सामाजीक बांधिलकीतून प्रधानमंत्री जीवन सुरक्षा आणि जीवन ज्योती राबवणार - राजेश पाटील
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सामाजीक बांधिलकीतून प्रधानमंत्री जीवन सुरक्षा आणि जीवन ज्योती राबवणार - राजेश पाटील
कराड(सावा)- कराड जनता बँकेने आपल्या सभासद आणि ग्राहकांसाठी अनेक योजना आणि उपक्रम सामाजिक बांधिलकीतून राबविले आहेत. देशभरातील सर्वसामान्य नागरीक आणि शेतकरी बांधवांसाठी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या दोन्ही योजना कराड जनता बँक आपल्या सुमारे दीड लाखाहून अधिक ग्राहक आणि सभासदांसाठी प्रभावीपणे राबविणार आहे. नाममात्र किमतीमध्ये ही योजना विमाधारकांच्या कुटूंबांसाठी एक प्रकारचे दिलासा देणारे सुरक्षाकवचच असून विमा योजनांचा लाभ सर्वांनी बँकेच्या जवळच्या शाखेतून घ्यावा, असे आवाहन कराड जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर यांनी केले.
बँकेच्या मुख्य कार्यालयात या दोन्ही विमा योजनांचा शुभारंभ बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर, उपाध्यक्ष विकासराव धुमाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विलासराव सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
विलासराव सुर्यवंशी यांनी विमा योजनांची विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेत १८ ते ७० वर्षे वयाच्या कोणत्याही व्यक्तीस वार्षिक केवळ बारा रुपये हप्ता भरुन आपल्या कुटूंबासाठी संकटसमयी तब्बल दोन लाख रुपयांची तरतूद करता येणार आहे. पाँलीसीधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा दोन्ही डोळे व हात पाय अथवा एक डोळा आणि एक हात किंवा पाय कायम स्वरुपी निकामी झाल्यास पाँलीसीधारकाच्या कुटूंबियांना तब्बल दोन लाख रुपयांची विमा भरपाई मिळणार आहे. तर एक डोळा आणि एक हात किंवा पाय निकामी झाल्यास एक लाखांची भरपाई मिळेल. दुस-या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत १८ ते ५० वर्षे वयाच्या कोणत्याही व्यक्तीस वार्षिक केवळ ३३० रुपये हप्ता भरुन कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास कुटूंबियांना दोन लाख रुपयांचा विमा मिळणार आहे.
या दोन्ही विमा योजना कराड जनता बँक महाराष्ट्रातील आपल्या सर्व २९ शाखा आणि २ विस्तारीत कक्षामार्फत बँकेच्या कार्यक्षेत्रातील आपल्या सर्व सभासद आणि ग्राहकांबरोबरच नविन ग्राहकांसाठीही राबविणार असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा .या योजनांच्या अधिक माहितीसाठी कराड जनता बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन बँकेचे उपाध्यक्ष विकासराव धुमाळ यांनी केले.
स्वागत उपमुख्यकार्यकारी अधिकारी दिपकसिंह पाटणकर यांनी केले.दिलीप शेटे, प्रदिप काळे, विजयकुमार डूबल यांनी मनोगत व्यक्त करुन उपस्थितांच्या विविध शंका व प्रश्नांना उत्तरे दिली. सुत्रसंचलन गौरीहर बाजारे यांनी केले तर आभार संभाजीराव थोरात यांनी मानले.
स्वागत उपमुख्यकार्यकारी अधिकारी दिपकसिंह पाटणकर यांनी केले.दिलीप शेटे, प्रदिप काळे, विजयकुमार डूबल यांनी मनोगत व्यक्त करुन उपस्थितांच्या विविध शंका व प्रश्नांना उत्तरे दिली. सुत्रसंचलन गौरीहर बाजारे यांनी केले तर आभार संभाजीराव थोरात यांनी मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा