फेसबुकवर अनेक पत्रकार मित्र विविध विषयावर लिहितात ,आपले मत व्यक्त करतात ही आनंदाची बाब आहे .दिवसभरातील घडामोडी कळतात .नवनवीन चित्रे पाहवयास मिळतात ,मात्र ज्या पत्रकारीता जगात आपण काम करतो त्यांमधील बरे -वाईट अनुभव येतात याबाबत कोणी ,काही लिहित नाही ,बोलत नाही .पत्रकारांचेही बरेच प्रश्न आहेत .वृत्तपत्रासमोर अनेक अडचणी ,समस्या आहेत .यावर चर्चा झाली पाहिजे .या विषयावर लिहिंण्याचा माझा मनोदय आहे .पत्रकार व वृत्तपत्र जगात काय चालंत ,हे गेल्या २५ वर्षाच्या पत्रकारितेत पाहिले ,ऐकले ,अनुभव आले आहेत .याची गोळा -बेरीज करावी असे मनापासून वाटते .सत्कार्याला साथ अन अन्यायाला लाथ या न्यायाने पत्रकारीता केली आहे .
आगंतुकपणे भेटले प्रा. आप्पासाहेब खोत आगंतुकपणे आज माझ्यासमोर प्रा. आप्पासाहेब खोत उभा राहिले. आणि तुम्ही माझ्याच कुळातले दिसता असे म्हणाले. हो, मी दैनिक सामनाचा पत्रकार आहे. असे त्यांना सांगितले. आणि थोडा वेळ गप्पा मारल्या. नेहमी प्रमाणे हॉटेल "लक्ष्मी" मध्ये काऊन्टरवर मी बसलो होतो. सुरुवातीला एक सदग्रस्त आले, आणि आपल्याकडे जेवण मिळते का ? अशी चौकशी केली. शाकाहारी राईसप्लेट मिळेल. असे मी त्यांना सांगितले. पुढे गाडी लावली आहे; आम्ही दोघे जण आहोत, आलोच जेवायला, असे म्हणते ते, सदग्रस्त गाडीकडे गेले. आणि ते "दोघे" येऊन हॉटेलमध्ये बसले. त्यांनी शाकाहारी जेवण केले. तृप्तपणे जेवण झाले, बिल देण्यासाठी कौंटरवर आले. त्यांनी बिलाचे पैसे दिले. आणि मी ते पैसे घेतले. एक नजर त्यांच्याकडे टाकली. तर क्षणभर मला ते सदग्रस्त ओळखीचे वाटले, पण मी काही बोललोच नाही. परंतु मी प्रेसनोट मोबाइलवर टाइप करत असताना त्यांनी पाहिले आणि ते म्हणाले, तुम्ही माझ्या कुळातले दिसता. तुमचे नाव काय ? असे त्यांनी मला विचारले, मी म्हणालो, गोरख तावरे. हे काय करताय ? मला आवर्जून विचारले. मी म्हणालो, ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा