टंचाईवर फुंकर
सध्या राज्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोकांना कुठले व कसे पाणी दयायचे असा गंभीर प्रश्न राज्य शासनासमोर उभा राहिला आहे. पाण्यासाठी आगामी चार-पाच महिने अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण उन्हाळा म्हटले की पाणी प्रश्न निर्माण होणार हे सांगण्यासाठी ज्योतीषाशी बिलकुल गरज नाही. पाणी नियोजनासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत.याच अनुषंगाने शासनाचे सर्व संबंधीत विभाग व यंत्रणांनी प्रत्येक गावात किती पाणी साठा आहे व त्याचा वापर कसा केला पाहिजे यासाठी आराखडा तयार केला आहे.पिण्याचे पाणी, मजुरांना रोजगार, जनावरांसाठी चारा व `मागेल त्याला शेततळे` योजनेत शेतकऱ्यांना शेततळे त्वरीत उपलब्ध करून देण्यासंदर्भात शिवसेना - भाजपा युतीचे राज्यातील प्रत्येक पालकमंत्री संबंधीत जिल्हयात बैठका घेवून तातडीने काही कामांना मंजूरी देत आहेत.मागेल त्याला शेततळे देण्याचा निर्णय चांगला आहे पण आता तळे देवून पाणी कुटून आणायचे हा प्रश्न अनुत्तरीत राहतो आहे.मागेल त्याला शेततळे`
देवून पाऊसापुर्वी पुर्वतयारी करण्याच्या दृष्टीने मागेल त्याला शेततळे देणे हे योग्यच आहे.मंत्रीमहोदय देत असलेल्या आदेशांची सुक्ष्मपणे नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी अधिकारी वर्गाने करणे आवश्यक आहे. नैसर्गीक आपत्ती आणि टंचाईस्थितीत शासन शेतकरी व जनतेच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे हे आशादायक चित्र आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत हे ही नसे थोडके असे म्हणावे लागेल. राज्यातील टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठीच्या उपाययोजना केल्या जात आहेत ही समाधानकारक बाब आहे.कारण यामुळे जनतेला किमान पिण्याचे पाणी तर मिळेल यात शंकाच नाही. जनावरांसाठी पाणी-चारा दिला जात आहे आणि राज्यातील शेतक-यांनी मागणी केली की लगेच मागेल त्याला शेततळे योजना सुरू आहे यातून त्वरीत शेतक-यांना शेततळे दिले म्हणजे शेततळयासाठी येणारा खर्च शासन देत आहे यामुळे आगामी परिस्थितीत व अवकाळी पाऊस आला तरी सदरचे पाणी साठवता येणार आहे. मागील काही वर्षापासून सातत्याने दुष्काळामुळे जनता होरपळत असून या पार्श्वभूमीवर टंचाई निवारणार्थ विविध उपाययोजना राबविताना गावनिहाय सुक्ष्म नियोजन करून आराखडे तयार केले जात आहेत.यामुळे टंचाईकाळात पिण्याचे पाणी मिळेल अशी हमी मिळतेय.ही टंचाईवर फुंकर मारून शासनाच्यावतीने दिलासा दिला जातोय.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा