मृदू भाषीक - अविनाशदादा मोहिते



"कृष्णा"निवडणूक भाग - 3
मृदू भाषीक - अविनाशदादा मोहिते
(गोरख तावरे)

कृष्णा सहकारी साखर कारखाना उभारणीत जेष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते व सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांचा सिंहाचा वाटा आहे.त्याचबरोबर या दोन्ही बंधूंच्या खांदयाला खांदा लावून तत्कालीन संस्थापक संचालकांचाही वाटा आहे.हा इतिहास आता कोणी विसरणार नाहीत कारण कृर्षीमहर्षी आबासाहेब मोहिते यांचे नातू अविनाश मोहिते यांनी गतकाळातील कृष्णा निवडणूकीत संस्थापक पॅनेल उभे करून कृष्णेत सत्तांतर घडवले आणि अख्या महाराष्ट्राने "हे अंचिबीत व विपरीत काय घडले"असा प्रश्न केला."कोण आहे हा अविनाश मोहिते" मोहिते-भोसले ताकदीला आव्हान देणारा म्हणून अविनाश मोहिते यांना पाहण्याची अनेकांना उत्सुकता लागली होती.

शांत,संयमी,मृदू भाषीक असे अविनाशदादांचे व्यक्तीमत्व आहे.घराण्याला परंपरा असूनही कराड तालुक्याच्या राजकारणात आबासाहेब मोहिते घराण्याला काही महत्व नव्हते.कृष्णा कारखाना उभारणीत आबासाहेबांचाही पुढाकार होता मग आमचे मोहिते घराणे कराडच्या व कृष्णा कारखान्याच्या दैनंदिन कामकाजापासून लांब का ? असा प्रश्न अविनाशदादांना पडणे स्वाभाविक आहे. आपल्यापरीने व शक्य तेवढे सामाजिक कार्य करण्याचा आटोकाट प्रयत्न अविनाशदादा करीत होते. सामाजीक कामाला राजकीय क्षेत्राची जोड हवी हा मुलमंत्र मिळताच धाडशी निर्णय घेवून "आपणच कृष्णा कारखान्यात स्वतंत्र्य पॅनेल तयार करायचे" हा विढाच त्यांनी उचलला आणि कामाला सुरूवात केली.मोहिते-भोसले मनोमिलनानंतर दुसरा पर्याय कोण असा शोध राजकीय पटलावर सुरूच होता.याचवेळी युवानेते म्हणून अविनाश मोहिते समोर आले.कृष्णाच्या कार्यक्षेत्रातील जेष्ठ राजकीय नेत्यांनी अविनाशदादांना बिनशर्त पाठींबा दिला.आणि मनोमिलनावर नाराज असणा-यांना पर्याय मिळाला.यामुळे कृष्णा कारखाना सत्तांतराचा जनक म्हणून अविनाशदादांकडे सर्वजन पाहू लागले.

अविनाश मोहिते हे निगर्वी व्यक्तीमत्व,मृदू भाषीक आहेत.पाच वर्षे सत्ताकाळात केलेले काम सर्वांसमोर आहे.विरोधक सोडता सर्वांशी सलोख्याचे संबंध आहेत.मात्र गतकाळात ज्यांनी राजकीय मदत केली त्यापैकी अनेकजण का लांब गेले आहेत याबाबत विचार अविनाशदादांनी करणे आवश्यक आहे.राजकारणात बरोबर किंवा चूकीचा कोणताही निर्णय दिर्घकाळ परिणाम करणारा असतो.संस्थापक पॅनेलच्या माध्यमातून दुस-या लढाईची सुरूवात कृष्णा कारखान्यासाठी अविनाश मोहिते यांनी सुरू केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कराड शहर व तालुक्यातील ओपीडी सुरू ठेवा

मलकापुर नगर परिषदेच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा सविस्तर निकाल उमेदवारांना पडलेली मते/ कांग्रेस पार्टी १४, भारतीय जनता पार्टी ५/ नगराध्यक्षपदाची खुर्ची नीलम येडगे यांना.