पाणी - संपादकीय

पाणी
राज्यातील विविध भाग पाण्यासाठी निसर्गावर अवलंबून आहे.पाऊस चांगला व दमदार झाला तर सर्वांनाच आनंद होतो दरम्यान सध्या नैसर्गिक आपत्तीशी महाराष्ट्र सामना करीत आहे.कारण यंदा पाऊसाने पाठ फिरविल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नैसर्गिक बदलामुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे.राज्यातील बहुतांशी जनता सध्या पिण्याच्या पाण्यासाठी आसूसलेली आहे तर लातूरमध्ये सर्वाधिक भिषण परिस्थिती निर्माण झाली आहे.यामुळे माणूसकी पाणी नसताना वाहून जात आहे.ही विदारक सत्य मान्य करावे लागेल. महाराष्ट्र देशा,खणकर देशाची आजची पाणी अवस्था बिकट आहे. पाण्याचा पिणी अत्यंत काटेकोर आणि काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.त्याचबरोबर पाण्याची सामूहिक बचत करणे व सर्वांना आवश्यक तेवढेच पाणी देणे महत्वाचे आहे.
शिवसेपा भाजपा युती शासनाने राज्यातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.ही खरी वस्तुस्थिती आहे.तेव्हा पिण्याचे पाणी कमी व मागणी जादा अशी आजची अवस्था आहे तेव्हा पाणी वापराचे नियोजन करणे, पाण्याचा गैरवापर करणे आणि पाण्याचा अपव्यव टाळणे हे झाले तर  नैसर्गिक आपत्तीवर मात करू शकू.शासनाचे धोरण अमलात आणण्यासाठी शासकीय अधिकारी प्रयत्न करीत आहेत त्याला जनतेने साथ दयावी.राज्याला पाणीटंचाई आणि  नैसर्गिक आपत्तींना सातत्याने सामोरे जावे लागत आहे. तेव्हा शासन आपल्या पाठीशी आहे हे जनतेने पाहावे कारण दुष्काळग्रस्त भागासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे ठिमपणे युती सरकार सांगत आहे.पाणीटंचाईची झळ राज्यातील ग्रामीण भागासह शहरी भागालाही होत आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी पातळी खालावली आहे.महाराष्ट्र राज्य निर्मितीपासून पाणी पुरविण्याच्या अनेक योजना राबविण्यात आल्यात. परंतु आज पाणी टंचाई का ? आणि कोणामुळे निर्माण झाली याचा उहापोह करण्यापेक्षा अधिकचे पाणी जनतेला कसे मिळेल हे युती सरकार सकारात्मकतेने पाहात आहे हे महत्वाचे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.