लढाई सुरू...सहभागी व्हावे


लढाई सुरू....सहभागी व्हावे.

वृत्तपत्रसंबंधाने राज्य शासनाने 2001 साली धोरण जाहिर केले आहे.वृत्तपत्रांची व्याख्या केली आहे.दैनिक,सायं.दैनिक,साप्ताहिक व मासिक यांचा आकार किती असावा आणि पानांची संख्या निश्चित केले आहे.तर वृत्तपत्रांच्या अंक विक्री कशी आहे यानुसार वृत्तपत्राचे वर्ग ठरवले आहेत.अ ब क अशी तीन वर्गात वर्गवारी केली आहे.अ आणि ब वर्गाला ज्यापध्दतीने शासन न्याय देत आहे.याउलट क वर्गाला नेहमी उपेक्षीत ठेवले जात आहे.यामुळे वृत्तपत्रांबाबत शासनाची न्याय भूमिका दिसून येत नाही.क वर्ग वृत्तपत्र हे महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामीण भागातून प्रसिध्द होत असतात.राज्य शासनाचे विविध उपक्रम,योजना,शासनाची सकारात्मक प्रसिध्दी,मंत्रीमहोदयांचे कार्यक्रम,भाषणे व फोटो सविस्तर क वर्गातील वृत्तपत्रे ठळक प्रसिध्दी देतात.ही वस्तुस्थिती आहे.
सरकार कोणत्याही राजकीय पक्षाचे असो. सर्वांना न्याय समान दिला पाहिजे ही रास्त अपेक्षा आहे.पण खरे झारीतील शुक्राचार्य कोण ? हे शोधून आता क वर्ग वृत्तपत्र मालक व संपादकांनी लढाई सुरू केली पाहिजे.आम्ही जेष्ठ संपादक आप्पासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष लढाई लढतो आहोत.जे जे शक्य आहे ते करण्याचा शासनस्तरावर प्रयत्न केला आहे.दरम्यान आता सर्वच संपादक - मालक यांनी एकत्र येऊन लढाई न्याय - हक्कासाठी लढली नाही तर येणा-या काळात क सर्व वृत्तपत्र बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.कारण अ आणि ब वर्ग वृत्तपत्रांचाच जाहिरात वितरण करताना विचार केला जातो आणि जाणीवपुर्वक क वर्ग वृत्तपत्रांना डावलले जात आहे.शेडजी व भडजींच्या वृत्तपत्रांना मलिदा आणि ग्रामीग भागात प्रामाणिक वृत्तपत्र प्रसिध्द करणारांना धतुरा ही अनेक वर्षाची प्रथा व परंपरा सुरू आहे.
तेव्हा क वर्ग वृत्तपत्र मालक - संपादक यांना कळकळीची विनंती की,कोणताही किंतु मनात न ठेवता एका छत्राखाली येवून आता आर या पार ची लढाई सूरू करू या...अन्यथा आपणाला काळ माफ करणार नाही.मा.आप्पासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली "लघु व मध्यम वृत्तपत्र बचाव कृती समिती" निर्माण करून जास्तीत जास्त जाहिराती क वर्ग वृत्तपत्रांना मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.तेव्हा क वर्ग वृत्तपत्र (दैनिक,सायं.दैनिक,साप्ताहिक,पाक्षिक,मासिक ) मालक व संपादकांनी यात सहभागी व्हावे.ही विनंती.

गोरख तावरे,निमत्रंक
लघु व मध्यम वृत्तपत्र बचाव समिती.
9423502355

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.