श्रीनिवास पाटील यांची नवी ओळख जनतेचा राजा, आपला राजा

                             (गोरख तावरे)
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापुर टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झालेले श्रीनिवास पाटील या "लोकमान्य राजा"चे स्वागत व सत्कार करुन अभिनंदन केले. कर्मचारी सेवकांनी सोबत सेल्फी घेण्याचा आग्रह केला. कर्मचाऱयांच्या विनंतीला मान देऊन खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला  त्यांचा सन्मान स्वीकारत विविध विषयांवर चर्चा देखील केली. टोलनाक्यावरील कर्मचाऱयांना आपुलकीची वागणूक देणारे खासदार म्हणून श्रीनिवास पाटील यांचा बोलबाला सुरू झाला आहे. आपणाला भेटणारा कोणीही लहान - मोठा असा भेदभाव श्रीनिवास पाटील यांनी संपूर्ण जीवनात कधी केलेला नाही. श्रीनिवास पाटील यांच्या याच स्वभावामुळे सातारा जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील तमाम जनता "आपला राजा" म्हणून श्रीनिवास पाटील यांना स्वीकारतात.

नुकत्याच झालेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये छ. उदयनराजे भोसले व जनतेचा राजा श्रीनिवास पाटील यांच्यात लढत झाली होती. यामध्ये श्रीवास पाटील यांनी विजयश्री मिळवला. रयतेच्याबाबत नेहमी सहानुभूती व रयतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अग्रक्रमावर असणारे श्रीनिवास पाटील यांना सातारच्या रयतेने "आपला राजा" म्हणून निवड केली आहे. याचा सार्थ अनुभव नुकताच टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अनुभवला आहे. लोकसभेचा खासदार आपणास सहज उपलब्ध होतो, भेटतो आणि आपली चौकशी करतो, याचा रास्त अभिमान सर्वांनाच आहे. श्रीनिवास पाटील हे कोणतेही पद असो वा नसो किंवा पद असले तरी कोणत्याही अंहमभावामध्ये राहत नाहीत. जनतेची सेवा करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. याला अग्रक्रम देत असल्याने श्रीनिवास पाटील यांची मोठय़ा प्रमाणात लोकप्रियता आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील हे सध्या जनतेला सहज उपलब्ध होत आहेत. यामुळे सातारच्या जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभा मतदारसंघातून निवड झाल्यानंतर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांना हजारोंच्या संख्येने जनता भेटली, त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान श्रीनिवास पाटील यांनीही सर्वांचे मनपूर्वक व यथायोग्य स्वागत करून प्रत्येकाचा सत्कार केला. गेल्या अनेक वर्षांपासून खासदार व जनतेमध्ये सुसंवाद नव्हता, तो सुसंवादाचा बंध श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा एकदा निर्माण केला आहे. लोकप्रतिनिधी मग तो आमदार अथवा खासदार असो, जनतेला सहज उपलब्ध झाला पाहिजे, जनतेच्या समस्या, प्रश्न जाणून घेतले पाहिजेत, अशी माफक अपेक्षा जनतेची असते या कसोटीला श्रीनिवास पाटील उतरले असल्यामुळे श्रीनिवास पाटील यांची पहिल्यापेक्षा अधिक लोकप्रियता वाढली आहे.

श्रीनिवास पाटील यांनी प्रशासकीय कार्यकाळामध्ये अनेक महत्त्वाची कामे केली आहेत. तर गतकाळाळात कराड लोकसभेचे खासदार असताना श्रीनिवास पाटील यांनी जनतेसाठी भरभरून कामे केले आहे. मोठ्याप्रमाणात विकास केला आहे. मतदार संघातील प्रत्येक गावाला विकासासाठी निधी दिला आहे. विशेष म्हणजे गतकाळात आरोग्य योजनेतून (पंतप्रधान सहाय्यता निधी) यातुन जनतेला मोठ्याप्रमाणात उपचारासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. जनतेने आपणाला त्यांची सेवा करण्यासाठी निवडले आहे. याची जान व जाणीव ठेवून नियमित श्रीनिवास पाटील आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये कार्य करीत आलेले आहेत. सिक्किमचे राज्यपाल असताना श्रीनिवास पाटील यांना भेटण्यासाठी व सिक्कीम पाहण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो जनतेने हजेरी लावली होती.परराज्यात स्वागत सत्कार करून त्यांना हर प्रकारची मदत श्रीनिवास पाटील यांनी केलेली आहे. श्रीनिवास पाटील यांचे व्यक्तिमत्त्व हे जनतेसाठी उपकारक व आनंददायक असल्यामुळेच पुन्हा एकदा त्यांना खासदार म्हणून संधी दिली आहे. जनतेची सेवा करण्याचा उत्साह नेहमी श्रीनिवास पाटील यांचा असतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

खासदार श्रीनिवास पाटील यांचा गुणगौरव करावा, त्यांच्या विविध पैलूंचा चौफेर अभ्यास करून लिखाण करावे, तितके कमीच आहे. ज्या चौकटीतून, ज्याप्रकारे खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे पाहिले जाते, तसाच त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आपणाला दिसून येतो.श्रीनिवास पाटील यांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रथम ते प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाले, यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे परममित्र श्रीनिवास पाटील यांना कराड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आणि ते प्रथम या ठिकाणी विजयी झाले. सलग दहा वर्षे खासदार म्हणून काम केल्यानंतर त्यांना सिक्कीमचे राज्यपाल म्हणून शरद पवार यांनी पुन्हा एकदा संधी दिली. सिक्कीमचे राज्यपाल म्हणून पदमुक्त झाल्यानंतर सध्या श्रीनिवास पाटील हे आरामदायी जीवन व्यतीत करीत होते. मात्र याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि शरद पवार यांच्या विश्वासाला तडा गेल्यामुळे पुन्हा एकदा श्रीनिवास पाटील यांना सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढविण्याची संधी मिळाली आणि जनतेने त्यांना पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडले. यामुळे जनतेचा राजा, आपला राजा अशी श्रीनिवास पाटील यांची सध्या नवीन ओळख निर्माण झाली आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.