे व इमारतीमधील सुविधा यासाठी एकूण १० कोटी ८० लाख १९ हजार २०० इतका खर्च होत आलेला आहे. सद्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता प्रतिवर्षी ४० इतकी असून, ती वाढविण्याचे संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर कृषी अभियांत्रिकी शाखेशी संलग्न अभ्यासक्रम सुरू करण्याच्यादृष्टीने कार्यवाही करण्यात येणार आहे. सन २०१९-२० हे सातवे शैक्षणिक वर्ष आहे व आतापर्यंत महाविद्यालयातून ३ बॅचेस् उतीर्ण झालेल्या आहेत. असेही आमदार बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यापीठ पात्रतेनुसार उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग आहे. महाविद्यालयाकडे उपलब्ध जमिनीपैकी २९ एकर क्षेत्रावर महाविद्यालयाची नवीन इमारत, कॅन्टीन, स्टाफ क्वार्टर्स, ऑडिटोरिअम, भव्य क्रिडांगण इ. सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. उरलेल्या ५२.९० एकर क्षेत्रामध्ये शेती प्रात्यक्षिकासाठी आणि तत्सम बाबींकरीता प्रयोजन केले आहे. ज्याचा वापर विद्यार्थ्यांना विविध विषयांच्या प्रात्यक्षिक करण्यासाठी विविध विषयांच्या अद्ययावत आणि साहित्यांनी परिपूर्ण प्रयोगशाळा आहेत. महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये विद्यार्थ्यांना विषयांतर्गत क्रमिक पुस्तके, वर्तमानपत्रे तसेच स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणेसाठी विविध पुस्तके अभयाक्रमावर आधिारीत
संदर्भ ग्रंथ उपलब्ध करण्यात आले आहेत.
सह्याद्री सहकारी साखर कारखाना याबाबत बोलताना आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचा हा ४६ वा गळीत हंगाम असून कारखान्याकडे या हंगामासाठी एकूण २१४६७ हेक्टर क्षेत्रावरील ऊसाची नोंद गळीतासाठी झालेली आहे. आडसाली ५३३८ हेक्टर, पूर्वहंगामी २७१८ हेक्टर, सुरू १५४६ हेक्टर व खोडवा ११८६५ हेक्टर असा समावेश आहे. मागील हंगामाच्या तुलनेत आडसालीचे क्षेत्र २००० हेक्टरने कमी झालेले आहे. व खोडवा क्षेत्रामध्ये ३३०० हेक्टरनी वाढ दिसत आहे. यंदाच्या गळीत हंगामासाठी कारखान्यास दैनंदीन ७५०० मे.टन ऊसाचा नित्यनियमित पुरवठा होण्याच्या दृष्टीने - ऊस तोडणी मजूर टोळया - ३८५, बैलगाडया – १२५०, ट्रॅक्टर गाडया- २५० ऊस तोडणी मशीन - २० अशी तोडणी व वाहतूक यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. कारखान्याच्या आसवनी विभागामध्ये सध्याच्या प्रतिदिन ४५००० लिटर्स रेक्टीफाईड स्पिरीटपासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी वाढीव मशिनरी, इथेनॉल स्टोअरेज टाक्या व सुरक्षा यंत्रणा उभारणी आणि सिव्हील कामे प्रगतीपथावर असन येत्या काही दिवसांत ती सर्व कामे पूर्ण होतील. त्यानंतर सरकारी उपक्रमातल्या तेल कंपन्याबरोबर इथेनॉल खरेदीचा करार होताच इथेनॉलचे उत्पादन घेण्यात येणार आहे.
तसेच कारखान्याच्या आसवनी विभागाकडे प्रतिदिन १ लाख लिटर्स इथेनॉल उत्पादनाचा नवीन स्वतंत्र प्रकल्प उभारण्याकरीता डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) तयार करण्याचे काम नॅशनल फेडरेशन ऑफ को-शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांचेकडे सोपविण्यात आलेले आहे. सदरचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशील आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ७५०० मे.टनावरून ११००० मे.टनापर्यंत वाढविण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतींचे उद्घाटन आणि कारखान्याच्या ४६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ समारंभासाठी माजी खासदार मा.कल्लाप्पाण्णा आवाडे, मा.आमदार अनिलराव बाबर, मा.आमदार मोहनराव कदम, मा.आमदार पी.एन.पाटील, मा.आमदार मकरंद पाटील, सातारा जिल्हा मध्य.सह.बँकेचे अध्यक्ष मा.आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा.आमदार शंभुराज देसाई, मा.आमदार विश्वजीत कदम, मा.आमदार दिपकराव चव्हाण, माजी पालक मंत्री मा.शशिकांत शिंदे, माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर, जिल्हा मध्य.सह.बँकेचे उपाध्यक्ष सुनिलराव माने, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.संजीवराजे नाईक निंबाळक, रहिमतपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा.आनंदा कोरे, कराड पंचायत समितीचे माजी उपसभापती मा.सुहास बोराटे, कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व कराड पंचायत समितीचे माजी सभापती देवराजदादा पाटील, माजी सभापती सौ.शालन माळी यांचेसह जिल्ह्यातील जि.प.चे व पंचायत समितीचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर समारंभास सर्व ऊस उत्पादक सभासद, शेतकरी, कार्यकर्ते हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा