पत्रकारांवर ह्ल्ल्ये होतात हे निषेधार्थ आहे .बीड येथील पत्रकार संजय मालानी यांच्यावर झालेल्या हल्याचा प्रसार माध्यम संपादक पत्रकार परिषदेच्या वतीने निषेध करीत आहोत .केवळ निषेधाने हा प्रश्न सुटणार नाही ,एस . एम .देशमुख हल्ल्याविरोधी कृती समितीच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत .यात अद्याप फारसे यश आले नाही ,१६ पत्रकार संघटना असूनही शासन या पत्रकारांच्या प्रश्नाकडे दूर्लक्ष का करीत आहे ? याविषयावर गंभीरपणे पत्रकारांनी , पत्रकार संघटनानी विचार केलेला आहे असे मला वाटत नाही .संजय मालानी यांच्यावर हल्ला का झाला ? पत्रकार आणि पत्रकार संघटनांची  भीती ,दबाव राहिला नाही का ? शासन पत्रकारांवरील हल्ल्यची दखल घेत नाही ? या प्रश्नांचा शोध घेणे आवश्यक आहे .असे माझे मत आहे . टिळक -आगरकर यांची पत्रकारिता राहिली नाही , समाजप्रबोधन , लोकहित ,लोक चळवळ यांचा आणि पत्रकारितेचा दुरान्वेयेही संबंध राहिलेला नाही . गुंड वृत्तीचे लोक  पत्रकारावर हल्ला करण्याचे धाडसच कसे करतात ? आता एका हाताने टाळी वाजत नाही .माझे ते खरे म्हणण्यापेक्षा  खरे ते माझे म्हणावे हि समाजाची अपेक्षा  आहे .या कशोटीवर सध्या कोणी उतरू शकत नाही . याला वृत्तपत्रही अपवाद नाहीत .  गल्लाभरू , व्यावसाईक , खंडणीखोर ,पेड न्यूज अशा पद्धतीने पत्रकारितेची वाटचाल सुरु झाली आहे .यामुळे प्रामाणिक , चांगल्या आणि खरी पत्रकारिता करणारी मंडळी अडचणीत आली आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.