डाॅ.अजिंक्य डी.वाय.पाटील
महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार राज्याच्या प्रगतीचा आरसा - डाॅ.अजिंक्य डी.वाय. पाटील
लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार हा राज्याच्या प्रगतीचा आरसा आहे. नामांकने मिळालेले सगळे मानकरी हे एका अर्थाने विकासदूतच आहेत. महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील रत्नेच ‘लोकमत’ने वेचली आहेत. त्यांच्या सन्मानातून अखिल मराठी मनाला प्रेरणा मिळणार आहे. या दिग्गजांचे आपापल्या क्षेत्रातील कार्य सकारात्मक आणि प्रेरणादायक असल्याने त्यांच्यापासून स्फूर्ती घेत आणखी असे नामवंत महाराष्ट्रात तयार व्हावेत. समाजशिक्षणाच्या या कार्यात अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ जोडले जातेय, याचा मला मनस्वी आनंद आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबरच महाराष्ट्र आणि देश घडविला जावा अशा प्रकारचे शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असतो. समाजप्रबोधनाची वाट चालतानाच सभोवतालच्या घटना-घडामोडींकडेही आमच्या विद्यार्थ्यांनी सजग राहावे, ही आमची भूमिका असते. ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’च्या महाराष्ट्ररत्नांकडून ते प्रेरणा घेतील, असा मला विश्वसा आहे. अशी प्रतिक्रीया अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डाॅ. अजिंक्य डी.वाय. पाटील यांनी व्यक्त केली आहे.
डाॅ.अजिंक्य डी.वाय.पाटील हे शैक्षणिक,सामाजीक,सांस्कृतीक,क्रिडा,कला क्षेत्रात सातत्याने नवनविन उपक्रम राबविण्यासाठी आघाडीवर असतात.सकारात्मक विचारशैलीमुळे समाजाच्या विविधागांचा मागोवा घेवून नाविन्यपुर्ण उपक्रमात डाॅ.अजिंक्य डी.वाय.पाटील महाराष्ट्रात आघाडीवर आहेत.समाजमान्य सन्माननीय व्यक्तींचा गौरव करणेसाठी डाॅ.अजिंक्य डी.वाय.पाटील पुढाकार घेतायत ही अभिनंदनीय बाब आहे. आपापल्या क्षेत्रातील सकारात्मक आणि प्रेरणादायक कार्य करणारे व्यक्तींकडून युवा पिढीला स्फूर्ती मिळावी आणि भावी पिढीसाठी आदर्श असावा यासाठी सकारात्मक वैचारीक बैठकीतून कार्यरत असणारे व्यक्तीमत्व म्हणजे डाॅ.अजिंक्य डी.वाय.पाटील आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा