प्रयोग
पर्यावरणाचा प्रश्न सर्वत्र मोठ्याप्रमाणत जटील होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे मारक आहे. आणि समाजाच्यादृष्टीने अयोग्य आहे.यावर रामबाण उपाय शोधला पाहिजे ग्रामीण भागात शेती केली जाते आणि शहरात विविध व्यवसाय केले जातात पण शहरात शेती करणे शक्य आहे का ? हा नविन विचार समोर येतो आहे.शहरातील गच्चीवर व स्लॅवर फुलबाग केली जाते यामुळे घरातील ओला कचरा यासाठी वापरला जातो.कच-याची समस्याही दत्त म्हणून उभी आहे.बुडत्याला काडीचा आधार म्हणतात पण केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे यानुसार विविध प्रश्नावर विविध उपाय शोधले जातात.हे ही नसे थोडके हा आशावाद आहे. शहरी सेंद्रिय शेतीचा प्रयोग स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून राबविला जात आहे. अशा प्रकारचे प्रकल्प मुंबई व नवी मुंबई परिसरात बहुसंख्य आहेत. हा प्रयोग करताना रसायने, किटकनाशके, औषधे कृत्रिम खते यांचा वापर न करता भाजीपाला पिकविणे असे नाविन्यपुर्ण प्रयोग केला जातो आणि नैसर्गिक उपचार ही केले जातात.दैनंदिन जीवनात नविन प्रयोग करीत राहणे हा मानव स्वभाव आहे.तंत्रज्ञान विकसीत होत आहे पण अपु-या जागेत व रिकाम्या वेळेत काय करायचे ? हा प्रश्न सतावत नाही कारण... करणा-यांसाठी अनेक योजना आहेत तर नविन प्रयोग करणारांसाठी सर्व दरवाजे खुले आहेत.समाजातील युवक आणि लहान मुलांचा वेळ सत्कारणी लागावा यासाठी त्यांना सेंद्रिय शेतीतील नवनवीन पद्धती समजावून सांगितल्या जातात.ओल्या कचऱ्यांचे कंपोस्ट खतात रुपांतर कसे करावे याचे मार्गदर्शन केले जाते.घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय ? याची माहिती दिली जाते. विविध कारणासाठी वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर कसा करावा यावर मंथन होते म्हणजे विविध प्रयोग करणे हा विलक्षण व आपूलकीचा मार्ग आहे ज्याने त्याने आपल्या योग्यतेप्रमाणे नव नविन प्रयोगासाठी तयार राहावे .केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे.एवढे समजले तरी पुरूसे आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा