भारतीय कामगार कर्मचारी महासंघाची स्थापना
कराड (लक्ष्मीपुत्र) - कराड येथील श्री हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेटरमध्ये भारतीय कामगार कर्मचारी महासंघाची स्थापना करणेत आली आहे. प्रशासनास वेतन वाढीसंदर्भात नुकतेच मागणी पत्र देण्यात आले.
श्री हॉस्पिटल मध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी काम करतात. वाढती महागाईमुळे कर्मचाऱ्यांना काम करणे परवडत नाही. आस्थापनामधील वेतन श्रेणी, सेवा सुविधा तसेच संस्थेत काम करीत असलेल्या कर्मचान्यामध्ये आलेली कुशलता याचा विचार करावा. व्यवस्थापन व कर्मचारी यांच्या मध्ये चर्चा होऊन कायदेशी करार व्हावा व वेतन वाढ करावी अशी मागणी करणेत आली आहे.
मागणी पत्रावर संघटनेचे सरचिटणीस आमदार भाई जगताप सचिव दिलीप जगताप यांच्या सह्या आहेत. संघटनेचे जिल्हा कार्याध्याक्ष अनिल घराळ, सागर निकम, नितीन शिर्के, स्वप्नील, श्री हॉस्पिटल युनिट अध्यक्ष तरुन्नम नदाफ, उपाध्यक्ष दिपक यादव यांच्यासह पदाधिका-यांनी याबाबतचे निवेदन हॉस्पिटलचे डॉ. अविनाश गरगटे व डॉ. प्रकाश सप्रे यांच्याकडे सुपूर्द केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा