सत्कार्याला साथ साथ अन्यायाला लाथ
सत्कार्याला साथ साथ अन्यायाला लाथ फेसबुकवर अनेक पत्रकार मित्र विविध विषयावर लिहितात ,आपले मत व्यक्त करतात
ही आनंदाची बाब आहे .दिवसभरातील घडामोडी कळतात .नवनवीन चित्रे पाहवयास
मिळतात ,मात्र ज्या पत्रकारीता जगात आपण काम करतो त्यांमधील बरे -वाईट
अनुभव येतात याबाबत कोणी ,काही लिहित नाही ,बोलत नाही .पत्रकारांचेही बरेच
प्रश्न आहेत .वृत्तपत्रासमोर अनेक अडचणी ,समस्या आहेत .यावर चर्चा झाली
पाहिजे .या विषयावर लिहिंण्याचा माझा मनोदय आहे .पत्रकार व वृत्तपत्र जगात
काय चालंत ,हे गेल्या २५ वर्षाच्या पत्रकारितेत पाहिले ,ऐकले ,अनुभव आले
आहेत .याची गोळा -बेरीज करावी असे मनापासून वाटते .सत्कार्याला साथ साथ अन्यायाला लाथ या न्यायाने पत्रकारीता केली आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा