जलबचत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जलबचत
दुष्काळाची भिषण पसिस्थिती पाहाता आता
जलबचतीचा विचार आणि संदेश समाजातील जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक बाब झाली आहे कारण मराठवाडा व विदर्भात पाण्याची तीव्रता वाढली आहे.याला पश्चिम महाराष्ट्र ही अपवाद नाही मात्र कराडमध्ये आजही पिण्याचे मुबलक पाणी आहे मात्र याचा काही नागरीक दुरोपयोग करीत आहेत ही गंभीर बाब आहे.कारण गाडी साफ करणे,गटारातील घाण पुढे जावी म्हणून पाणी सुरू ठेवणे,अंगणात सडा मारणे,पाणी शिळे म्हणून फेकून देणे या सारख्या असंख्य कारणाकरीता पाण्याची नासाडी करणे हे चूकीचे आहे.तेव्हा जलबचतीचा नारा देवून पाणी बचतीचे प्रबोधन होणे आवश्यक आहे.कृष्णा - कोयनेला आजही भरपूर पाणी आहे हे आपले सुदैव म्हणता येईल.जिथे पाणीच नाही तिथली परिस्थिती नजरेसमोर आणून किमान पाण्याचा अपव्यय होणार नाही यांची दक्षता सर्वांनी घेणे आवश्यक आहे.पाणी बचतीचे महत्त्व सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी जलजागृती कराड नगरपालीकेने हाती घ्यावी दरम्यान विविध उपक्रमांद्वारे जनसामान्यांना जलबचतीचा संदेश देण्यासाठी स्वयंसेवी संस्था व कार्यकर्त्यांनी पुढे यावे आणि जलबचतीचा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा.जलबचत आणि जलसाक्षरता कार्यक्रम राबवून नागरिकांमध्ये पाणी वापराविषयी जागृती निर्माण करणे गरजेचे आहे शिवसेना - भाजपा युती शासन राज्यातील सिंचन व बिगर सिंचनाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यामध्ये आपलाही सहभाग असला पाहिजे ही भूमिका सर्वांनी घ्यावी आणि काटकसरीने पाण्याचा वापर करावा. जनतेचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय कोणताच उपक्रम यशस्वी होत नाही म्हणूनच जलजागृती व जलबचतबाबत राज्यभर जागृतीचे उपक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पाणी वापर विषयक कार्यक्रम घेवून जनजागृती करताना पाण्याचा अपव्यय रोखणे, जलस्त्रोतांचे रक्षण, प्रदूषणापासून बचाव करणे यासारखे उपक्रम राबवून यामध्ये जनसामान्यांचा सहभाग वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे.तेव्हा चला...आपण आपल्या गाव आणि शहरापासून जलबचतीचा संदेश देवू यात.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा